आनंदी सहजीवनाच्या अनेक रहस्यांपैकी एक रहस्य म्हणजे रॉकिंग सेक्स लाईफ. हा आनंदी सहजीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे असे म्हटले जाते की आनंददायी सेक्स लाईफ तुम्हाला दीर्घ काळापर्यंत एकमेकांशी बांधून ठेवते. तसंच आनंदी सहजीवन आणि आरोग्यदायी जीवनासाठी सेक्स लाईफ महत्त्वाचे कार्य करते. सेक्स करण्याचे ’5′ आरोग्यदायी फायदे !
पण तुमच्या मते आनंदी सेक्स लाईफचे रहस्य काय आहे? काही लोकांना सेक्सचा कालावधी तर काहींना सेक्सचे प्रमाण (किती वेळा सेक्स करता) हे महत्त्वाचे वाटते. म्हणजेच आनंदी सेक्सलाईफ हे तुम्ही किती वेळ सेक्स करता आणि किती वेळा शारीरिकरीत्या जवळ येता यावर अवलंबून आहे. यावर आम्ही मुंबईच्या केईएम हॉस्पिटलचे सेक्सशुल मेडिसिन डिपार्टमेंटचे हेड डॉ. प्रकाश कोठारी यांच्याशी संवाद साधला.
डॉ. कोठारी यांच्या सल्ल्यानुसार सेक्स ही काही स्पर्धा नाही की त्याचे प्रमाण मोजले जाईल. खरंतर दोघांनी अनुभवलेल्या सुखद क्षणांत आनंद सामावलेला आहे. म्हणून त्याचा कालावधी किंवा प्रमाण याने काही फरक पडत नाही. त्याचबरोबर अधिक वेळा सेक्स करणं हा काही तुमच्या शारीरिक क्षमतेचा, आरोग्याचा किंवा जोम, उत्साहाचा संकेत नाही. सेक्सचा अधिक वेळ आनंद घेण्यासाठी ’10′ हॉट टीप्स !
तुमचे सेक्स करण्याचे प्रमाण अधिक असेल पण तुमच्या पार्टनरला त्याचा आनंद घेता येत नसेल किंवा ते एन्जॉय करता येत नसेल तर तुमचे सेक्सलाईफ आनंदी होऊ शकत नाही. आनंदी सेक्सलाईफचा संबंध नात्यातील ओढ, प्रेम, जिव्हाळा,आकर्षण याच्याशी आहे. तुम्ही सेक्स किती वेळा करता त्यापेक्षा कसे करता यावर सेक्सचा आनंद अवलंबून असतो. दोघांना त्यातून किती आनंद, सुख मिळते आणि त्यातून तुम्ही किती समाधानी होता हे अधिक महत्त्वाचे आहे. स्त्रियांमध्ये सेक्सची तीव्र इच्छा कधी होते ?
यावर अधिक माहीती देताना डॉ. कोठारी म्हणाले, सेक्सला संस्कृत मध्ये संभोग म्हणतात. याचा अर्थ फार सुंदर आहे. संभोगचा अर्थ एकमेकांबद्दलची असलेली भावना, ओढ आणि समानता. जर एकच व्यक्ती सेक्सचा आनंद घेत असेल तर त्यात समानता आणि एकमेकांबद्दलची ओढ दिसत नाही. त्याला एकभोग किंवा विषमभोग असे म्हणतात. या ’5′ संकेतांवरून ओळखा तिला तुमच्यासोबत सेक्स करण्यात रस नाही
म्हणून एकमेकांना सेक्सचा सुखद अनुभव देण्यात, ते अधिक एक्ससिटिंग आणि इंटरेस्टिंग करून पार्टनरचा मूड तयार करणे हे आनंदी सेक्सलाईफचे रहस्य आहे. सेक्स दरम्यान स्त्रीयांच्या ‘त्या’ नाजूक भागांना हात लावताना…
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock