केसात कोंडा / डॅन्डरफचा त्रास जाणवत असेल तर बाजारात उपलब्ध असलेले त्यासाठीचे शाम्पू, मेथी किंवा दही यासारखे घरगुती उपाय आजमवून पाहिले असतील पण केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्टस वापरण्यापेक्षा काही नैसर्गिक उपायही वापरणं फायदेशीर आणि सुरक्षित ठरतात. याकरिता ब्युटी एक्सपर्ट शहनाझ हुसेन यांनी जास्वंदीचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. जास्वंदीचा वापर करून केसातील कोंडा कमी करण्यासाठी हर्बल इन्फ्युजन करून पहा. नक्की वाचा : केसातील कोंड्याचा त्रास कमी करण्यासाठी शहेनाझ हुसेन यांचा खास सल्ला !
जास्वंदाचे इन्फ्युजन गरम किंवा थंड अशा दोन्ही स्वरूपात करू शकता. त्यानुसार तुम्हांला जे अधिक फायदेशीर ठरेल त्याचा वापर करा. हॉट म्हणजेच गरम इन्फ्युजन करायचे असल्यास जास्वंदाची फूलं आणि पानं कपभर गरम पाण्यात बुडवून उकळा. 10-12 तास ही पानं आणि फूलं तशीच बुडवून ठेवा. त्यावर घट्ट झाकण लावून बंद करा. 10-12 तासानंतर पाणी गाळा. या गाळलेल्या पाण्याचा वापर केस आणि टाळू स्वच्छ धुण्यासाठी करा. तुमचे केस आणि केसातील कोंड्याचे प्रमाण यानुसारही तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करु शकता. याचा वापर तुम्ही केसातील कोंड्याच्या इतर समस्या कमी करण्यासाठीदेखील करू शकता. हे नक्की वाचा केसातील कोंड्यामुळे कपाळावर येणार्या अॅक्नेंवर कशी कराल मात ?
तुम्हांला केसांवर थंड स्वरूपाचे जास्वंदाचे इन्फ्युजन करायचे असल्यास तुम्ही ज्या दिवशी केस धुणार असाल त्याच्या आदल्या रात्री जास्वंदाचे इन्फ्युजन बनवावे. याकरिता थंड पाण्यात जास्वंदाची फूल आणि पानं भिजवून ठेवावतीत. यामध्ये कपभर जास्वंदाची फूल आणि पानं आणि त्याच्या सहापट पाण्याचा वापर करावा. थोडावेळ हे मिश्रण एकत्र करून पाणी गाळा. रात्रीच हे पाणी गाळून ठेवा आणि सकाळी त्याचा वापर केस धुण्यासाठी करा. गरम की थंड पाण्याने केस धुणे फायदेशीर !
जास्वंदाचे हे इन्फ्युज्ड वॉटर केसांना आणि टाळूला लावण्यासाठी कापसाच्या बोळ्याचाही वापर करू शकता. केसांचा पोत सुधारण्यासाठी इन्फ्युज्ड वॉटरच्या आधी तुम्ही हिना किंवा फूलांचा रसही मिसळू शकता.यामुळे केसांना नैसर्गिकरित्या कंडीशनिंग होण्यासाठी मदत होते.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock