आयुर्वेदामध्ये अनेक जुनाट आणि नियमित भेडसावणर्या समस्यांवर उपाय आहेत. आज आबालवृद्धांना भेडसावणारी समस्या म्हणजे केसगळती ! मग केसांच्या समस्या टाळण्यासाठी ‘त्रिफळा’चा वापर नक्की करा.
त्रिफळा म्हणजे काय ?
आवळा, हरडा व बेहडा यांचे मिश्रण म्हणजे त्रिफळा. त्रिफळा हे ‘व्हिटामिन सी’, अॅन्टीऑक्सिडंट व अॅन्टी फंगल यांनी परिपूर्ण असते. त्रिफळामुळे केसांची मुळं मजबूत होतात. केसगळती थांबते तसेच केसांतील कोंड्याची समस्यादेखील कमी होण्यास मदत होते. बाजारात किंवा आयुर्वेदीक औषधं विक्रेत्यांकडे तयार त्रिफळा चूर्ण उपलब्ध असते. कॅपसुल्स, पावडर किंवा अर्क अशा विविध स्वरुपात मिळणारे त्रिफळा चूर्ण तुमच्या सोयीनुसार निवडा.
कशी वापराल त्रिफळा पावडर -
- 2 कप पाण्यामध्ये 1 चमचा त्रिफळेची पावडर मिसळावी.
- हे मिश्रण, मंद आचेवर गरम करून निम्मे होईपर्यंत उकळावे.
- मिश्रण थंड झाल्यावर, टाळूवर लावावे.
- 30मिनिटांनंतर केस सौम्य शाम्पूने किंवा शिकाकाई युक्त शाम्पूने स्वच्छ धुवावेत.
हा प्रयोग आठवड्यातून दोनदा करावा. शिकाकाईमुळे केसांची चमक व घनता वाढायला मदत होते.
संबंधित दुवे
Translated By - Dipali Nevarekar
Source - Prevent HairFall with Trifala
छायाचित्र सौजन्य – Getty Images