अन्नाप्रमाणे पाणी काही दिवसांनंतर खराब होत नाही. त्यामुळे तुम्ही दैनंदिन कामासाठी, पिण्यासाठी आवश्यक तितके पाणी भरून ठेऊ शकता. परंतु, तुम्ही पाणी कशाप्रकारे, कशात भरून ठेवता आणि कसे वापरता यावर त्याचे दूषित होणे अवलंबून असते. पाण्यामुळे अनेक आजार पसरतात. त्यापासून तुमचे आणि तुमच्या कुटुंबियांचे संरक्षण करण्यासाठी पाणी योग्य पद्धतीने भरून ठेवणे, शुद्ध करणे आणि वापरणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी योग्य पद्धती जाणून घ्या.
पिण्याचे पाणी भारण्याआधी तुम्हाला स्वःताला आणि तुमच्या कुटुंबाला दिवसभरासाठी किती पाण्याची आवश्यकता आहे हे माहिती असणे महत्त्वाचे आहे. यावरून तुम्हाला किती पाणी भरायचे आहे याची कल्पना येईल. पाणी दूषित न करता ते भरून ठेवण्यासाठी या टीप्स पाळा.
- साधारणपणे एका प्रौढ व्यक्तीला दिवसाला ३.८ लिटर पाणी पिण्यासाठी लागते. जर तुमच्या कुटुंबात चार सदस्य असतील तर दिवसाला १५.४ लिटर किंवा त्यापेक्षा थोडे जास्त पाणी पिण्यासाठी वापरले जाईल. आणि जर तुम्हाला तीन दिवसाचे पाणी भरून ठेवायचे असेल तर साधारणपणे ४५.६ लिटर पाणी लागेल.
- किती पाणी भरून ठेवायचे आहे हे एकदा तुम्हाला कळले की त्यासाठी पुरेसं भाडं घ्या. भरपूर पाणी भरून ठेवण्यासाठी स्टील किंवा तांब्यांची भांडी उत्तम ठरतील. त्यात पाणी खराब होणार नाही आणि खूप काळ सुरक्षित राहील. असे मुंबईच्या वृद्धी वेलनेस अँड होमिओपॅथी सेंटरचे डॉ. भावी मोदय यांनी सांगितले. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे 10 ‘आरोग्यदायी’ फायदे !
- डॉ. भावी यांच्या सल्ल्यानुसार पाणी भरून ठेवण्यासाठी अजून एक चांगला पर्याय म्हणजे बाटली. बाटल्यांमध्ये पाणी भरून ठेवल्याने ते प्यायला देखील सोपे होते. परंतु, पाणी भरून ठेवण्यासाठी चांगल्या प्रतीचे प्लॉस्टिक असलेल्या किंवा स्टीलच्या बाटल्या वापरा. साध्या प्लॉस्टिक बॉटल्स वापरणे टाळा. कारण पाण्यात त्याचा काही अंश जावून पाणी दूषित होऊ शकते.
- जर तुम्ही प्लॉस्टिकच्या बाटल्या वापरणार असाल तर त्या BPA फ्री असणे आवश्यक आहे. त्या विशेषतः खूप दिवसांकरता पाणी भरून ठेवण्यासाठी तयार केल्या जातात.
- नळाला येणारं पाणी फिल्टर करून थेट बाटल्यांमध्ये भरा. त्यासाठी पाईपाचा वापर करू नका. पिण्याच्या पाण्यासाठी करा या ’5′ आरोग्यदायी आणि आकर्षक बाटल्यांची निवड !
- ड्रम, गॅलनमध्ये पाणी भरून ठेवण्यासाठी पाईप वापरणे योग्य आहे. परंतु, तो पाईप स्वच्छ असणे गरजेचे आहे. पाणी भरताना ड्रम, गॅलन झाकून ठेवणे गरजेचे आहे. कारण हवेमुळे पाणी दूषित होऊ शकते.
- मोठी भांडी भरताना ती काठोकाठ भरू नका. झाकण लावण्यापूर्वी ती एका ठराविक पातळीपर्यत भरा. त्यामुळे पाण्यात हवेचे बुडबुडे येणार नाहीत.
- पाण्याची भांडी प्रकाशापासून लांब ठेवा. तसंच आग आणि जंतुनाशकांचा कमी वापर होत असलेल्या भागात ठेवणे सुरक्षित ठरेल.
पाणी शुद्ध करण्याचे योग्य मार्ग:
9. पाणी कितीही कालावधीसाठी साठवायचे असले तरी ते योग्य पद्धतीने शुद्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण त्याचमुळे पाणी जंतुविरहित व स्वच्छ राहू शकते. पाणी शुद्ध करण्याचे तीन मार्ग आहेत-उकळणे, वॉटर प्युरिफायरचा वापर करणे किंवा लिक्विड ब्लिचिंग प्रोसेस.
10. पाणी उकळणे ही पाणी शुद्ध करण्याची अत्यंत प्राथमिक पद्धत आहे. एका स्वच्छ भांड्यात पाणी ओता आणि कमीतकमी १५ मिनिटे ते उकळवा. नंतर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्या. नंतर स्वच्छ सुती कपड्याचा वापर करून ज्या भांड्यात पाणी भरून ठेवायचे आहे त्यात गाळा आणि त्यावर झाकण ठेवा.
11. आजकालच्या मॉडर्न जीवनशैलीत घरोघरी वॉटर प्युरिफायर्स असतात. त्यामुळे अधिक कष्ट न घेता पाणी शुद्ध होते. पण तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायला हवी. ती म्हणजे प्युरिफायरची कॅण्डल दर सहा महिन्यांनी बदलणे गरजेचे आहे नाहीतर पाणी दूषित होऊ शकते, असे डॉ. भावी म्हणाल्या.
12. पाणी शुद्ध करण्यासाठी लिक्विड ब्लिचिंग वापरणे आजकाल दुर्मिळ झाले आहे. परंतु, जर तुम्ही ही पद्धत वापरणार असाल तर ते सुगंध, वासविरहित असणे गरजेचे आहे. एक लिटर पाण्यासाठी लिक्विड प्युरिफायरचे चार थेंब वापरा. त्यानंतर पाणी ढवळा आणि १५ मिनिटे तसेच ठेवा. पाणी पिताना त्यातून प्युरिफायरचा सौम्य वास आल्यास पाणी व्यवस्थित शुद्ध झाले नाही असे समजा. अशावेळी तुम्हाला परत ती प्रक्रीया करावी लागेल.
पाणी भरून ठेवायची भांडी कशी स्वच्छ कराल?
13. पाणी भारण्याआधी भांडी किंवा बाटल्या नीट स्वच्छ करणे अतिशय महत्त्वाचे आहे. हार्श डिटर्जेन्टने स्टील किंवा तांब्याची भांडी (विशेषतः आतून) घासणे टाळा. त्याऐवजी सौम्य लिक्विड सोप वापरा.
14. सौम्य लिक्विड सोपने भाडं घासून ५-१० मिनिटं तसंच ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
15. बाटल्या देखील याच पद्धतीने स्वच्छ करा. बाटल्या आतून स्वच्छ करण्यासाठी ब्रश वापरा. पाणी भरण्याआधी बाटली पूर्णपणे स्वच्छ करा. बाटल्यांची झाकणं देखील आतून बाहेरून धुण्यास विसरू नका.
16. ड्रम, गॅलनमध्ये पाणी भरण्यासाठी वापरले जाणारे पाईप देखील वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे आहे. लिक्विड सोप पाण्यात घालून ते पाणी पाईप मध्ये सोडा. पाईपाची दोन्ही टोकं बंद करा. दोन्ही डोकं एकत्रित पकडून पाईप गोलाकार गुंडाळा. त्यामुळे ते पाणी संपूर्ण पाईपभर फिरेल. नंतर एक टोकं मोकळे करून ते पाणी वाहून जाऊ द्या. नंतर स्वच्छ पाणी पाईपातून वाहून घालवा. त्यामुळे संपूर्ण पाईप स्वच्छ होईल.
पिण्याचे पाणी योग्य पद्धतीने कसे वापरावे?
17. बाटलीतून पाणी पिताना विशेषतः वरून पाणी पिताना एक घोट घेतल्यानंतर बाटलीचे झाकण बंद करा. जर तुम्हाला बाटलीला तोंड लावून पाणी पिण्याची सवय असेल तर स्वतःची वेगळी बाटली ठेवा आणि इतरांनी तोंड लावून प्यायलेल्या बाटलीने पाणी पिणे टाळा. या टीप्सने पूर्ण होईल तुमचं नियमित 8 ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य !
18. ड्रम, गॅलन मधून पाणी काढताना त्यात हात बुडवून पाणी काढू नका. त्यासाठी लांब दांड्याच्या भांड्याचा वापर करा. परंतु, ते भांड पाण्यात बुडवण्याआधी ते स्वच्छ असल्याची खात्री करून घ्या. किंवा हे सोपं करण्यासाठी नळ असलेल्या ड्रम, गॅलनचा वापर करा. कोमट की थंड पाणी ? निरोगी स्वास्थ्यासाठी कोणता पर्याय निवडाल
19. पाणी भरण्यासाठी मातीच्या मडक्याचा वापर करणार असलात तर पाणी भरण्यापूर्वी ते पूर्णपणे रिकामे असल्याची खात्री करा. कारण मडक्याच्या तळाशी माती असण्याची शक्यता असते. उकळलेले,गाळलेले की बाटलीबंद पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे ?
20. खूप वेळापासून उघड्या असलेल्या भांड्यातून पाणी पिणे टाळा.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock