Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

डोळ्यांवरील ताण हलका करणारे घरगुती उपाय

$
0
0

मंद प्रकाशात मोबाईल स्क्रिन, टीव्ही, मोबाईल स्क्रिनकडे पाहणे डोळ्यांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते. अपुरी झोप सुद्धा डोळ्यांना  त्रासदायक ठरू शकतात. मग या चूकीच्या सवयींपासून परावृत्त होण्याबरोबरच काही घरगुती आणि सहज-सोप्या पद्धतींदेखील तुमच्या डोळ्यांचे आरोग्य जपण्यास मदत करतात.

मसाज :

तुमच्या डोळ्यांभोवती दिवसातून 2-3 वेळेस किमान 20 सेकेंद हलक्या हाताने मसाज करा.  मसाज केल्याने डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स होण्यासोबतच तेथील रक्तपुरवठा सुधारण्यासही मदत  होते.

हाताच्या तळव्यांचा स्पर्श : 

योगविद्येमध्ये या साधनेला विशेष महत्त्व आहे. हाताचे दोन्ही तळवे एकमेकांवर घासा.  नंतर हळूच त्याचा स्पर्श डोळ्यांवर करावा.  2-3 मिनिटांनंतर हात बाजूला करा. असे केल्याने प्रखर प्रकाशामुळे डोळ्याला होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.

थंड दूध : 

डोळ्यांवरचा ताण हलका करण्यासाठी त्यावर थंड दूधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवावेत. 4-5 मिनिटांनी तुम्हांला रिलॅक्स वाटेल. तुम्ही कामावर असाल तर थंड दुधाऐवजी पाण्याचा वापर करू शकता. थंडाव्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होते.  तसेच ताणामुळे आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

काकडी :

काकडीमध्ये कुलिंग इफेक्ट असल्याने अनेकदा सलूनमध्ये फेसपॅक लावल्यानंतर डोळ्यावर काकडी ठेवली जाते. काकडीमधील अ‍ॅस्ट्रींजंट घटक डोळ्यांवरील ताण हलका करतात. काकडीचे काप 3-4 मिनिटे डोळ्यांवर ठेवा आणि काही वेळ आराम करा.

गुलाबपाणी

नैसर्गिकरित्या थंड प्रवृत्तीचे गुलाबपाणी डोळ्यांमधील जळजळ कमी करण्यास मदत करते. त्यातील अ‍ॅस्ट्रिजंट आणि दाहशामक घटक डोळ्यांवरील ताण हलका करण्यास मदत करतात.  गुलाबपाण्यात  कापसाचा बोळा बुडवून तो डोळ्यांवर ठेवावा. 4-5 मिनिटांनी काढून चेहरा हलकसा पुसा.

संबंधित दुवे -

जवळचे दिसणे सुकर करेल हे ’5′ घरगुती उपाय

डोळ्यांच्या आरोग्याविषयक ’5′ रंजक अन महत्त्वपूर्ण गोष्टी !

डोळ्यांचे आरोग्य वाढवणारी 6 सुपरफुड्स !


 

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source - Quick, simple remedies to relax your tired eyes

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>