अळशी आरोग्यदायी असल्याने नवमातांपासून तरूणांच्या आहारात त्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. वजन घटवण्यासाठी अनेक बीयांबरोबरच अळशीदेखील प्रामुख्याने वापरली जाते. पण झटपट निकाल मिळवण्यासाठी आंधळेपणाने त्याचा वापर करणे त्रासदायक ठरू शकतो. हेदेखील जरूर लक्षात ठेवा .
- पोट बिघडते -
अतिप्रमाणात अळशी खाणे काही प्रमाणात त्रासदायक ठरू शकते. त्यातील रेचक गुणधर्मांमुळे डायरिया, छातीत जळजळणे, पचनाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे तुमचे पोट बिघडले असल्यास अळशी खाणे टाळा.
- जखम भरण्याची प्रक्रिया मंदावते -
अळशीमधील ओमेगा 3 फॅटी अॅसिड सूज किंवा दाह कमी करण्यास मदत करतात.परंतू अळशीतील काही घटकांमुळे रक्त घट्ट होण्याची प्रक्रिया कमी होते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरू राहतो. त्यामुळे अॅस्प्रिनसारख्या रक्त पातळ करणारी औषधं घेण्यापूर्वी नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (जखमांचे व्रण कमी करणारे ’8′ घरगुती उपाय !)
- पोटात गॅस होतो -
अळशीमध्ये फायबर घटक अधिक असल्याने पोटात ग़ॅस होण्याचीदेखील शक्यता असते. काही जणांमध्ये पोटात गॅस होण्याबरोबरच बद्धकोष्ठतेचाही त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरड्या बीया खाऊ नका.
- औषधांच्या परिणाम मंदावू शकतो -
औषध-गोळ्यांसोबत अळशी खाणे टाळा. यामुळे औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो. म्हणूनच आहारात अळशी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- अॅलर्जिक रिअॅक्शन होण्याची शक्यता असते -
अळशी खाणे काही वेळेस त्रासदायक ठरू शकते. त्याच्या अॅलर्जिक रिअॅक्शनमुळे पोटात दुखणे, मळमळणे, उलट्या होणे असा त्रास होऊ शकतो. त्याची गंभीरता वाढल्यास अचानक रक्तदाब कमी होणे, श्वास घेण्यात अडथळा निर्माण होण्याचा त्रास होऊ शकतो.
- मासिकपाळीचे चक्र बिघडते -
अतिप्रमाणात अळशी खाल्ल्यास मासिकपाळीचे चक्र बिघडू शकते. पाळीच्या संदर्भात आजार असलेल्या स्त्रियांनी अळशीचे सेवन टाळावे. (मासिकपाळीच्या वेदना हमखास दूर करणारे ’10′ नैसर्गिक उपाय !)
संबंधित दुवे -
कोरफडीचेदेखील आहेत ’7′ दुष्परिणाम
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source – Bet you didn’t know flaxseeds have side effects!
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.
कोरफडीचेदेखील आहेत ’7′ दुष्परिणामकोकोरफडीचेदेखील आहेत ’7′ दुष्परिणामरफडीचेदेखील आहेत ’7′ दुष्परिणाम