लिंबू बहुगुणी आहे. त्याचे अनेक सौंदर्यवर्धक व आरोग्यदायी फायदे आपण जाणतो. तसंच त्वचेवरील काळे डाग, टँनिंग दूर करण्यासाठी लिंबू फायदेशीर ठरते, हे तुम्हाला माहीतच असेल. परंतु, लिंबाचा अति वापर त्वचेला हानी पोहचवतो. US-trained skin specialist, डॉ.किरण लोहिया यांच्या सल्ल्यानुसार लिंबामुळे काही लोकांना अॅलर्जी व त्वचेला जळजळ होते. लिंबूचा वापर हा नैसर्गिक असला तरी त्यामुळे अॅलर्जीचा धोका असतो. लिंबूपाणी- ‘किडनीस्टोन’ची समस्या दूर करणारा नैसर्गिक उपाय !
- लिंबू अॅसिडिक आहे:
लिंबामुळे त्वचेवरील काळे डाग जावून त्वचेला नवी तजेला मिळतो. परंतु. लिंबात pH कमी असते म्हणजेच ते अॅसिडिक असते. परिणामी त्वचेला हानी पोहचू शकते. लिंबाचा टोनर किंवा क्लिन्जर म्हणून नियमित वापर करणे टाळा. त्यामुळे त्वचेची जळजळ होवून त्वचा लाल होऊ शकते. लिंबू – रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचा उत्तम घरगुती उपाय !
- लिंबामुळे त्वचा सेन्सिटिव्ह होते:
लिंबामध्ये फोटोसिन्थेसायझिंग कंपाऊंड असल्यामुळे त्वचेचा संपर्क सूर्यप्रकाशाशी (यूव्ही किरणांशी) आल्यास त्वचा अधिक सेन्सिटिव्ह होते. त्यामुळे हायपरपिगमेंटेशन होऊ शकते आणि त्यावर उपाय म्हणून आपण लिंबाचा वापर करतो. तसंच लिंबाच्या अति वापरामुळे पिंपल्स येऊ शकतात आणि ते जाण्यासाठी तुम्हाला महिनाभर वाट पहावी लागेल. घरगुती फेसपॅकने करा, मुरूमांचा समूळ नाश !
परंतु, सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस घेणे फायदेशीर ठरते. बॉडी डिटॉक्स करण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. मध – लिंबुपाण्याचे जादुई गुणधर्म
कॉस्मॅटिक डर्मोटॉलॉजिस्ट डॉ. जयश्री शरद यांनी त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करताना काही टीप्स पाळण्याचा सल्ला दिला.
- सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार पदार्थांचा वापर करा. लिंबाच्या अतिवापराने वाढतील या ’6′ समस्या
- तुमची त्वचा जर कोरडी व रुक्ष असेल किंवा तुम्ही अॅक्नेवर औषधे घेत असाल तर त्वचेवर लिंबासारख्या फळांचा रस लावू नका. त्यामुळे त्वचा डिहायड्रेट होवून अधिक सेन्सिटिव्ह होईल. त्वचा अचानक संवेदनशील होण्याची ही आहेत ५ कारणे
- जर तुम्ही वापरत असलेले पदार्थ खूप जुने असतील किंवा पॅक बनवण्यासाठी वापरणारी भांडी, चमचा किंवा तुमचे हात अस्वच्छ असल्यास त्वचेवर बॉइल्स येऊ शकतात, इन्फेकशन होऊ शकतं. झटपट टीप्स – कसा कराल घरच्या घरी चेहरा स्वच्छ ?
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock