आपल्या सर्वांना स्वत:ला फूडी अथवा खवय्या म्हणवून घेणे फार आवडते.पण जरा थांबा…कारण त्याआधी तुम्हाला नताशा विषयी जाणून खूप गरजेचे आहे.
नताशाने आईच्या आग्रहात्सव स्वयंपाक शिकण्यासाठी दादरच्या प्रसिद्ध कॅटरींग कॉलेजमधून कॅटरींगचे प्रशिक्षण घेतले.नताशाच्या आईला तिच्या नाटक वेडामुळे ती कदाचित भविष्यात बॉलीवूड अॅक्टर होईल अशी चिंता सतावत होती.नताशाने कॅटरींग कॉलेजमध्ये स्वयंपाकाचे धडे उत्तमरीत्या गिरविले.त्यामुळे नताशा नेहमीच कुकींगबाबत उत्साही असते.मुंबईत कुकींगचे धडे गिरवल्यानंतर नताशाने काही हॉटेल्स व रेस्टॉरन्ट मधून स्वत:च्या या प्रोफेशनला सुरुवात केली.
लग्नानंतर नताशा दिल्लीला गेली जिथे तिच्या करीयरला एक वेगळे वळण मिळाले.नताशाने तिथे तुर्कीश,स्वीडीश व बेल्जीयन दूतावासाच्या राजदूतांचे सामाजिक सचिव म्हणून काम पाहिले.तिथे निरनिराळ्या देशांमधील पंतप्रधान व अध्यक्ष अशी मान्यवर मंडळी भेटी देत असत.नताशाकडे त्यावेळी या मान्यवरांसाठी असलेले कार्यक्रम व त्यांच्या खानपान व्यवस्थेचे आयोजन करण्याची प्रमुख जबाबदारी असे.नताशाच्या मते यामुळे तिला या मान्यवर मंडळीसाठी त्यांच्या पर्सनल शेफकडून बनवून घेतले जाणारे पदार्थ शिकता आले.अर्थातच त्यामुळे अन्न हे नेहमीच तिच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग ठरले.
तिच्या समस्येची सुरुवात-
ही समस्या हळूहळू तिच्या जीवनात प्रवेश करीत होती.तिच्या कामाचा ताण,भिन्न प्रकारची शहरी संस्कृती यामुळे तिच्या जीवनात अनेक बदल घडत होते.त्यात तिच्या वैवाहिक जीवनात नवरा व सासरच्या मंडळीकडून होणारा त्रास हा धडकी भरवणारा होता.अयोग्य आहार घेण्याच्या सवयी पासून जीवनात घडणा-या प्रत्येक गोष्टीचा तिच्या आयुष्यावर परिणाम होत झाला.यामुळे तिच्या शरीरात ताण-तणावाचे प्रमाण वाढू लागले व इतरांप्रमाणे नताशाने देखील या गोष्टींकडे दुर्लक्ष केले.
चुकीचे निदान एक धक्कादायक प्रकार-
२०१० च्या आसपास नताशाला शरीरात चुकीच्या लक्षणांचा अनुभव येऊ लागला.त्या काळात तिने काहीही खाल्ले तर तिला शरीरात काहीतरी टोचल्यासारख्या वेदना होत असत.या वेदना तिच्या डाव्या खांद्यामध्ये एका विशिष्ट भागात होत असत.नताशा त्यावेळी ३३ वर्षांची होती सहाजिकच तिने काळजी पोटी बेंगलोरमधल्या उत्तम ऑर्थोपेडीकची भेट घेतली.त्यांनी तिला एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला व तिच्या स्नायूबंधांमध्ये काहीतरी दुखापत झाल्याचे सांगितले सहाजिकच यावर तिने विश्वास ठेवला.तिच्यावर सहा महिन्यांच्या इन्टेन्सिव्ह स्पोर्ट्स फिजीओ थेरपीसह दोन री कन्सट्रक्टिव्ह शस्त्रक्रिया करण्यात आल्या.अर्थातच हा सर्व प्रकार फारच खर्चिक असल्याने तिला यातून लवकर बरे व्हायचे होते.
पण ऐवढे सर्व काही करुन देखील तिच्या शारीरिक स्थितीत काहीच बदल झाला नाही.तिला प्रचंड वेदना सहन कराव्या लागतच होत्या त्यामुळे ती डॉक्टरांनी दिलेल्या पेनकिलरवर पुर्णपणे अवलंबून होती.तिने तिच्या या समस्येबाबत त्या डॉक्टरांकडे तक्रार केली.त्यावेळी तिच्या डॉक्टरांनी तिला काहीही झालेले नसून ती फक्त पेनकिलरच्या आहारी गेली असल्याचे तिला सांगितले.नताशाची परिस्थिती दिवसेदिवस खालावत होती.तिचे वजन ३८ किलो झाले,हिमोग्लोबिन ४ वर घसरले व ती आता पाणी देखील पिऊ शकत नव्हती.निराश झालेल्या नताशाने त्या डॉक्टरविरुद्ध तक्रार नोंदविण्याचे ठरविले पण तिचे डॉक्टर घाबरुन लंडनला पळून गेले.त्यानंतर नताशा देखील चांगले उपचार मिळावेत यासाठी स्वीडनमध्ये गेली.पण काहीही फायदा झाला नाही त्यामुळे ती परत पुण्यात आली.अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर व अनेक वेळा अल्ट्रासाउंड,एक्स-रे,सोनोग्रा
डॉ.भालेराव यांनी नताशाचे आयुष्य कसे वाचविले-
जगभरात उपचारांसाठी प्रवास करुन देखील काहीच उपयोग न झाल्याने हताश झालेल्या नताशाने तिच्या नातेवाईकांच्या आग्रहास्तव एक शेवटचा उपाय म्हणून पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये जाण्याचे ठरविले.जिथे तिच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळाली.ती सांगते, “ एके दिवशी मी हॉस्पिटलमध्ये बेडवर वज्रासनामध्ये पुढच्या दिशेेने पाठ वाकवून बसले होते कारण फक्त तसे बसले तरच मला काही काळ वेदनांपासून आराम मिळत असे.माझ्या खोलामध्ये मी एकटीच होते तेव्हा अचानक एक अनोळखी व्यक्ती माझ्या खोलीत आली व माझ्या या समस्येचा अभ्यास करु लागली.जेव्हा माझे वडील तिथे आले तेव्हा त्या व्यक्तीने स्वत:ची ओळख लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.भालेराव अशी करुन दिली.व त्यानंतर त्यांनी माझ्या शरीरात नेमके काय झाले अाहे याविषयी सांगण्यास सुरुवात केली.ते म्हणाले की माझ्या बसण्याच्या स्थितीवरुन त्यांना असे वाटत होते की माझ्या पोटात अल्सरचा रक्तस्त्राव होत असावा ज्यामुळे माझ्या खांद्यामध्ये वेदना होत आहेत व खाल्लेले अन्न पचत नाही आहे.त्यावेळी मी व माझे बाबा दोघेही अचंबित झालो कारण त्यांनी माझ्या समस्येचे अचूक वर्णन केले होते.”
जेव्हा डॉक्टरांनी तिच्या शरीराचे लेप्रोस्कोपी द्वारे परिक्षण केले तेव्हा त्यांना तिच्या पोटामध्ये अल्सर व ट्यूमर आढळले.याचा अर्थ असा होता की त्यांना तिच्या पोटातील आतडे संपुर्णपणे काढावे लागणार होते.तसेच नताशाचे आयुष्य वाचविण्यासाठी हे तातडीने करणे आवश्यक होते.
नताशाच्या मते नऊ तासांच्या दीर्घ शस्त्रक्रियेनंतर तिचे संपुर्ण पोट अथवा आतडे काढून टाकण्यात आले.तिचा जीव जरी वाचला असला तरी आता तिचे आयुष्य मात्र बदलले होते.कारण आता तिच्या कडे स्वत:ला हळूहळू मृत्यूच्या ताब्यात सोडणे अथवा संघर्ष करुन जगणे हे दोनच पर्याय उरले होते.तिने तिच्या आईवडीलांसाठी दुसरा पर्याय निवडला व तिचा जगण्यासाठी असलेला संघर्ष सुरु झाला.
तिच्या या दुर्मिळ समस्येचे मुळ कारण ताण-तणाव हे होते-
तिच्या समस्येचे कारण तिच्यावरचा ताण होता हे जेव्हा तिला समजले तेव्हा तिला अर्थातच खूप मोठा धक्का बसला.कारण जेव्हा आपण ताणात असतो तेव्हा आपल्याला डोकेदुखी,पाठदुखी,झोपमोड अशा समस्या होतात.पण तिच्या बाबतीत हा ताण निराळ्या पद्धतीने समोर आला होता.याबाबतीत डॉक्टरांनी तिला सांगितले की आपल्या शरीरात मेंदू व पोट हे प्रमुख अवयव असतात.त्यामुळे ताणाचा त्यांच्यावर थेट परिणाम होत असतो.तिच्या शरीरात ट्यूमर होण्याचे एकमेव कारण तिच्यावर असलेला ताण हेच होते.हे जरुर वाचा सलंब सर्वांगासन- ताण दूर करण्याचा उपाय
पोटाविना आयुष्य-
आता नताशाला भुकच लागत नाही.तिला असे वाटते की तिच्या सारखीच समस्या असलेल्या त्या ७ जणांचा मृत्यु हा केवळ उपासमारी मुळे झाला असावा.ती सांगते तिच्या सारख्या फुडी अथवा खवैयीला भुकच न लागणे हा प्रकार धक्कादायक आहे.पोटच नसल्यामुळे तिला खाण्याची इच्छा होत नाही.ती जे काही खाते ते एक तासाच्या आत बाहेर टाकले जाते.तसेच पोट नसल्याने तिला व्हिटॅमिन बी देखील मिळू शकत नाही.ज्याचा परिणाम थेट तिच्या स्मरणशक्तीवर होतो.त्यामुळे आता तिची स्मरणशक्ती खूप कमी झाली आहे.
मात्र आता ती एक चांगले आयुष्य जगत आहे.तिचे शरीर हळूहळू सुधारत आहे.नताशाला दिवसभरात सहा ते सात वेळा खावे लागते व तिचा आहार तिच्या डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली असतो.
The Gutless Foodie -
तुम्हाला असे वाटू शकते की तिच्या या समस्येमुळे तिच्या कुकींगवर नक्कीच परिणाम झाला असेल.पण नताशा खरी खवैयी आहे.कारण तिने तिचे कुकींगचे पॅशन फक्त जपलेच नाही तर ती आता तिच्या हेल्थी,स्वादिष्ट व नयनरम्य रेसिपीज The Gutless Foodie या नावाने फेसबूक व इन्स्टाग्रामवर हजारोंना पाठवून त्यांना प्रोत्साहीत करीत असते.ती तिच्या अगदी साध्या व शरीराला योग्य पोषण देणा-या रेसिपींसाठी खूप प्रसिद्ध आहे.ती सांगते तिच्यासाठी स्वयंपाक ही गोष्ट भावनिक व परमेश्वराची उपासना करण्यासारखी आहे.
अगदी मालवणी पद्धतीचा चिकन मसाल्या पासून ते व्हेज थाळी पर्यंत व क्रॅम्बल एगपासून तिच्या निरनिराळ्या स्पेशल हेल्थी पॅनकेक पर्यंतच्या तिच्या खाद्यप्रवासावर नजर टाकली तर तिच्या या भयंकर समस्येबाबत कोणालाही साधी कल्पना देखील येऊ शकणार नाही.
ती सांगते, “तुम्ही अन्नाला फार कमी महत्व देता त्यामुळे काहीही विचार न करताच कोणतेही अन्न खाता.पण मी माझ्या या अनुभवातून नेमके काय खावे हे जरुर शिकले आहे.मी मुठभर फ्राईज खाण्यापेक्षा रोस्ट चिकन खाणे जास्त पसंत करते कारण मला शरीराला जगण्यासाठी आवश्यक असणा-या प्रोटीनची किंमत आता समजली आहे.” नताशाचे वजन आता ४६ किलो आहे.ती या सर्वातून एक गोष्ट नक्कीच शिकली आहे की ताण-तणाव ही आयुष्यातील फार भितीदायक गोष्ट असून त्यामुळे आयुष्यात कोणताही अनर्थ घडू शकतो.यासाठी ती नकारात्मक विचार व नकारात्मक माणसे यांच्यापासून दूर राहून हा ताण कमी करण्याचा सतत प्रयत्न करीत असते.कारण वेळीच हा ताण दूर न करणे म्हणजे धोक्याला आमंत्रण देण्यासारखे आहे.यासाठी ती सल्ला देते “शरीरावर प्रेम करा व सकारात्मक विचार करा”.यासाठी वाचा या योगमुद्रेने कामाचा ताण कामाच्या ठिकाणीच विसरा !