तुम्ही दररोज रात्री ८ वाजता जेवता.कधीही रात्री उशीरापर्यंत टीव्ही पाहत नाही किंवा झोपताना इलेक्ट्रॉनिक वस्तूही जवळ बाळगत नाही पण तरीही रात्री तुम्हाला निवांत झोप येत नाही? असे का घडते.तुम्हाला शांत झोप न येण्याचे नेमके कारण समजत नसेल तर लक्षात ठेवा झोपमोड होण्यामागे तुमचा बेड अथवा तुमच्या बेडरुम मधील तापमान देखील तितकेच कारणीभूत असू शकते.तसेच रात्री झोप येत नाही? मग हे १० उपाय करून पहा !
डाएटीशन व न्यूट्रीशनिस्ट डॉ.स्वाती दवे यांच्याकडून जाणून घेऊयात झोपेची गोळी न घेता देखील शांत झोप लागण्याचे हे पाच सोपे उपाय-
1. चांगल्या आरामदायक बेडची निवड करा-
जर तुमचा बेड खूपच सॉफ्ट असेल तर तुम्हाला त्यापेक्षा थोड्या टणक बेडची गरज असू शकते.अल्ट्रा सॉफ्ट बेड कमी आरामदायक असतात.ज्यामुळे अंगदुखी व झोपमोड देखील होते.त्याचप्रमाणे तुमच्या मॅटट्रेसमध्ये देखील गुठळ्या नाहीत याची नीट दक्षता घ्या.निवांत झोप येण्यासाठी आरामदायक उशी घ्या.उशी जास्त मऊ अथवा जास्त टणक नसल्यास तुमच्या मानेला निश्चितच चांगला आधार मिळेल.तसेच उशीला नेहमी सुती कव्हर घाला.तसेच वाचा या शांत झोप मिळवण्याच्या ’5′ सोप्या ट्रिक्स !
2. बेडरुमचे तामपान योग्य व नियंत्रित ठेवा-
चांगल्या निवांत झोपेसाठी बेडरुमचे तापमान अतिथंड अथवा अतिउष्ण असे दोन्हीही नसावे.शांत झोपेसाठी आदर्श तापमान हे नेहमी ५० टक्के आद्रतेसह २५ अंश सेल्सियस असावे.त्यामुळे एकदा का बेडरुममधील वातावरण योग्य प्रमाणात उबदार झाले की तुमचे बेड वर्मर अथवा हिटर बंद करा.कारण रात्रभर ते सुरु ठेवल्यास तुमच्या बेडरुम मधील आद्रता कमी होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला पुरेसे आरामदायक वाटणार नाही.एअरकंडीशनर वापरताना देखील हेच नियम पाळावेत.त्याचप्रमाणे शांत झोपेसाठी घरातील या ’7′ गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या.
3. रात्रीचे हलके जेवण घ्या-
तुम्ही रात्री काय खाता यापेक्षा तुम्ही किती वाजता जेवता हे खूप महत्वाचे आहे.डॉ.स्वाती यांच्यामते झोपण्यापूर्वी दोन तास आधी जेवल्यामुळे तुमचे पचन चांगले होते व तुम्हाला झोप देखील चांगली लागते.तसेच तुम्ही रात्री हलका आहार घ्याल याची पुरेशी दक्षता घ्या कारण जड जेवणामुळे तुम्हाला अपचन व पचनासंबधित इतर समस्या निर्माण होऊ शकतात.जाणून घ्या कसे शांत झोप मिळवण्यासाठी ‘जायफळ’ फायदेशीर !
4. दररोज ठराविक वेळीच झोपा-
लवकर निजे व लवकर उठे त्याला आरोग्य-संपदा लाभे असे पूर्वी सांगण्यात यायचे ते खरेच आहे.यासाठीच ठराविक वेळी झोपा व सकाळी लवकर उठा.तुमच्या झोपेच्या वेळेत बदल झाल्यामुळे देखील तुमच्या झोपेचा पॅटर्न बदलू शकतो.झोपेची वेळ पाळल्यामुळे तुमचे मन व शरीर दोघांनाही सात तास झोप घेण्याची शिस्त पाळण्यास मदत होते व ज्यामुळे तुमची झोपमोड होत नाही.त्याचसोबत दिवसा खूप वेळ झोप घेणे टाळल्यास तुम्हाला रात्री शांत झोप नक्कीच लागू शकते.यासाठी वाचा दिवसा सारख्या येणाऱ्या झोपेवर काही सोपे उपाय!
5. बेडरुममध्ये अंधार करा-
जसे रात्री जोरजोरात आवाज ऐकल्यामुळे तुमची झोपमोड होऊ शकते अगदी तसेच प्रकाशामुळे देखील तुमची झोपमोड होते.यासाठी रात्री झोपताना बेडरुममधील सर्व दिवे बंद करा.तसेच बेडरुममध्ये टीव्ही देखील ठेऊ नका कारण त्यामुळे रात्री मध्येच तुम्हाला टीव्ही पाहण्याची इच्छा होऊ शकते.जर तुम्हाला रात्री वाचन करण्याची सवय असेल तर यासाठी एखादे पुस्तक वाचनासाठी घ्या कारण ई-बूकचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.त्याचसोबत रात्रीच्या शांत झोपेसाठी करा हे ’3′ मिनिटांचे श्वसनाचे व्यायाम !
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock