राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील नऊ विभागांत घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (27मे) जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल 91.26 टक्के लागला असून, कोकण विभागाने निकालात बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजे 95.68 टक्के निकाल लागला आहे.
विभागवार निकाल -
कोकण 95.68 टक्के
अमरावती 92.50 टक्के
कोल्हापूर 92.13 टक्के
नागपूर 92.11 टक्के
लातूर 91.97 टक्के
औरंगाबाद 91.77 टक्के
मुंबई 90.11 टक्के
नाशिक 88.13 टक्के
पुणे 91.96 टक्के
आज दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येईल. तसेच 4जून रोजी गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. परीक्षेच्या निकालासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मंडळाने २७८९ ३७ ५६ या दूरध्वनी क्रमांकावर हेल्पलाइन सुरू केली आहे.
निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळांवर भेट द्या -