सेक्सची इच्छा कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात.पण सेक्स डिझायर कमी होण्याचे एक महत्वाचे कारण तुम्ही घेत असलेली ओटीसी औषधे देखील असू शकतात.प्रत्येक औषधाचे एक किंवा अनेक साईड इफेक्टस असतात.मात्र यातील एक साईड इफेक्ट सेक्स लाईफमध्ये तुमचा लिबीडो कमी होणे हा देखील असू शकतो.तचेस जाणून घ्या प्रिस्क्रिप्शनशिवाय वेदनाशामक औषधे खरेदी करणे सुरक्षित आहे का ?
दिल्लीच्या होप क्लिनीकचे डॉ.अजय गुप्ता यांच्या मते या औषधांमुळे तुमच्या सेक्सलाईफवर दुष्परिणाम होतो.
१.Aspirin-
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेल्या अॅस्प्रिन सारख्या पेनकिलरमुळे तुमच्या हॉर्मोन्स मध्ये बदल होतात व तुमची सेक्सची इच्छा देखील कमी होते.सेक्स करताना तुमच्या मूड मध्ये बदल होण्याचे कारण या औषधांमुळे तुमच्या हॉर्मोन्सवर झालेला दुष्परिणाम असू देखील शकतो.
२. Antihistamines-
सर्दी आणि तापावर उपचार करण्यासाठी Antihistamines हे ओवर-दी-काउंटर औषध घेण्यात येते.मात्र या औषधामुळे तुमचा लिबीडो देखील कमी होऊ शकतो.या औषधामुळे तुमच्या शरीरातील अॅलर्जी नक्कीच कमी होते पण त्याचा तुमच्या लव लाईफवर मात्र विपरित परिणाम होतो.कारण या औषधामुळे तुमची सेक्सची इच्छा तात्पुरती कमी होते.यासाठी जाणून घ्या औषधे न घेता घरच्या घरी मिळवा सर्दी – खोकल्यापासून आराम ! कसा मिळवाल.
३. Decongestants-
Decongestants हे औषध घेतल्यामुळे तुम्हाला गुंगी येते.सर्दीवरील या औषधामुळे तुम्हाला आराम मिळत असला तरी त्यामुळे तुम्हाला व्हर्जानल ड्रायनेस होऊ शकतो.
४.Anti-diarrheal औषधे-
डायरीयाच्या समस्येवर उपाय करणा-या औषधांमुळे ब्रेन-गट अॅक्सिस सह तुमचा लिबीडो कमी होऊ शकतो.
५.Anti-depressants-
Anti-depressants मुळे तुमचा मूड चांगला होतो व डिप्रेशनची लक्षणे देखील कमी होतात.पण याचा दुष्परिणाम तुमच्या सेक्स लाईफवर होतो.काही संशोधनानूसार जे लोक Anti-depressants घेतात त्यांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची निर्मिती कमी झाल्याने त्यांचा लिबीडो देखील कमी होतो असे आढळले आहे.
६.गर्भनिरोधक गोळ्या-
गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने स्त्रीच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन सह अॅन्ड्रोजन या हॉर्मोन्सची निर्मिती कमी होते ज्यामुळे हॉर्मोन्सचे असतुंलन निर्माण होते. स्त्री व पुरुष दोघांमधील लिबीडोसाठी टेस्टोस्टेरॉन हे हॉर्मोन्स अतिशय महत्वाचे असते.त्यामुळे सहाजिकच याचा थेट परिणाम इंटरकोर्स दरम्यान मिळणा-या तुमच्या आनंद व अनुभवावर होतो.जाणून घ्या या हार्मोनच्या असंतुलित प्रमाणामुळे थकवा येतो !
७.केस गळतीवर घेण्यात येणारी औषधे-
जर तुमचे केस गळत असतील व त्यावर तुम्ही औषधे घेत असाल तर सावध रहा.कारण यामुळे तुमची सेक्सची इच्छा कमी होऊ शकते.पुरुषांच्या टक्कल पडण्यावर उपचार करण्यात येणा-या औषधांमुळे त्यांच्या सेक्शुअल हेल्थ व त्यांच्या संपुर्ण आरोग्यावर विपरित परिणाम होतो.जाणून घ्या स्त्रियांमध्ये वाढणार्या केसगळतीमागे दडली आहेत ही ’10′ कारणं !
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock