Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ’3′कारणांमुळे स्त्रियांंना orgasm चा आनंद मिळत नाही

$
0
0

सेक्स ही दोघांनाही आनंद देणारी क्रिया आहे.त्यामुळे सेक्समधला आनंद स्त्री व पुरुष या दोघांसाठी देखील तितकाच महत्वाचा असतो.मात्र अनेक महिलांना सेक्स करताना ऑर्गेझम गाठणे कठीण जाते.ऑर्गेझम म्हणजे  सेक्स मधील परमोच्च आनंद !  सेक्स करताना तुमच्या स्त्री जोडीदाराला नेमके काय आकर्षित करु शकते(कामूक कांदबरी,एखादा विशिष्ट सुंगध किंवा एखाद्याची आठवण) व ती सेक्स बाबत नेमका काय विचार करते याबाबत अजूनही संशोधन सुरु आहे.असे असले तरी हे नक्कीच खरे आहे की महिलांना पुरुषांपेक्षा अधिक सेक्शूअल रिलीजची गरज असते.यासाठी सेक्स करताना तुमच्या स्त्री जोडीदाराला सेक्समध्ये ऑर्गेझम मिळण्यासाठी सहकार्य करा.जर तुम्ही तिला ऑर्गेझम देण्याचा निरानिराळ्या पद्धतीने प्रयत्न करुन देखील काहीच उपयोग होत नसेल तर मात्र त्यामागे ही काही कारणे असू शकतात.जाणून घ्या एकत्र ऑर्गेझम मिळवण्याच्या 5 खास टीप्स !

१.तिला ल्युबरिकंटची गरज आहे-

कदाचित तुमची स्त्री जोडीदार सेक्स करण्यासाठी मानसिकरित्या तयार आहे पण तो तितकाच सहज करता येतोच असे नाही. संभोगाच्या वेळेस स्त्रियांचा योनीमार्ग ओलसर होण्यास वेळ जात असेल तर ल्युबरिकंटची मदत घ्या. त्याचा  वापर करुन तिला सेक्स करताना होणारा त्रास कमी करू  शकता.यासाठी पहिल्यांदा ‘सेक्स’करताना पुरूषांनी ठेवावे या ’8′ गोष्टींचे भान !

२.उत्साहाची कमतरता-

ब-याच महिलांना ऑर्गझमचा आनंद मिळवणे कठीण जाते कारण त्या मानसिकदृष्ट्या उत्साही नसतात.जरी तुम्ही फोरप्लेमध्ये अगदी मास्टर आहात असे वाटत असले तरी कधीकधी तिला उत्तेजित करण्यासाठी तिच्या शरीराला योग्य रितीने हाताळणे गरजेचे असते. म्हणूनच जाणून घ्या  फोरप्ले मुळे स्त्रिया सेक्ससाठी प्रवृत्त होतात का?

३.तिचे वय-

Reviews in Obstetrics and Gynaecology या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानूसार तिशीतल्या महिलांपेक्षा वीस वयाच्या महिलांना सेक्समध्ये क्लायमेक्स गाठणे जास्त कठीण जाते.कारण सहाजिकच तरुण स्त्रीला बेडरुमचा अनुभव कमी असतो.त्यामुळे त्यांना सेक्स करताना सेट होण्यासाठी जास्त वेळ लागतो.तसेच या ’5′ संकेतांवरून ओळखा तिला तुमच्यासोबत सेक्स करण्यात रस नाही

लॉन्ग टर्म पार्टनर सोबत ऑर्गेझम गाठणे सोपे जाते.कारण तरुण स्त्रीया बहूतेक वेळा नविन रिलेशीनशीप मध्ये असतात.त्यामुळे तुमच्या जोडीदाराने सेक्समध्ये क्लायमेक्स गाठावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर तिला त्याबाबत बोलण्यास प्रवृत्त करा.संवाद साधल्यामुळे तिला काय आवडत आहे व तिला सेक्समध्ये काय अपेक्षित आहे हे तुमच्या लक्षात येण्यास मदत होईल.

संदर्भ-

Ambler, D. R., Bieber, E. J., & Diamond, M. P. (2012). Sexual Function in Elderly Women: A Review of Current Literature. Reviews in Obstetrics and Gynecology, 5(1), 16–27

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>