जगभरात हळूहळू डिप्रेशनच्या गंभीरतेबाबत जागरुकता होत आहे ही एक खरंच चांगली बाब आहे.कारण डिप्रेशनचा त्या सबंधित प्रत्येक व्यक्तीवर दुष्पपरिणाम होत असतो.पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे डिप्रेस लोकांवर करण्यात येणा-या पारंपरिक उपचार पद्धतीबाबत मात्र विशेष बोलले जात नाही.पारंपारिक उपचारांमध्ये सायकोथेरपी व काही स्थितीत त्या व्यक्तीला Antidepressants औषधोपचार करण्यात येतात.पण दीर्घकाळ ही औषधे घेतल्यामुळे डिप्रेस व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक स्थितीत बिघाड होऊ शकतात.परिस्थिती अधिकच गंभीर होते जेव्हा अशी औषधे बंद केल्यामुळे त्या व्यक्तीमध्ये त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. Antidepressants मुळे वजन वाढणे ते अगदी सेक्शुअल समस्येपर्यंत अनेक विनाशक दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा औषधांचा वापर हा जवळजवळ काऊंटर इंट्युटिव्ह आहे. वाचा ताण तणाव सांभाळून डीप्रेशनवर मात करण्यासाठी खास टीप्स !
डिप्रेस लोकांची काळजी घेणारे देखील रुग्णाचा विकार व औषधांचा साईड इफेक्ट याबाबत द्विधा मन:स्थितीत सापडतात.यासाठीच डिप्रेशनवर उपचार करण्यासाठी व्यापक दृष्टीकोन असणे गरजेचे आहे.ज्यामुळे डिप्रेस व्यक्तीच्या फक्त वरवरच्या लक्षणांवरच नाही तर या समस्येच्या मुळापर्यंत पोहचता येऊ शकेल.तसेच डिप्रेशनमधून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी १० फायदेशीर उपाय !जरुर करा.
होमिओपॅथीनूसार डिप्रेशन येण्याची प्रमुख कारणे-
-
शोषण- भूतकाळातील शारीरिक,सेक्शुअल व भावनिक शोषणामुळे भविष्यात एखादी व्यक्ती गंभीर नैराश्यामध्ये जाऊ शकते.अशा अनेक प्रकरणांमध्ये लहान मुलांना म्हणजे अगदी पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना देखील याचा तडाखा बसू शकतो.आजच्या जीवनशैलीत कशी ओळखाल नैराश्याची लक्षणं !
-
औषधे- काही अॅलोपॅथीक औषधांमुळे त्या व्यक्तीच्या मूडवर घातक परिणाम होऊ शकतो.अॅक्नेसारख्या समस्येवर घेण्यात येणारे Isotretinoin , Interferon-alpha ही अॅन्टी व्हायरल, Corticosteroids या औषधांमुळे डिप्रेशनचा धोका अधिक वाढतो.या औषधांमुळे नॅचरल डिफेंस मॅकेनिझम दाबला जातो ज्यामुळे डिप्रेशनची समस्या निर्माण होते.
-
संघर्ष- घरातील मंडळीसोबत अथवा मित्रमंडळींसोबत वैयक्तिक मतभेद अथवा संघर्ष देखील डिप्रेशनसाठी कारणीभूत असू शकतात.अचानक Mood Swing होण्याची 6 कारणंं
-
मृत्यु अथवा वैयक्तिक नूकसान- जवळच्या व्यक्तीच्या मृत्युच्या दु:खामुळे देखील एखाद्याला डिप्रेशन येऊ शकते.
-
आनुवंशिक- घरामध्ये डिप्रेशनची फॅमिली हिस्ट्री असल्यास डिप्रेशन येऊ शकते.
-
एखादी घटना- नवीन नोकरी लागणे, पदवीधर होणे अथवा लग्न होणे अशा चांगल्या घटनांमुळे देखील डिप्रेशन येऊ शकते.तसेच नोकरी जाणे,जॉब बदलणे अथवा पैशांचे नुकसान, घटस्फोट, निवृत्ती अशा त्रासदायक घटना देखील नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात.
-
वैयक्तिक समस्या- मानसिक आजारामुळे किंवा घराबाहेर अथवा समाजाबाहेर काढणे अशा सामाजिक बहिष्कारामुळे देखील डिप्रेशनचा धोका वाढू शकतो.
-
गंभीर आजारपण-एखाद्या गंभीर आजार अथवा आरोग्य समस्येमुळे देखील एखाद्याला डिप्रेशन येऊ शकते.नैराश्य येण्यास कारणीभूत ठरतात या ७ सवयी देखील जरुर वाचा.
-
एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणे-जवळजवळ ३० टक्के लोकांना यामुळे डिप्रेशन येण्याची गंभीर समस्या निर्माण होते.
होमिओपॅथीमध्ये डिप्रेशनवर कसे उपचार करतात?
होमिओपॅथी उपचारांचा उद्देश केवळ रुग्णाच्या वरवरच्या लक्षणांवर उपाय करणे हा नसून त्या व्यक्तीचे संपुर्ण आरोग्य सुधारणे हा असतो.त्यामुळे यामध्ये त्या व्यक्तीला आयुष्यभर Antidepressants घ्यावी लागू नयेत यावर भर दिला जातो.या उपचारांमध्ये डिप्रेशनला कारणीभूत ठरणा-या भावनिक कारणांवर उपचार करण्यात येतात.तसेच या आयुर्वेदीक उपचारांनी करा डिप्रेशनवर मात ! हे देखील अवश्य वाचा.
ताण-तणाव निर्माण करणा-या भावनांवर परिणामकारक ठरतात ही होमिओपॅथी औषधे-
-
मनातील राग-Aconite, Aurum metallicum, Belladona, Coffea cruda, Nux-vomica, Bryonia, Chamomila, Sulphur, Veratrum album
-
एखाद्या जवळची व्यक्ती अथवा पाळीव प्राणी गमावणे-Aurum metallicum, Belladona, Hyocyamus, Ignatia, Natrum-mur, Causticum, Antimonium crudum, Phosphoric acid
-
आनंद (serotonin आणि endorphin वाढणे)-Opium, China, Coffea, Aconite, Pulsatilla
-
बिझनेस, धन, प्रतिष्टा गमावणे-Arnica, Rhust-tox, Veratrum album, Sarsaparilla, Arsenicum Album, Calcarea Carbonica, Ignatia, Nux-vomica
ही औषधे वापरणे सुरक्षित असून त्यामुळे Antidepressants औषधांप्रमाणे होणारे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.तसेच या औषधांचे दीर्घकाळ दुष्परिणाम भोगावे लागत नाहीत किंवा यांची सवय देखील लागत नाही.मात्र ही औषधे होमिओपॅथी तज्ञांच्या सल्लानूसार घेणे गरजेचे आहे.
डॉ.श्रीपाद खेडेकर यांनी जगप्रसिद्ध टेनिस स्टार Novak Djokovic याच्यावर अस्थमा या समस्येसाठी उपचार केले आहेत.तसेच युरोपियन प्रिमियर लीगमध्ये खेळणा-या अनेक युरोपियन फुटबॉल स्टार्सनां देखील बरे केले आहे.ते युरोपमध्ये प्रॅक्टीस करतात व त्यांनी केलेल्या संशोधनातील शेकडो केसेस एका महत्वाच्या आंतरराष्ट्रीय मेडीकल जर्नल मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.ते एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिजीशन,शिक्षक,संशोधक व लेखक आहेत.तसेच त्यांनी होमिओपॅथीवर चार पुस्तके लिहिली आहेत.एका साधा व व्यापक दृष्टीकोनातून गंभीर व गंुतागुंतीच्या Pathologies हाताळणे ही त्यांची स्पेशलिटी आहे.ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षक असून त्यांचा विषय Understanding the Genetic Basis of Homoeopathic Treatment हाआहे.ते आक्रमक व प्रभावीपणे अनेक कठीण व दुर्धर रोगांवर उपचार करण्यात यशस्वी झाले आहेत.त्यांचा असा दृढ विश्वास आहे की एखाद्या गंभीर आरोग्य स्थितीचे कारण हे त्या व्यक्तीच्या ताण-तणावामध्येच दडलेले असते.तसेच ते तुम्हाला अचूक सल्ला व परिणामांची हमी देऊ शकतात.ते त्यांच्या दादर व बेलग्रेडमधील क्लिनीक मधून कार्य करतात व मुंबईच्या सुश्रूषा हॉस्पिटचे कन्सल्टंट देखील आहेत.
अधिक माहिती साठी भेट द्या- www.imperialclinics.com
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock