क्षयरोगाच्या रुग्णांनी आहाराकडे लक्ष देणं फार गरजेचे आहे. तो अधिक पोषक असावा. आहाराकडे लक्ष न दिल्यास कुपोषण होण्याची शक्यता असते. पोषक आणि संतुलित आहार घेतल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. घटलेले वजन पुन्हा वाढण्यास मदत होते. पण क्षयरोगातून बाहेर पडताना आहार कसा असावा याबाबतचा खास सल्ला शिवडी येथील टीबी हॉस्पिटल्सचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. ललित आनंदे यांनी दिला आहे. क्षयरोगाच्या या लक्षणांशी सामना करताना आहाराची हे पथ्यपाणी नक्की सांभाळा.
- प्रोटीनयुक्त पदार्थांंचा समावेश वाढवा - आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांंचा समावेश वाढवा. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. याकरिता आहारात अंड्याचा समावेश वाढवा. तुम्ही शाकाहारी असाल तर ज्वारी, बाजरी,नाचणी यांचा समावेश वाढवा. यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीनचा पुरवठा होतो. आहारात डाळींंचा समावेश करा. त्यामधूनही आरोग्यदायी पद्धतीने शरीराला होणारा प्रोटीनचा पुरवठा वाढतो.
- मायक्रो न्युट्रीएंट्सचा आहारात पुरेसा समावेश करा - व्हिटॅमिन ए, ई आणि डी 3 या मायक्रो न्युट्रीएंट्सचा आहारात मुबलक समावेश करा. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. सी -फूड ( मासे ) यांमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक असते. तसेच व्हिटॅमिन डी 3 सप्लिमेंंटसचा आहारातील समावेश वाढवा. नियमित किमान अर्धा तास कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरा. यामुळे नैसर्गिकरित्या शरीराला व्हिटॅमिन डीचा पुरवठा होतो.
- अॅन्टीऑक्सिडंटयुक्त पदार्थांंचा समावेश वाढवा : व्हिटॅमिन ए,सी व ई युक्त पदार्थ अॅन्टीऑक्सिडंटयुक्त असतात. यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्सचा धोका कमी होतो. तसेच शरीराचे घातक घटकांपासून रक्षण होते. म्हणूनच मुबलक अॅन्टीऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
तुम्हांला क्षयरोगाचे निदान झाले असेल तर आहारातील हे पदार्थ टाळाच – :
- तळकट पदार्थांमध्ये सॅच्युरेटेट फॅट अधिक असतात. यामुळे क्षयरोगीचे आरोग्य अधिक बिघडते. पोटात क्रॅम्स येणं, डायरियाचा त्रास व थकवा जाणवणं हा त्रास वाढतो.
- तुमच्या आहारातून ट्रॅन्स फॅटी अॅसिड कमी करा. मार्गारिनयुक्त पदार्थ, बाजारात विकत मिळणारे केक, पेस्ट्री,कूकीज टाळा.
- रिफाईन्ड कार्बोहायड्रेट म्हणजेच मैदा आणि साखर प्रमाणात खावा. यामधून कॅलरीज मिळतात पण त्यात काहीच पोषकता नसते.एनरिचड ब्रेड, सिरिअल्स,पास्ता यामध्ये रिफाईन्ड कार्बोहायड्रेट्स सहज आढळतात.त्यामुळे आहारातून त्याचा समावेश कमी करा.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock