सायकॉलॉजिस्ट आणि सायक्रायटिस्ट या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत.पण अनेकांंचा यामध्ये गोंधळ होतो. नेमक्या ठिकाणी चुकीचा शब्द वापरतात. पण या दोन शब्दांमध्ये फरक आहे. हा फरक शिक्षण, ट्रेनिंग आणि प्रॅक्टिस यावर आधारित आहे. या दोघांमधला फरक समजून घेण्यासाठी आम्ही मुंबईचे psychiatrist आणि sexologist, डॉ. संघनायक मेश्राम यांच्याशी संवाद साधला. तसंच गरजेनुसार कोणाची मदत घ्यायला हवी याबद्दल देखील त्यांनी मार्गदर्शन केले. जाणून घेऊया त्या दोन शब्दांमधला त्यांनी सांगितलेला फरक.
Psychiatrist: सायक्रायटिस्ट होण्यासाठी मेडीकल स्कूलमधून ग्रॅजुएट होण्याची गरज आहे. सायकायट्रिस्ट हे MBBS ची डिग्री किंवा बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जेरी ही सहा वर्षांची डिग्री घेतल्यानंतर पुढे तीन वर्ष ते सायकॅट्रीचा अभ्यास करतात. ते सतत प्रॅक्टिस करत असतात. त्यांना मेंदू, भावना, विचार याबद्दल सखोल ज्ञान असते आणि मानसिक आरोग्याचे विकार असलेल्यांनावर ते उपचार करतात. पेशंटशी बोलल्यानंतर ते पेशंटचे कॉउंसलिंग करतात, गरज असल्यास औषधे देतात. नैराश्य, बाय पोलार आणि इतर मानसिक त्रास किंवा ताण असल्यास त्यावर ते पेशंटशी संवाद साधून, त्यांचे काउंसलिंग करतात. तसंच पेशंटचे मानसिक आरोग्य जाणून घेण्यासाठी आवश्यक टेस्ट करतात. यात देखील स्पेशालिस्ट असतात. उदा. जनरल सायक्रायटिस्ट, चाईल्ड सायक्रायटिस्ट, सायकोअनॅलिसिस, इत्यादी. ताण तणाव सांभाळून डीप्रेशनवर मात करण्यासाठी खास टीप्स !
Psychologist: सायकॉलॉजिस्ट हे सायकॉलॉजी (मानसशास्त्र) मध्ये पदवी घेतल्यानंतर कॉउंसलिंगचा अॅडव्हान्स कोर्स करतात. ते कॉउंसलिंग करतात. त्याचबरोबर पेशंटच्या समस्येनुसार वेगवेगळ्या थेरपी घेण्याचा सल्ला देतात. ते काही ठराविक सायकॉलॉजिकल टेस्ट घेतात. उदा. अँटिट्यूट टेस्ट, रॅशनल इमोटीव्ह बिहेव्हियर थेरपी, cognitive behaviour analysis, इत्यादी. यावरून त्यांना पेशंटच्या मानसिक आरोग्याबद्दल निदान करता येते. परंतु, मानसिक समस्या दूर करण्यासाठी ते औषधे देत नाहीत आणि गरज भासल्यास सायक्रायटिस्टची भेट घेण्याचा सल्ला देतात.
कॉउंसलिंगसाठी कोणाची मदत घ्यावी?
स्पष्टपणे सांगायचे तर कोणीही ज्यांच्यासोबत तुम्हाला बोलून हलके वाटेल अशा व्यक्तीशी बोला. आपल्याकडे मित्र, नातेवाईक, जवळचे काका-मामा अगदी भरमसाठ सल्ले देतात. यामुळे आपण गोंधळतो आणि समस्या अधिक गंभीर होत जाते. कारण त्यात तज्ज्ञांच्या सल्ल्याचा अभाव असतो. म्हणून कोणाची मदत घेऊ असा विचार करत बसण्यापेक्षा सायकॉलॉजिस्ट किंवा सायक्रायटिस्ट कोणाचीही मदत घेणे योग्य ठरेल, असा सल्ला डॉ. मेश्राम देतात.
तरीही तुम्हाला असं वाटत का? की त्यामुळे तुमच्या उपचारांमध्ये फरक पडेल? म्हणून डॉ. मेश्राम यांनी याबद्दल अधिक माहिती दिली. सायक्रायटिस्ट हे औषधे देण्यास, मानसिक आजारांची लक्षणे जाणण्यास, मानसिक अस्वस्था जाणून घेण्यास समर्थ असतात. थायरॉईड, अॅनिमिया, मायग्रेन या आजारांसाठी मानसिक आरोग्य कारणीभूत ठरते व त्यासाठी औषधांची गरज असते. यावर सायक्रायटिस्ट उपचार करू शकतात, थेरपी सुद्धा देऊ शकतात. तर सायकॉलॉजिस्ट तुमच्या समस्यांवर काउंसलिंग आणि थेरपीच्या मदतीने समस्या कमी करण्याचा प्रयत्न करतात.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock