फीटनेस एक्सपर्ट म्हणजे तुमचा वर्कआऊट व व्यायामाचा सराव करुन घेणारी एक प्रशिक्षित व्यक्ती.व्यायाम हा नेहमी प्रशिक्षित तज्ञांच्या देखरेखी खालीच करणे गरजेचे असते.मात्र व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी त्याबाबत तुम्हाला पुरेसे ज्ञान असणे देखील तितकेच आवश्यक आहे.यासाठी कोलकत्ता बेस फीटनेस एक्सपर्ट अर्नव सरकार यांच्याकडून जाणून घेऊयात अशा काही महत्वाच्या गोष्टी ज्या व्यायामापूर्वी तुम्हाला माहित असणे फार गरजेचे आहे.तसेच जरुर वाचा gym exercise करताना केलेल्या या ५ चुकांमुळे वाढतात केसांच्या व त्वचेच्या समस्या
१.आठवड्याच्या प्रत्येक दिवशी एक तास व्यायाम करण्याची गरज नाही-
व्यायामाचा कालावधी हा निरनिराळ्या घटकांवर अवलंबून असतो.ब-याचदा यासाठी हेल्थ,फॅट लॉस,स्ट्रेन्थ गेन अशी काही गोल्स ठरविण्यात येतात.यासाठी ३० ते ४५ मिनीटे इतका कालावधी पुरेसा असू शकतो.प्रोफेशनल अॅथलीट्स साठी मात्र दिवसभरात एक तासांपेक्षा अधिक काळ व्यायामाचा सराव करण्याची गरज असू शकते.आठवड्यातून २ ते ५ दिवस इन्टेन्स एक्सरसाईज व इतर दिवस लायटर इन्टेन्सिटी ट्रेनिंग करणे योग्य आहे.थोडक्यात आठवडाभर जास्तीत जास्त दिवस सक्रीय असणे हे अधिक महत्वाचे आहे.
२.अधिक घाम आल्यास जास्त फॅट बर्न होते हा एक गैरसमज आहे-
शरीरातून जास्त घाम आला तर अधिक फॅट बर्न होतात असे मुळीच नाही.जास्त घाम आल्याने फॅट नाही तर शरीरातून अधिक पाणी कमी होते.पुरेसे पाणी पिऊन अथवा स्वत:ला हायड्रेट करुन तुम्ही पाण्याची कमतरता भरुन काढू शकता.तसेच जाणून घ्या टीनएजर्सनी जीममध्ये घाम गाळणे योग्य आहे का ?
३.वेट लिफ्टींग करुन शरीरसौष्ठव करता येत नाही-
शरीरसौष्ठव हे व्यायाम व डाएटने कमावता येते.फक्त वेट लिफ्टींग करुन शरीर कमावता येत नाही.बरेच अॅथलीट जसे की रनींग,क्रिकेट अशा स्पोर्ट्स मध्ये सहभाग घेणारे स्पोर्टस पर्सन वेट लिफ्टींग करतात तरी देखील त्यांचे शरीर प्रोफेशनल बॉडीबिल्डर सारखे मुळीच नसते.कारण शरीरसौष्टव प्राप्त करण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक नियोजित डाएट घेणे गरजेचे असते.यासाठी जाणून घ्या ‘सुल्तान’ सलमान खानसारखी बॉडी बनवण्याचे खास फीटनेस फंडे !
४. Kettlebells हा dumbbells पेक्षा निराळा व्यायाम असतो व त्यामुळे तुमच्या पाठीला त्रास होत नाही-
हे दोन्हीही रेसिस्टन्स ट्रेनिंगचेच प्रकार आहे तसेच ते योग्य प्रकारे केल्यास त्यांचे फायदे देखील चांगले होतात.मात्र त्या दोघांच्या डिझाइन व बॉडी अलाइन्सच्या पद्धतीमध्ये थोडा फरक आहे.या दोन्हीही व्यायामाच्या सरावामुळे शरीरावर चांगला परिणाम होतो.
५.कार्डीओ व्यायाम सर्वासांठी गरजेचे नसतात-
कार्डिओ व्यायामाचे निरनिराळे प्रकार आहेत.ते फक्त मॉर्निंग वॉक व जॉगींग पुरतेच ते मर्यादीत नक्कीच नाहीत.एका लहान विश्रांतीनंतर केलेल्या वेट ट्रेनिंग मुळे देखील कार्डीओ वॅस्क्युलर फायदे होतात.त्यामुळे एखादा ट्रेडीशनल कार्डीओ न करता देखील कार्डीओ वर्कआउट करता येऊ शकतो.यासाठी चांगल्या परिणांमांसाठी ट्रेडीशनल कार्डीओच्या काही प्रकारांचा सराव आठवड्यातून १ ते ३ वेळा करा असे सांगितले जाते.तसेच जिमवरून आल्यानंतर या ५ चुका टाळाच !
६.फॅट कमी करण्यासाठी शरीराला फॅट देणे गरजेचे असते-
फॅट हे निरोगी व सतुंलित आहारासाठी खूप महत्वाचे असते.शरीराला पुरेश्या प्रमाणात फॅट न मिळाल्यास हॉर्मोन्सची निर्मिती योग्य होत नाही.ज्याच्या परिणामामुळे शरीरातील चरबी हळूहळू कमी होते व शरीरातील पाणी व स्नायूंचे देखील नुकसान होते.हे देखील जरुर वाचा जीम प्रोटीन्स घेणं योग्य की अयोग्य ?
७.स्ट्रेचनींगमुळे स्नायूंमधील वेदना कमी होत नाहीत-
ट्रेनिंग सेशन नंतर ब-याचदा स्नायूंमध्ये वेदना होतात.या वेदना स्ट्रेचनींगमुळे कमी होत नाहीत.या वेदना कमी करण्यासाठी चांगला आराम व योग्य पोषणाची गरज असते.
८.महिलांसाठी देखील शरीरसौष्ठव करणे हेल्थी असू शकते-
शरीर कमवणे हे पुरुष अथवा महिलेच्या स्वेच्छेवर अवलंबून आहे.जर एखाद्या स्त्रीचे वजन कमी असेल व तिला यासाठी शरीर कमवायचे असेल तर ते तिच्या साठी नक्कीच चांगले असू शकते.पण एखाद्या आदर्श अथवा अतिवजन असलेल्या व्यक्तीने व्यायामाद्वारे शरीर वाढवल्यास त्याला नक्कीच आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते.यासाठी ‘वजनदार’ साठी सई ताम्हणकर आणि प्रिया बापटने कशी घेतली मेहनत हे देखील जरुर वाचा.
९.पन्नासीच्या पुढील लोक व्यायाम करु शकत नाहीत-
निरोगी स्वास्थासाठी प्रत्येक व्यक्तीने व्यायाम करणे आवश्यक आहे.निरोगी राहण्यासाठी व आयुष्याचा आनंद घेण्यासाठी व्यायामाचा नेहमीच चांगला फायदा होतो.पण जर एखाद्या व्यक्तीने ५० वर्षांनंतर व्यायामाला सुरुवात केली असेल तर तिने यासाठी सरावास हळूहळू सुरुवात करायला हवी व तसेच काही मर्यादा देखील पाळणे गरजेचे आहे.यासाठी वाचा ‘झुंबा’- वयाच, व्याधींच बंधन झुगारून फीटनेस राखण्याचा मजेशीर प्रकार !
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock