केस नियमित धुतल्यामुळे केस स्वच्छ व सुंदर दिसतात.पण धावपळीच्या काळात दररोज सकाळी केस धुणे शक्य नसते.यासाठी अनेक जणी वेळ वाचवण्यासाठी निवांतपणे रात्रीच केस धुतात.मात्र रात्री केस धुतल्यावर ते वाळवण्याचा सहाजिकच तुम्हाला कंटाळा येऊ शकतो.पण जर रात्री केस धुतले आणि ते न वाळवताच तुम्ही झोपलात तर सकाळी तुमचे केस अगदी विचित्र पद्धतीने गुंतले जातात.असे गुंतलेले केस सकाळी विंचरणे फार कठीण जाते शिवाय ते सुंदर देखील दिसत नाहीत.
यासाठी ब्युटी एक्सपर्ट जेनेट फर्नांडीज यांच्याकडून जाणून घेऊयात रात्री केस धुतल्यानंतर ते ओलेच असताना झोपण्यापूर्वी नेमकी काय काळजी घ्यावी.ज्यामुळे दुस-या दिवशी तुमचे केस सुंदर व चमकदार दिसतील.तसेच केसांचे सौंदर्य वाढवा , हेअर एक्स्पर्ट जावेद हबीबच्या विशेष टीप्स संगे !
- केसांचा अंबाडा बांधा-
रात्रीच्या वेळी धुतलेले तुमचे ओले केस फक्त विंचरुन एखाद्या सॉफ्ट हेअर बॅन्डने केसांचा डोक्यावर एक सैलसर अंबाडा बांधा.त्यामुळे जेव्हा सकाळी तुम्ही केस मोकळे सोडाल तेव्हा तुमचे केस नॅचरल लुकींग,सुंदर व चमकदार दिसतील.तसेच झोपेत होणारे केसांचे नुकसान टाळण्यासाठी खास एक्सपर्ट टीप्स !देखील जरुर करा.
- वेणी घाला-
सकाळी केस सुंदर दिसण्यासाठी तुम्ही रात्री केस धुतल्यावर केसांची वेणी घालू शकता.यासाठी तुम्ही मल्टीपल ब्रेड,फिश टेल किंवा फ्रेन्च ब्रेड असे वेण्यांचे निरनिराळे प्रकार ट्राय करु शकता.यासाठी पहा फिश टेल ( खजूर वेणी ) : उन्हाळ्यातील झटपट हेअर स्टाईल
- केसांना डीप कंडीशनींग हेअर मास्क वापरा-
ओले केस न वाळवता तसेच झोपल्यावर गुंता होणे ही अनेक महिलांची एक प्रमुख समस्या असते.जर तुम्हाला तुमच्या केसांचा गुंता झालेला नको असेल तर तुम्ही रात्री झोपताना केसांना डीप कंडीशनींग हेअर मास्क लावू शकता.पण यासाठी हेवी कंडीशनींग असलेला हेअर मास्क वापरु नका त्यापेक्षा योग्य हायड्रेटींग गुणधर्म असलेला हेअर कंडीशनींग मास्क वापरा.ज्यामुळे तुमचे केस सकाळी तेलकट होणार नाहीत. चमकदार आणि मजबूत केसांसाठी अंड्याचे घरगुती हेअरपॅक देखील जरुर ट्राय करा.
- झोपताना सॅटीन कव्हर असेलेली उशी घ्या-
झोपताना नेहमी तुम्हाला सिल्क अथवा सॅटीन पेक्षा कॉटनचे कव्हर असलेली उशी अधिक आरामदायक वाटते.पण केस धुतल्यावर मात्र तुम्ही सॅटीन अथवा सिल्क कव्हर असेलेली उशी घेऊनच झोपा.कारण उशीचे कॉटनचे कव्हर तुमच्या केसांतील आद्रता शोषून घेते ज्यामुळे तुमच्या केसांचा गुंता होऊ शकतो.तर सिल्क च्या कव्हरमुळे केसांमधील आद्रता शोषून न घेतल्यामुळे तुमच्या केसांचा गुंता होत नाही.तसेच सिल्कच्या पिलोमुळे तुमच्या केसांवर कमी दाब पडतो ज्यामुळे गुंता देखील होत नाही व हेअर क्युटीकल्सचे देखील कमी नुकसान होते.तसेच हे देखील जरुर वाचा जुनी उशी वेळेवर बदलणे का गरजेचे आहे?
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock