सार्वजनिक स्वच्छतागृह वापरणे अगदी सगळ्यांचा नकोसे वाटते. तिथली अस्वच्छता, दुर्गंधी असह्य होते. तसंच यापूर्वी ते कितीजणांनी वापरलं असेल याची आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे अस्वच्छतेमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. Herpes किंवा Chlamydia सारखे आजार यामुळेच होतात.
परंतु, सार्वजनिक स्वच्छतागृह वापरण्याची वेळ आपल्यावर कधी ना कधी येतेच. कामाच्या ठिकाणी किंवा प्रवास करताना आपल्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अशावेळी स्वच्छतागृह स्वच्छ असण्याची अपेक्षा करु नये, कारण ते शक्य नसते. अस्वच्छ स्वच्छतागृह वापरण्याचा त्रास पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक होतो. कारण स्त्रियांच्या योनीमार्गाचा संबंध थेट टॉयलेट सीटशी येतो.
परंतु, आतापर्यंत साधारणपणे आपल्याला अस्वच्छ शौचालय, संपलेले टिशू, टॉयलेट पेपर याबद्दल कल्पना आली आहे. तरी ओलसर सीटवर बसणे गैरसोयीचे होते. तसंच इन्फेकशनचा धोका असतो. म्हणून सीट वर न बसता थोडे जवळ उभे राहून आपले काम करण्याची सवय आपल्याला झाली आहे.
परंतु, खरंच अस्वच्छ टॉयलेटमुळे धोका असतो? की ही आपली मानसिकता आहे? आपल्या भीतीला काही आधार आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही Uro-Oncological robotic surgeon डॉ. अनुप रमाणी यांच्याशी संवाद साधला. जाणून घेऊया त्यांचे उत्तर.
- हे सगळे आपल्या डोक्यात असते.
सार्वजनिक स्वच्छतागृह वापरल्यामुळे कोणाला UTI (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेकशन) झाल्याचे मी माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवात ऐकले नाही किंवा तसा पेशंट ही माझ्या पाहण्यात आला नाही, असे डॉ. रमाणी यांनी सांगितले. आपल्याला इन्फेकशनची भीती वाटते कारण अस्वच्छ टॉयलेटमध्ये बॅक्टरीया असतात. पण ते Proteus आणि Staphylococcus saprophyticus असतात. त्यामुळे UTI होत नाही. त्यांचा मूत्रमार्गाशी थेट संबंध येणे फार दुर्मिळ आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह वापरताना योग्य ती काळजी घेतल्यास UTI चा धोका टाळता येतो. यासाठी अधिकाधिक स्वच्छता पाळणे गरजेचे असते, असे डॉ. रमाणी म्हणाले. सार्वजनिक स्वच्छतागृह वापरताना या ‘९’ स्टेप्स नक्की पाळा!
- लैंगिक आजारांचे काय?
यावर डॉ. रमाणी म्हणाले, ज्या मायक्रोब्समुळे herpes, Chlamydia यांसारखे लैंगिक आजार होतात. परंतु, ते मायक्रोब्स अतिशय नाजूक असतात. अधिक वेळ हवेशी संबंध आल्यास ते नष्ट होतात. सार्वजनिक स्वच्छतागृहांमुळे STDs किंवा UTIs होण्याची शक्यता खूप कमी असते.
- स्वच्छता कशी राखावी?
सार्वजनिक स्वच्छतागृहांमुळे लैंगिक आजार किंवा युरिनरी इन्फेकशनचा धोका नसला तरी ते अतिशय स्वच्छ असतात, असे नाही. म्हणून योग्य ती स्वच्छता पाळणे गरजेचे आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये जाताना सॅनिटाईझर आणि टिश्यूज सोबत ठेवा. दिल्लीच्या Right Step Project या कंपनीने ‘पी बडी’ नावाचे डिव्हाईस लाँच केले आहे. हे फिमेल युरीनेशन डिव्हाईस असून त्यामध्ये स्त्रियांना उभं राहून मूत्रविसर्जन करता येणे शक्य आहे. त्यामुळे टॉयलेट सीटशी त्वचेचा येणारा थेट संबंध टाळता येईल.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock