Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मातीच्या माठातून पाणी पिण्याचे ‘७’फायदे !

$
0
0

माती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना आहे. आपल्या पूर्वजांना त्याचे महत्त्व ठाऊक होते. तसंच त्याचा वापर कसा करावा याची माहिती देखील त्यांना होती. म्हणूनच त्यांनी मातीची भांडी, मडकी, माठ बनवायला सुरवात केली. त्यामुळे मातीच्या मडक्यातून पाणी प्यायचे हे सगळ्यांच्या अंगवळणी पडले आणि ती आपली परंपरा बनली.

परंतु, आपल्या या परंपरेमागे काही ज्ञान आहे का ? त्याचे काही फायदे आहेत का ? हे जाणून घेण्यासाठी आम्ही Vaidya’s: New Age Ayurveda च्या डॉ. सूर्या भगवती यांच्याशी संवाद साधला. जाणून घेऊया मातीच्या माठातून पाणी पिण्याचे त्यांनी सांगितलेले फायदे. उन्हाळ्यात डोकेदुखी आणि पित्ताचा त्रास कमी करण्यास खास टीप्स !

मातीच्या माठाचे अनेक फायदे:

1. नैसर्गिक थंडावा: डॉ. भगवती यांच्या सल्ल्यानुसार लहान लहान छिद्र (सच्छिद्र) असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. उन्हाळ्यात खूप वेळ लोड शेडींग असते किंवा अनेकदा वीजपुरवठा स्थगित होतो. अशावेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रिजमधील थंड पाण्यावर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे माठात पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरण पूरक आहे. फ्रीज शिवाय पाणी थंडगार करण्याचे 4 नैसर्गिक मार्ग !

2. मातीचे गुणधर्म: माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात, असे डॉ. भगवती यांनी सांगितले. परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो.

3. माती नैसर्गिकरित्या अल्कलाईन: शरीरातील अॅसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून जर तुमचं शरीराच्या आतील वातावरण अॅसिडिक असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर तुमचे आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाईन होते, असे डॉ. भगवती सांगतात.

4. कोणतेही हानिकारक केमिकल्स नाहीत: अधिकतर प्लॉस्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचे टॉक्सिक केमिकल असते. जे आरोग्याला धोकादायक असतात. म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. तसंच पाणी दूषित होत नाही.

5. मेटॅबॉलिझम सुधारते: मातीचा माठ वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे त्यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते.

6. उष्माघाताला आळा बसतो: उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी प्या. पेजेचं पाणी – उष्माघात आणि डीहायड्रेशनचा त्रास टाळण्यासाठी घरगुती उपाय

7. घशासाठी चांगले असते: सर्दी, खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्यांना फ्रिजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता. कारण ते पाणी घशासाठी चांगले असते. उन्हाळ्यात मुबलक पाणी पिण्याची सवय वाढवतील हे इंटरेस्टिंग पर्याय

योग्य मातीचे मडके (माठ) कसे निवडावे ?

घरासाठी मातीचा माठ विकत घेताना शक्यतो तो हाताने बनवलेला असावा असे पहा, असा सल्ला डॉ. भगवती देतात. तसंच mica particles युक्त माठ घ्या. त्याला micaceous म्हणतात. Mica हे नैसर्गिक इन्सलेटर असते, असे डॉ. भगवती म्हणाल्या. त्यामुळे पाणी खूप वेळपर्यंत थंड राहण्यास मदत होते.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>