Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

स्किनकेअर प्रॉडक्स सतत बदलणे योग्य आहे का?

$
0
0

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत त्वचेची काळजी घ्यायला विशेष वेळ मिळत नाही. नैसर्गिक घरगुती उपाय करणे नेहमीच शक्य होते, असे नाही. मग त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी आपण ब्युटी प्रॉडक्सचा आधार घेतो. बाजारात उपलब्ध असलेले नवनवीन ब्युटी प्रॉडक्स आणि जाहिराती पाहून आपल्याला देखील नवीन ब्युटी प्रॉडक्स वापरण्याचा मोह होतो. परंतु, ते वापरणे कितीपण योग्य आहे ? का सतत एकच स्किन प्रॉडक्ट वापरणे योग्य ठरेल? हे आपल्याला पडणारे प्रश्न आम्ही डर्मोटॉलॉजिस्ट डॉ. आदिती घोषाल यांना विचारले. जाणून घेऊया त्यांनी यावर दिलेले उत्तर.

सुंदर त्वचेसाठी ब्युटी प्रॉडक्स वापरण्याबरोबरच सकस, संतुलित आहाराची देखील गरज असते.  टवटवीत त्वचा मिळवण्यासाठी ही १० फळे आणि भाज्या खा !

नेहमी एकच स्किन प्रॉडक्ट वापरण्यास काही हरकत नाही. पण वय, हार्मोनल चेंजेस, ताणतणाव यामुळे त्वचेत बदल होतात. तसंच प्रदूषण, उन्हामुळे देखील त्वचेला हानी पोहचते. अशावेळी मात्र गरजेप्रमाणे त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उदा. इतर वेळेपेक्षा हिवाळ्यात त्वचा अधिक कोरडी होते तर उन्हाळ्यात अधिक तेलकट. उन्हाळ्यात तेलकट त्वचेलाही तजेलदार बनवेल हा घरगुती फेसपॅक !

त्वचा कोरडी झाल्यावर त्यावर मॉईश्चरायझर लावा त्यामुळे त्वचा मऊ होईल. तरीही त्वचेवर काही परिणाम दिसून न आल्यास ते प्रॉडक्ट तुमच्यासाठी परिणामकारक नाही, हे ओळखा. अशावेळी तुम्ही स्किनकेयर प्रॉडक्ट बदलू शकता. त्वचा मॉश्चराइज करण्याचे घरगुती उपाय

स्किनकेयर प्रॉडक्ट सतत बदलू नये, असा अनेकांचा समज आहे. पण जर एखादे प्रॉडक्ट तुम्हाला सूट न झाल्यास त्वचेला जळजळ होऊ शकते, त्वचा कोरडी होवून ब्रेकआऊट्स होऊ शकतात. तसंच तुम्हाला इतर काही त्वचेच्या समस्या जाणवल्या तर लगेचच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. यावर डर्मोटॉलॉजिस्ट तुमची समस्या, लक्षणे जाणून योग्य ती ट्रीटमेंट करतील किंवा तुम्हाला सूट होणारी प्रॉडक्स देतील. नक्की बघा: व्हिडिओ: काळवंडलेल्या त्वचेपासून सुटका मिळवण्याचे उपाय

जर तुम्ही तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार स्किनकेयर प्रॉडक्ट बदलेले नाही तर रोज एकच स्किनकेयर प्रॉडक्ट वापरणे फायदेशीर ठरणार नाही. तसंच कोणत्याही प्रॉडक्टचा अति वापर टाळावा. केमिकल्स युक्त फेसपॅक, स्क्रब अधिक प्रमाणात वापरल्यास त्वचा खराब होईल. झटपट टीप्स – कसा कराल घरच्या घरी चेहरा स्वच्छ ?

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>