Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मूगडाळ डोसा- हेल्दी आणि टेस्टी रेसिपी

$
0
0

आपल्याला रोज नाश्ताला नवीन पदार्थ खावेसे वाटतात. रोज काहीतरी नवीन बनवणे शक्य नसले तरी वीकएंडला काहीतरी नवीन खावे अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठी नवीन नवीन पर्याय आपण शोधत असतो. जरूर वाचा: चटपटीत आणि हेल्दी ‘एग रोल्स’

मूगडाळीत फायबर्स, प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. परंतु, मूगडाळ जास्त खाल्ली जात नाही. डाळ किंवा सलाडमधूनच त्यातील पोषकघटक मिळतात. काहींना तर त्याची चव आवडत नसल्यामुळे ते देखील टाळले जाते. मग मूगडाळीचा आहारात समावेश करण्याचा एक टेस्टी आणि सोपा पर्याय म्हणजे मूगडाळ डोसा. कमी वेळात बनणारा हा डोसा टेस्टी आणि हेल्दी आहे. मुलांचा आहारात ब्रोकोलीचा सामावेश करण्यासाठी खास टेस्टी रेसिपीज

साऊथची ही प्रसिद्ध डिश उपमासोबत सर्व्ह केली जाते. मग जाणून घेऊया हा यम्मी डोसा घरी कसा बनवायचा ते. टेस्टी डोशाचे ’5′ हेल्दी फायदे !

साहीत्य:

  • मूगडाळ किंवा हिरवे मूग- १ कप
  • आलं किंवा  लसूण- चमचाभर
  • हिरव्या मिरच्या- २-३
  • जिरं- १ छोटा चमचा
  • तेल/तूप- आवश्यकतेनुसार
  • मीठ- चवीनुसार
  • हिंग- चिमूटभर
  • बारीक चिरलेला कांदा- अर्धा कप
  • बारीक चिरलेली कोथिंबीर- अर्धा कप

कृती:

१. मूगडाळ धुवून घ्या आणि रात्रभर भिजत ठेवा. (१ कप मूगडाळीसाठी ४-५ कप पाणी घ्या. ) नक्की वाचा: मुलंही आवडीने खातील अशा पालकाच्या ’5′ रेसिपीज !

२. सकाळी डाळीतील पाणी काढून त्या डाळीत हिरव्या मिरच्या, जिरं, हिंग, मीठ आणि आलं घालून वाटा. थोडं पाणी घालून बारीक मऊसर पेस्ट बनवा. ’6′ अस्सल मराठमोळे आणि हेल्दी पदार्थ !

३. पॅनमध्ये तेल किंवा तूप घालून त्यावर तयार पीठ मोठ्या चमच्याने पसरवा. त्यासाठी आतून सुरुवात करून बाहेरच्या दिशेला गोलाकार पीठ पसरवा. नक्की बनवून बघा:  दह्याचे दडपे पोहे

४. तेल किंवा तूपाचे काही थेंब डोशाच्या मध्ये व बाजूला घाला. त्यावर बारीक चिरलेला कांडा आणि कोथिंबीर घाला आणि डोसा ब्राउन होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. सातूचे लाडू – मधूमेही आणि हृद्यरोगींसाठी हेल्दी नाश्त्याचा पर्याय !

५. त्यानंतर डोसा मस्त क्रिस्पी होईल. मग कोथिंबीर किंवा खोबऱ्याच्या चटणी अथवा उपमासोबत डोशाची चव चाखा. चवीष्ट आणि आरोग्याला उत्कृष्ट असे हे ’5′ पदार्थ नक्की चाखा लहान मुलांना बनवताना हा डोसा अजून थोडा टेस्टी करण्यासाठी त्यावर खिसलेलेल चीझ पसरून डोसा एका बाजूनेच शिजवा.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>