प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनूसार भारतामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे.दररोज या विकारामुळे १,००० माणसे मृत्यूमुखी पडतात किंवा दररोज दर तीन मिनीटाला दोन माणसे या प्राणघातक विकाराचे बळी पडत असतात.भारतात प्रतिवर्षी २.२ दशलक्ष टीबी केसेस निर्माण होतात तर ३.५ दशदक्ष लोकांच्या थुंकीमध्ये टीबीचे विषाणू सापडत असतात.यासाठी वेळीच जाणा क्षयरोगाची लक्षणं !
मात्र असे असले तरी भारतात डॉट उपचार प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे टीबीच्या उपचार दरात लक्षणीय वाढ झाली आहे.पण ही उपचार पद्धती घेण्यासाठी तुम्हाला त्याबाबत पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. नक्की वाचा : क्षयरोग – एक गंभीर मात्र आटोक्यात येणारा आजार !
टीबी उपचार कोर्स पुर्ण करणे का आवश्यक आहे?
टीबी वरील उपचार सुरु केल्यावर काही आठवड्यांनी टीबीची लक्षणे हळूहळू कमी होऊ लागतात त्यामुळे काही रुग्ण औषधांचा कोर्स पुर्ण न करताच तो बंद करतात.खरेतर उपचार घेताना जरी तुम्हाला बरे वाटू लागले तरी तुम्ही उपचार घेणे अर्ध्यावरच बंद करु नये.कारण तुम्हाला बरे वाटू लागले असले तरी देखील टीबीचे विषाणू तुमच्या शरीरात असतातच त्यामुळे त्यांची वाढ परत होण्याची शक्यता अधिक असते.यासाठी क्षयरोग पुर्ण बरा करण्यासाठी तुम्हाला सांगण्यात आलेला टीबीचा उपचार कोर्स पुर्ण करा.तसेच जाणून घ्या कशी वाढवाल तुमची रोगप्रतिकारशक्ती ?
जर तुम्ही टीबी वर उपचार घेत असाल तर टीबी पुर्ण बरा करण्यासाठी तुम्हाला कमीतकमी सहा महिने उपचार घ्यावे लागू शकतात.पण जे रुग्ण विश्वास न ठेवता अनियमित उपचार घेतात त्यांच्यावर या उपचारांचा योग्य परिणाम होत नाही.अशा मुळे टीबीची पुनरावृत्ती होण्याची व मल्टी ड्रग्ज रेसिस्टंट टीबीची शक्यता अधिक वाढते.ज्यामध्ये स्टॅन्डर्ड टीबी औषधांचा परिणाम न झाल्यामुळे रुग्णाला पुढे त्रासदायक व खर्चिक टीबी उपचार घ्यावे लागतात.
DOTS अथवा डॉट उपचार पद्धती म्हणजे नेमके काय?
DOTS म्हणजे Directly Observed Treatment वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशनच्या शिफारसीनूसार टीबीच्या नियंत्रणासाठी डॉट उपचार प्रणाली हा एक छोटा कोर्स राबविण्यात येतो.या उपचारांमध्ये सहा ते आठ महिन्यांमध्ये टीबी निश्चितपणे पुर्ण बरा करण्यासाठी उपचार देण्यात येतात.देशभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये हे उपचार विनामुल्य उपलब्ध असतात.
डॉट उपचार पद्धती यशस्वी करण्यासाठी हे ५ प्रमुख घटक फार महत्वाचे असतात-
१.राजकीय बांधिलकी-
राष्ट्रीय पातळीवर,जिल्हा स्तरावर व अगदी स्थानिक विभागात देखील हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी आर्थिक मदत,कायदा,नियोजन,ह्युमन रिसोर्सेस,व्यवस्थापन व प्रशिक्षण यांच्यात वाढ व सातत्य असण्याची गरज आहे.
२.अचूक निदान चाचण्यांद्वारे रोगाचे निदान करणे-
कल्चर व drug susceptibility test (DST) या चाचण्यांद्वारे रुग्णाच्या थुंकीचे सुक्ष्म परिक्षण केले जाते.टीबी रुग्णाचे निदान करण्यासाठी ही पद्धत सर्वत्र राबविण्यात येते.त्यामुळे यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळासह सुसज्ज प्रयोगशाळेची गरज असते.
३.उपचारांचे पालन करण्यासाठी सुपरवाइज ट्रिटमेंट गरजेची असते-
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशनच्या मार्गदर्शक तत्वानूसार रुग्णांचे वर्गीकरण व नियोजन करण्यासाठी देशभरात स्टर्डडाइज उपचार पद्धत राबवण्यात येते.सुपरवाइज ट्रिटमेंट हा या डॉट उपचार उपक्रमाचा पाया आहे.ज्यामध्ये डायरेक्ट ऑब्जर्वेशन ऑफ थेरपी (DOT) समाविष्ट आहे.ज्यामुळे एखादा रुग्ण आरोग्य कर्मचारी अथवा एखाद्या प्रशिक्षित व्यक्तीच्या उपस्थितीत औषधे घेऊ शकतो.यामुळे रुग्णाला औषधे नियमित घेणे व उपचार पुर्ण करण्यास मदत होते.
४.प्रभावी औषधांचा पुरवठा व व्यवस्थापन प्रणाली-
टीबीच्या नियंत्रणासाठी गुणवत्ता प्रमाणित औषधे अखंड व निरंतर पुरवण्यात येणे आवश्यक असते.ज्यामुळे रुग्णांना सक्तीने व विनामुल्य औषधांचा पुरवठा करता येऊ शकतो.
५.देखरेख व अहवाल-
टीबी उपचार उपक्रम यशस्वी होण्यासाठी या प्रणालीवर सतत देखरेख असणे गरजेचे असते.
डॉट उपचार प्रणालीच्या अंतर्गत भारतात दर महिन्याला सरासरी १.२५ लाख रुग्णांना उपचार देण्यात येतात.राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत ५३१ जिल्हातील ४४६ जिल्हामध्ये या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते.त्यातील २९२ जिल्हे हे एससीसी अथवा शॉर्ट कोर्स केमोथेरपी (Short Course Chemotherapy)जिल्हे आहेत.एससीसी मध्ये इन्टेन्सीव्ह फेस व कन्टीन्युशन फेस या दोन टप्प्यांमध्ये एकूण सहा ते आठ महिने रुग्णांवर उपचार देण्यात येतात. टीबी प्रतिबंधक औषधांमध्ये Streptomycin (S),Isoniazid (H),Ethambutol (E), Rifampicin (R) व Pyrazinamide (Z) या औषधांचा समावेश असतो.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock