Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ’3′कारणांमुळे अचानक चक्कर येते !

रक्त पाहिल्यानंतर काहींची शुद्ध हरपते तर काही जण अगदी चांगले हसत-बोलत असताना अचानक कोसळतात. शारीरिक किंवा मानसिक धक्का बसल्यानंतर अनेकजण चक्कर येऊन काही वेळ आपली शुद्ध हरपतात.मग नेमके हे होण्यामागे काय कारण असते हे जाणून घेण्यासाठी फोर्टीस हॉस्पिटल्स मुंबईचे कन्सलटंट फिजिशियन डॉ.प्रदीप शहा यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.

अचानक चक्कर येऊन शुद्ध हरपण्याची ही 3 कारणं असू शकतात असा डॉ. शहा यांचा सल्ला आहे.

वेसोवेगल कॉज Vasovagal cause : हे तरूण मुलांमध्ये भावनिक धक्क्यामुळे आढळून येणारे एक कारण आहे.इंजेक्शन दिल्याने किंवा रक्त पाहिल्याने काही मुलं चक्कर येऊन पडतात. प्रामुख्याने वेगन नर्व्ह वर परिणाम झाल्याने रक्तदाब कमी होतो. हृद्याचे ठोके मंदावतात परिणामी चक्कर येते. vasovagal fainting हे वेदनेमुळे किंवा भावनिक / मानसिक धक्क्यामुळे होऊ शकतो.

Postural hypotension – उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना औषधांमुळे काही वेळेस रक्तदाब कमी होऊन शुद्ध हरपते. काहीवेळेस रुग्ण ब्लड प्रेशरच्या गोळ्या सांगितलेल्या मात्रेपेक्षा अधिक किंवा अधिक कॉसन्ट्रेशनच्या घेतल्यास यामुळे रक्तदाब कमी होतो. परिणामी चक्कर येते.  postural hypotension या समस्येमध्ये अचानक उठल्याने किंवा बसल्याने किंवा झटकन झोपेतून उठल्याने चक्कर येते. यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. रक्तदाब कमी झाल्याने चक्कर येते.

Heart arrhythmia – हृद्याच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास, हृद्याच्या ठोकांमध्ये अनियमितता निर्माण झाली की हृद्यविकाराच्या रुग्णांना चक्कर येऊ शकते. यालाच Stoke-Adams attack म्हणतात. सुमारे वयाची  50-60 वर्ष पार केलेल्या वयोवृद्धांमध्ये हा त्रास जाणवतो.त्यामुळे चक्कर येण्याचा त्रास वारंवार जाणवत असल्यास किंवा हृद्यविकाराचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

चक्कर येण्याचा त्रास क्वचित आढळत असेल तर फारसे चिंतेचे कारण नाही. हा त्रास गंभीर समस्या नाही. काही वेळेस ग्रॅव्हिटेशनल प्रेशरमुळे रक्तदाब कमी होतो आणि चक्कर येते. मात्र फारच क्वचित प्रसंगी रक्तदाब कमी होऊन मेंदूला इजा होते. अशावेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण हे चिंतेचे कारण असू शकते.

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>