अगदी काही दिवसांपूर्वीच हातापायांचे वॅक्स केल्यानंतर देखील जेव्हा तुमच्या अंगावर बारीक बारीक केस पुन्हा उगवतात तेव्हा सहाजिकच तुमची चीडचीड होते.शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी सतत वॅक्सींग व निरनिराळ्या गोष्टींवर खूप खर्च केल्यावर अनेक जणींना असे वाटू लागते की हेअर रिमुव्हल क्रीम हा यासाठी सुरक्षित व स्वस्त पर्याय आहे.फक्त महिलाच नाही तर पुरुष देखील शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी हेअर रिमुव्हल क्रीम वापरण्याचा प्रयत्न करतात.आजकाल बाजारामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या हेअर रिमुव्हल क्रीम उपलब्ध अाहेत.त्यामुळे सहाजिकच त्यातून कोणती क्रीम निवडावी? किंवा हेअर रिमुव्हल क्रीममध्ये कोणते केमिकल असू शकतात? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडू शकतात.यासाठी कोणतीही हेअर रिमुव्हल क्रीम खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी जरुर लक्षात ठेवा.तुम्हांला ठाऊक आहे का ? या ’8′ कारणांमुळे शरीरावर वाढतात अनावश्यक केस
हेअर रिमुव्हल क्रीम खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा-
दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलचे डर्माटोलॉजीस्ट डॉ.रोहीत बत्रा यांच्यामते कोणतेही डर्माटोलॉजीस्ट हेअर रिमूवल वापरण्याचा सल्ला देत नाहीत कारण त्यामुळे त्वचेवर अनेक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.असे असले तरी बाजारात अनेक प्रकारच्या हेअर रिमुव्हल क्रीम उपलब्ध असतात व अनेक लोक त्यांचा वापर देखील करत असतात.जर तुम्ही देखील एखादी हेअर रिमुव्हल वापरण्याचा विचार करीत असाल तर त्याआधी त्या क्रीमची पॅच टेस्ट घेण्यास विसरु नका ज्यामुळे ती क्रीम लावल्यावर होणारे दुष्परिणाम तुम्हाला टाळता येतील.अनावश्यक केस काढण्याच्या विविध उपचारपद्धतींचेही आहेत दुष्परिणाम !
हेअर रिमुव्हल क्रीम वापरल्याने काय होते?
हेअर रिमुव्हल क्रीमला Depilatories असे देखील म्हणतात.त्वचेमध्ये Denature हे प्रोटीन असते.हेअर रिमुव्हल क्रीम त्वचेवर चोळल्यामुळे त्वचेच्या आतील या प्रोटीनच्या रचनेत बिघाड होतो व केसांच्या बीजापासून केस वेगळे होतात.पण असे असले तरी या क्रीममुळे जसे या स्कीन प्रोटीन मध्ये बिघाड होतो तसाच याचा त्वचेवर देखील दुष्परिणाम होतो व त्यामुळे स्कीन इरीटेशन,स्कीन बर्न व खाज येण्याची समस्या निर्माण होते नैसर्गिक उपचार पद्धतीने मिळवा अंगावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती
हेअर रिमुव्हल क्रीमचा त्वचेवर काय दुष्परिणाम होतो ?
डॉ.बत्रा यांच्यामते हेअर रिमुव्हल क्रीममध्ये वापरण्यात आलेल्या केमिकलचा त्वचेवर परिणाम होऊन त्वचेवर जळजळ होऊ लागते.तसेच जर तुम्ही या क्रीमचा चेह-यावर,गुप्तांगावर अथवा इतर संवेदनशील भागावर वापर केला तर त्या भागात इरीटेशन व अॅलर्जी होण्याचा दुष्परिणाम दिसून येतो.प्युबिक एरियावरील केस काढण्यासाठी हेअर रिमुव्हल क्रीमचा वापर करावा का ?
पॅकवर दिलेल्या सुचनेच्या वेळेपेक्षा जास्तवेळ ही क्रीम त्वचेवर लावून ठेवली तर काय होते?
डॉ.बत्रा यांच्यामते प्रॉडक्टवर सांगितलेल्या वेळेपेक्षा जास्तवेळ ही क्रीम त्वचेवर लावून ठेवली तर त्या क्रीमच्या संपर्कामुळे तुमच्या त्वचेवर परिणाम होतो.
उदा.एखादी हेअर रिमुव्हल क्रीम जास्त वेळ लावल्यामुळे त्वचा भाजली जाऊ शकते.त्यामुळे तुमच्या त्वचेला खाज,सूज येऊ शकते.कधीकधी तर त्वचेवर फोड देखील येतात.विशेषत: अतिसंवेदनशील त्वच्या असलेल्या लोकांना याचा अधिक त्रास होऊ शकतो.
यामुळे त्वचा काळवंडण्याची शक्यता असते का?
सतत हेअर रिमुव्हल क्रीम वापरल्यामुळे त्वचेला जळजळ किंवा इरीटेशन झाल्यामुळे त्वचा काळी पडू शकते.त्यामुळे जर त्वचेवर त्रास जाणवत असेल तर हेअर रिमुव्हल क्रीम वापरणे ताबडतोब बंद करा व दुष्परिणामांवर योग्य उपचार करण्यासाठी डर्माटोलॉजीस्टचा सल्ला घ्या.
हेअर रिमुव्हल क्रीममुळे केसांची वाढ अधिक दाट होते का?
थ्रेडींग,वॅक्सींग,शेव्हींग,पू
हेअर रिमुव्हल क्रीम किती वेळा वापरावे?
डॉ.बत्रा यांच्यामते प्रत्येक व्यक्तीच्या केसांची वाढ निरानिराळी असू शकते.त्यामुळे या क्रीमचा वापर कितीवेळा करावा याचे उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे असू शकते.काही लोकांना हेअर रिमुव्हल दर आठवड्याला वापरावे लागते तर काही जणांना ते महिन्यातून एकदाच वापरावे लागू शकते.काहीही असले तरी जर तुम्ही हे क्रीम सतत वापरले तर तुम्हाला स्कीन इरीटेशन व स्कीन बर्न या समस्या होण्याची जास्त शक्यता असते.वाचा लेझर हेअर रिडक्शन – अंगावरचे केस कमी करण्याचा वेदनारहित उपाय !
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock