बाळ झाल्यानंतर तुमच्या त्याच्यामागेच सारा वेळ जातो. बाळंतपणानंतर नवमातांना पुरेशी झोप घेणे आव्हान असते.विशेषत: पहिले सहा महिने किंवा त्यानंतरही याबाबतीत तुमची स्थिती अधिकच बिकट होऊ शकते.आम्ही तुमची चिंता अधिक वाढवत नसून सत्य परिस्थितीची तुम्हाला जाणीव करुन देत आहोत.त्याचप्रमाणे दोन बाळांच्या आईसाठी तर शांत झोप घेणे खूपच कठीण असू शकते.काही जणींना बाळंतपणानंतर झोपेच्या अभावामुळे Postpartum Depression ला सामोरे जावे लागते.त्यामुळे दुस-या बाळंतपणानंतर तरी निद्रानाशाच्या समस्येवर योग्य उपाय करणे फार गरजेचे आहे.यासाठी रात्री झोप येत नाही? मग हे १० उपाय करून पहा !
यासाठी जाणून घ्या बाळंतपणानंतर निद्रानाशाच्या समस्येला कसे तोंड द्याल-
१.तुमच्या झोपेच्या वेळेचे नियोजन करा-
रात्री झोपताना बाळाची जबाबदारी थोड्या वेळ तुमचा जोडीदार,आई अथवा मदतनीस यांच्याकडे द्या.जर तुमचा जोडीदार दिवसभर काम करुन घरी थकून आला असेल तर त्यांना ही जबाबदारी देऊ नका नाहीतर दुस-या दिवशी कामावर त्यांना झोप येऊ शकते.त्यामुळे तुम्हाला बाळाची जबाबदारी अशा व्यक्तीवर सोपवावी लागेल ज्यामुळे तुम्ही शांत झोपलेले असताना बाळाची व्यवस्थित काळजी घेतली जाईल.चार तासांसाठी तुमच्या बाळाची जबाबदारी त्या व्यक्तीला द्या व तुम्ही चांगली झोप घ्या.वाचा शांत झोप मिळवण्यासाठी ‘जायफळ’ फायदेशीर !
२.जेव्हा शक्य असेल तेव्हा एखादी डुलकी घ्या-
जर तुमचे बाळ दिवसा झोपत असेल तर ही गोष्ट तुमच्यासाठी खूप चांगली आहे.पण तसे नसेल तर शक्य असेल तेव्हा एखादी डुलकी घेत जा.बाळ झोपलेले असताना तुम्ही देखील २० मिनीटे त्याच्यासोबत झोपा.काही बाळांची झोपण्याची वेळ २० मिनीटे असते व त्यांचे झोपेचे चक्र सुरळीत होईपर्यंत ते मध्ये मध्ये जागे होत असतात.त्यामुळे मिळेल तेवढा वेळ ती संधी साधून झोप घेण्याचा प्रयत्न करा.जाणून घ्याया ’9′ कारणांमुळे बाळ करते रडारड !
३.घरातील कामांसाठी इतरांची मदत घ्या-
घरातील सर्व कामे तुम्ही एकटया करु शकत नाही.विशेषत: जर तुम्ही दुस-यांदा आई झाला असाल व तुमचे पहिले बाळ देखील लहानच असेल तर मुळीच नाही.अशा वेळी स्वयंपाक व घरकामासांठी मदतनीसांची मदत घ्या.त्यामुळे तुमच्यावर कामाचा ताण येणार नाही व जरी झोप नाही आली तरी काही वेळ तुम्हाला विश्रांती घेता येईल.घरातील कामांमधून काही काळासाठी सक्तीची विश्रांती तुम्हाला बाळाची जबाबदारी पेलवण्यासाठी मदत करेल.यासाठी तुम्हांला अजून किती तास झोप आवश्यक आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? हे जरुर वाचा.
४.जेवण घेण्यास विसरु नका-
तुमची झोप कमी झाली असली तरी शरीराच्या पोषणाकडे दुर्लक्ष करु नका.फळे,फळांचा रस,सुकामेवा अशा प्रकारचा योग्य आहार घ्या.या आहारामुळे तुमच्या सुस्तावलेल्या शरीराचे चांगले पोषण होऊ शकते.यासाठी जंकफूड अथवा अति खाणे टाळा.कारण अशा पदार्थांमुळे शरीरात आळस निर्माण होतो.पुरेशी झोप नसताना असे पदार्थ खाण्याने आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
५.स्वत:ला हायड्रेट ठेवा-
कमी झोप घेतल्यावर अपु-या पोषणाप्रमाणेच डिहायड्रेशन मुळे देखील शरीराचे नुकसान होऊ शकते.यासाठी थकवा घालवण्यासाठी भरपूर पाणी प्या व शरीर हायड्रेट ठेवा.बाळासोबत असताना देखील एक एक तासांनी पाणी प्या.चहा व कॉफी मुळे तुम्हाला जागे राहण्यास मदत होईल पण त्यांचा प्रभाव अल्पकाळच टिकतो.त्यापेक्षा शक्य असेल तितके पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होईल.कारण अपु-या झोपेमुळे शरीरात विषद्रव्ये साठण्याचा दुष्परिणाम होत असतो.या टीप्सने पूर्ण होईल तुमचं नियमित 8 ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य !
६.औषधे घेण्यास विसरु नका-
बाळंतपणा नंतर घेण्यात येणा-या व्हिटॅमिन,आयर्न व कॅलशियमच्या गोळ्या तुमच्या आरोग्यासाठी व निद्रानाशाला टाळण्यासाठी खूप महत्वाच्या असतात.या औषधांचे शरीरावर निरनिराळे चांगले परिणाम होत असतात.या औषधांमुळे शरीरातील पेशींच्या पोषणाला चालना मिळते,रक्ताभिसरण चांगले होते व हाडे मजबूत होतात.या सर्व औषधांमुळे दिवसभर निद्रानाशाच्या समस्येला हाताळण्यासाठी तुम्ही सक्षम होता.
७.फिडींग पिलो खरेदी करा-
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की फिडींग पिलोमुळे तुम्हाला शांत झोप कशी मिळेल.सहाजिकच यामुळे तुम्हाला चांगली झोप येणार नाही.पण फिडींग पिलोमुळे तासनतास स्तनपान करताना चांगला आधार मिळाल्यामुळे तुम्हाला नक्कीच बरे वाटेल.कारण या फिडींग पिलोमुळे तुमच्या मानेच्या व पाठीच्या मणक्यांना पुरेसा आधार मिळेल.सहाजिकच तुमची कामे करताना देखील तुमचे शरीर मजबूत राहण्यास मदत होईल.कारण ताठ झालेली पाठ व अपूरी झोप दोन्ही असल्यास तुम्ही तुमच्या बाळाची व्यवस्थित काळजी घेऊ शकत नाही.तसेच हे जरुर वाचा बाळाने ढेकर दिल्याशिवाय त्याला का झोपवू नये ?
८.काही काळ सक्तीची झोप घ्या-
विक एन्डला बाळाचे बाबा घरी असतील तेव्हा जर तुमच्यासाठी कोणतेही काम नसेल तेव्हा जोडीदाराला बाळाला सांभाळण्यास सांगा व तुम्ही सक्तीने झोप घ्या.झोपण्याआधी बाळाची दूधाची बाटली,डायपर,दुपटी तयार करुन ठेवा जेणे करुन तुमची झोपमोड होणार नाही.
९.स्मार्टफोन वापरणे टाळा-
स्मार्टफोनमुळे तुम्हाला पुरेशी झोप घेता येत नाही.बाळ झोपलेले असताना तुमच्या भावना,फोटो व सोशल मिडीयावरील बेबी फूड रेसिपी शेअर करण्याचा मोह टाळा व बाळासोबत काहीवेळ शांत झोप घ्या.
१०.तज्ञांचा सल्ला घ्या-
निद्रानाश हे बाळंतपणानंतर नैराश्याचे एक कारण असू शकते.ज्याची लक्षणे थकवा,मूडस्वींग,बाळासाठी हानिकारक असणारे नकारात्मक विचार अशी अनेक असू शकतात.जर तुमच्या मनात अशा प्रकारच्या गोष्टी येत असतील तर निराश होऊ नका.त्यापेक्षा यासाठी मानसोपचातज्ञांचा सल्ला घेऊन तुमच्या समस्येवर योग्य उपाय शोधा. जाणून घ्या झोप कमी येण्याची ही काही कारणे
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock