वाढत्या उन्हाबरोबरच त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. अॅक्नेची समस्या तर अत्यंत सामान्य आहे. उन्हाळ्यात येणारे पिंपल्स सहजासहजी जात नाही. त्यासाठी तुम्हाला डर्मोटॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा लागतो. म्हणून यासाठी हे समर फेशियल स्प्रे ट्राय करा. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहील, पिंपल्समुळे येणारे डाग, जळजळ कमी होईल आणि बॅक्टरीया नष्ट होतील. त्याचबरोबर यासाठी तुम्हाला जास्त साहित्य लागणार नाही. तसंच ते बनवणे देखील सोपे आहे. या चिकचिकत उन्हाळ्यात या फेशिअल स्प्रे ने चेहरा चटकन उजळेल.
तुम्हाला यासाठी ग्रीन टी, टी ट्री ऑईल, गरम पाणी आणि रिकामी स्प्रे बॉटल या साहित्याची आवश्यकता आहे. ही बॉटल तुम्ही तुमच्यासोबत ठेऊ शकता आणि गरजेच्या वेळी स्प्रे करा व मिनिटाभरात फ्रेश व्हा. उन्हाळ्यात तेलकट त्वचेलाही तजेलदार बनवेल हा घरगुती फेसपॅक !
अॅक्नेसाठी ग्रीन टी चा वापर का करावा?
- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रीन टी सहज उपलब्ध होते.
- ग्रीन टी मध्ये अँटीबॅक्टरील आणि अँटी इंमफ्लामेंटरी गुणधर्म असल्याने अॅक्नेवर परिणामकारक ठरते.
- ग्रीन टी मध्ये असलेल्या Epigallocatechin gallate (EGCG) मुळे त्वचेला नवी झळाळी मिळते. तसंच एजिंग प्रोसेस मंदावते.
- अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की ग्रीन टी मुळे त्वचेतून स्त्रवणाऱ्या सिबमचे प्रमाण ७०% नी कमी होते.
- ग्रीन टी त्वचेवर लावल्याने ब्लॅकहेड्स व पिंपल्स कमी होतात.
टी थ्री अॅक्ने कमी करण्यासाठी कसे परिणामकारक ठरतात?
- टी ट्री ऑईल मध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे अॅक्नेला कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टरीयांना आळा बसतो.
- कमी प्रमाणात असलेले अॅक्ने टी ट्री ऑईल मुळे नियंत्रित होतात. पिंपल्स फोडल्यानंतर त्वचेवर डाग पडू नये म्हणून काय कराल?
साहीत्य:
- १ ग्रीन टी बॅग
- १ कप पाणी
- २ थेंब टी ट्री ऑईल
- २ थेंब लिंबाचा रस
- १ रिकामी स्प्रे बॉटल
कृती:
एक कप पाणी उकळवा आणि त्यात टी बॅग घाला. त्यात २ थेंब टी ट्री ऑईल आणि लिंबाचा रस घाला. पाणी थंड झाल्यानंतर त्यातून टी बॅग काढा. त्यानंतर ते मिश्रण स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये काढा. बाहेर जाण्यापूर्वी त्वचेवर स्प्रे करा. याचा वापर तुम्ही गरजेनुसार दिवसभर करू शकता. त्वचेतील ओलावा टिकून राहण्यासाठी आणि रिफ्रेश दिसण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. तसंच टी ट्री ऑईल आणि ग्रीन टी यामुळे पिंपल्स, डाग दूर होण्यास मदत होईल. उन्हाळ्यात येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीला दुर ठेवा, घरगुती ‘बॉडी स्प्रे’ने!
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
References:
1. Katiyar, S. K., Ahmad, N., & Mukhtar, H. (2000). Green tea and skin. Archives of Dermatology, 136(8), 989-994.
2. Hsu, S., Bollag, W. B., Lewis, J., Huang, Q., Singh, B., Sharawy, M., … & Schuster, G. (2003).
3. Mahmood, T., Akhtar, N., Khan, B. A., Khan, H. M. S., & Saeed, T. (2010). Outcomes of 3% green tea emulsion on skin sebum production in male volunteers. Bosn J Basic Med Sci, 10(3), 260-264.
4. Elsaie, M. L., Abdelhamid, M. F., Elsaaiee, L. T., & Emam, H. M. (2009). The efficacy of topical 2% green tea lotion in mild-to-moderate acne vulgaris. Journal of drugs in dermatology: JDD, 8(4), 358-364.
5. Raman, A., Weir, U., & Bloomfield, S. F. (1995). Antimicrobial effects of tea‐tree oil and its major components on Staphylococcus aureus, Staph. epidermidis and Propionibacterium acnes. Letters in Applied Microbiology, 21(4), 242-245.
6. Malhi, H. K., Tu, J., Riley, T. V., Kumarasinghe, S. P., & Hammer, K. A. (2016). Tea tree oil gel for mild to moderate acne; a 12 week uncontrolled, open‐label phase II pilot study. Australasian Journal of Dermatology.