Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

सिझेरियननंतर वाढलेले वजन आणि नैराश्यावर मात करण्यासाठी करा योगसाधना !

$
0
0

सिझेरियन प्रसूतीमध्ये स्त्रिची शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्ट्रेंथ खर्च होते. प्रसूतीनंतर पहिल्या दोन आठवड्यात होणार त्रास, वाटणारी चिंता आणि प्रसूतीनंतर येणारे नैराश्य यामुळे स्त्री अगदी खचून जाते, उदास होते. परंतु, या सगळ्यावर योगसाधनेने मात करता येते. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही आर्ट ऑफ लिव्हिन्ग मधून मेडिसिनची डिग्री मिळवलेल्या सिनियर योगा एक्स्पर्ट यांच्याशी संवाद साधला.

  • भावनिक स्थैर्य साधण्यासाठी योगसाधना आणि प्राणायाम यांची मदत होते.

इतर व्यायामाचा परिणाम फक्त स्नायूंवर होतो तर योगसाधनेचा परिणाम endocrine system वर होतो, असे पुण्याच्या योग एक्स्पर्ट गीतांजली मुळ्ये यांनी सांगितले. म्हणूनच नवमातेने नियमित योगसाधना व प्राणायाम केल्यास सिझेरियन प्रसूतीनंतर येणारे नकारात्मक विचार दूर होण्यास मदत होईल. प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्यावर मात करण्यासाठी करा योगसाधना !

  • सिझेरियन प्रसुतीवर मात करण्यासाठी योगासन फायदेशीर ठरतात.

सूक्ष्म योगा, जॉईंट रोटेशन, लेग रोटेशन यासारख्या हलक्या योगा व्यायामप्रकार सिझेरियननंतर महिनाभर करावे, असा सल्ला स्त्री रोग तज्ज्ञ आणि योग ट्रेनर डॉ. मिनाक्षी गुप्ता यांनी दिला.  या काळात कठीण योगासन विशेषतः ज्यात पेल्विक मसल्सचा सहभाग असेल अशी आसने करू नका. सुलभ प्रसुतीसाठी ही योगासनं ठरतील अधिक फायदेशीर !

सूक्ष्म योगा:

सूक्ष्म योगा मुळे आखडलेले स्नायू मोकळे होतात व शरीरात ऊर्जेची निर्मिती होते. हे व्यायामप्रकार ७ मिनिटांसाठी केल्यास तुम्हाला खूप फरक जाणवेल. जाणून घेऊया ते करण्याची योग्य पद्धत.

  • सुरवातीला कपाळावर मसाज करा.
  • अंगठा आणि तर्जनीने भुवयांवर ५-६ वेळा हलकेसे चिमटे काढा.
  • ५-६ वेळा डोळे डावीकडून उजवीकडे आणि त्याचा विरुद्ध फिरवा.
  • डोळे घट्ट बंद करा आणि मग मोठे उघडा. असे १०-१५ वेळा करा.
  • १०-१५ सेकंदासाठी कान खेचा. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कानाच्या खालच्या बाजूला असलेल्या नसा प्रग्या जागृत करतात.
  • कान पकडून तो गरम होईपर्यंत उजवीकडून डावीकडे आणि विरुद्ध दिशेने फिरवा.
  • हाताची पहिली तीन बोटे (तर्जनी, मधले बोट आणि अनामिका) जबड्यापासून हनुवटीपर्यंत फिरवा आणि गालांना मसाज करा.
  • तोंड पूर्णपणे उघडा आणि बंद करा. असे ८-१० वेळा करा.
  • तोंड उघडा आणि जबडा उजवीकडे-डावीकडे असा ८-१० वेळा फिरवा.
  • मानेचे रोटेशन करा. श्वास घेत डोकं वरच्या बाजूला न्या आणि श्वास सोडत हनुवटी छातीला लावा. डोकं उजवीकडून डावीकडे आणि विरुद्ध दिशेने ५-६ वेळा फिरवा. मानेचं रोटेशन करताना श्वास घेत डोकं उजवीकडून मागे न्या आणि श्वास सोडत मागून डाव्या बाजूने पुढे आणा.
  • २ मिनिटांसाठी हात झटकून घ्या. (शेक करा).

प्राणायाम

  • योगासनांप्रमाणे सिझेरियननंतर काही ठराविक श्वसनप्रकार करायला सुरवात करा. श्वासावर लक्ष केंद्रीत केल्याने इतर विचार व दुःखातून बाहेर पडण्यास मदत होते. डॉ. मुळ्ये यांनी काही श्वसनप्रकार करण्याचा सल्ला दिला.
  • नाडीशोधन प्राणायाम: यामुळे मनावरील ताण हलका होतो. नियमित केल्याने मन व शरीर शांत, शुद्ध होते.
  • भ्रामरी प्राणायाम: हा प्राणायाम टेन्शन, चिंता, राग दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
  • नोट: कपालभाती, भस्रिका यांसारखे पोटावर ताण येणारे श्वसनप्रकार करताना काळजीपूर्वक करा आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे उत्तम ठरेल.
  • पोटावरची चरबी कमी करण्यासाठी काही योगासने:

सिझेरियननंतर पोट वाढतं. यासाठी सूर्यनमस्कार, धनुरासन, भुजंगासन, वीरभद्रासन आणि बाजूला झुकण्याची आसने करण्याचा सल्ला दिला जातो. तसंच वजन कमी करण्यासाठी जलद गतीने सूर्यनमस्कार करण्याचा सल्ला डॉ. मिनाक्षी देतात. परंतु, तीन महिन्यानंतर सूर्यनमस्कार घालावेत. आसनाच्या अंतिम स्थितीत अधिक वेळ म्हणजेच वेदना किंवा शरीराची थरथर जाणवेपर्यंत रहा. त्याचबरोबर कठीण आसने ट्रेन्ड योगा टीचरच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा सल्ला डॉ. मुळ्ये यांनी दिला आहे.

  • आहारासंबंधी टीप्स:

प्रसूतीनंतर खूप तूप किंवा तेल खाण्याची गरज नाही, असे योगा एक्स्पर्ट कविता सोनावणे हिने सांगितले. तेलकट पदार्थ खाल्याने अतिरिक्त वजन वाढते. स्तनपानाच्या काळात स्त्रीने हेल्दी राहणे गरजेचे आहे. यासाठी नवमातेने भरपूर प्रमाणात फ्लुईड्स घ्यावे. त्याचबरोबर सात्विक आणि शाकाहारी आहार घ्यावा. कारण शाकाहारी अन्नात अधिक प्रमाणात प्राण (लाईफ फोर्स) असतात.

नवमातेला तिच्या शारीरिक वेदना आणि भावनिक ताण दूर करून नवीन आयुष्यात नव्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी तयार करण्यास योगसाधना उपयुक्त ठरते.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles