Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

#गुढीपाडवा विशेष : हेल्दी टेस्टी फळांचे श्रीखंड

$
0
0

               गुढीपाडवा म्हणजे जेवणाच्या ताटात भात, भाजी, पोळी, कुरडईंसोबत गोडाला श्रीखंड हवेच ! असा अनेक घरातला नियम आहे. सकाळी घरात पूजा झाल्यानंतर कडूलिंबाचा पाला खाल्ला जातो. मग त्या कडवट पण आरोग्यदायी सुरवातीनंतर लो-फॅट दह्यापासून तुम्ही घरच्या घरीदेखील श्रीखंड तयार करू शकता. पण गुढीपाडव्याला ‘कडूलिंब’ का खातात ? हे तुम्हांला ठाऊक आहे का ?

 बाजारातल्या विकतच्या श्रीखंडापेक्षा घरात उपलब्ध असलेल्या फळांच्या मदतीने तुम्ही घरगुती आणि टेस्टी श्रीखंड नक्की बनवू शकता.  फळांच्या श्रीखंडाप्रमाणे तुम्ही गुलकंदी श्रीखंड देखील नक्की घरीच बनवू शकता.

बनवायला लागणारा वेळ : 
किती जणांसाठी तयार होईल हे श्रीखंड : 4 -5  जणांसाठी

श्रीखंडासाठी लागणारे  साहित्य – : 

  • चिमुटभर केशर
  • 1 लीटर लो फॅट गरम दूध
  • (99.7% फॅट फ्री ,बाजारात सहज उपलब्ध होते)
  • 1 कपभर लो फॅट दही
  • 4 चमचे साखर
  • 1/4 चमचा वेलची पूड
  • 2 कप फळांचे काप (सफरचंद , पपई, संत्र , द्राक्षं , अननस ) किंवा आवडीनुसार फळांचा समावेश करा.

चक्का घरी  करण्यासाठी -

घरी काचेच्या किंवा  चीनी मातीच्या भांड्यात एक  लीटर  दुधात दही टाकून विरजण लावावे.  दही तयार झाल्यानंतर मलमलच्या कापडात दही बांधून ठेवावे. किमान 3-4 तास किंवा रात्रभर घट्ट बांधलेले दही टांगून ठेवावे. म्हणजे पाणी निघून जाईल व कोरडा चक्का मिळेल.

श्रीखंड निर्मितीसाठी उत्तम प्रकारचे दही जमणे आवश्‍यक आहे.म्ह्णून  दूध हे चांगल्या प्रतीचे व उकळून घ्या. दुधात जिवाणू संख्या अधिक असल्यास दही घट्ट जमत नाही. परिणामी, होणाऱ्या श्रीखंडामध्ये पाणी सुटण्याची शक्यता असते. )

कसे बनवाल श्रीखंड - 

चक्का परातीमध्ये किंवा थाळीमध्ये घालून त्यात साखर घाला. तयार मिश्रण हाताने फेटा. त्यामध्ये केशर आणि वेलची पूड मिसळून काही वेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. श्रीखंड वाढताना त्यावर चमचाभर  फळांचे काप आणि आवश्यक असल्यास सुकामेवा भूरभूरून पानांत वाढा.

उन्हाळ्यात तेलकट पुरी आणि श्रीखंड नकोसे वाटत असेल तर केशरी फिरणी, लाल भोपळ्याची खीर यासारखे हटके आणि हेल्दी गोडाचे पदार्थही तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. सणाला गोडाच्या पदार्थांवर ताव मारण्याआधी जाणून घ्या या  गोडाच्या पदार्थांमध्ये किती कॅलरीज असतात

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles