Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

डोळे चिकटण्यामागे नेमके कारण काय ?

$
0
0

मी ३० वर्षांची महिला असून गेल्या २ दिवसांपासून माझ्या डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटून रहात आहेत. असं साधारणपणे सकाळी उठल्यावर होतं. पण हा त्रास मला दोन दिवसांपासून होत आहे. असे मला या आधी कधी झाले नव्हते. हा कोणत्या डोळ्यांच्या विकाराचा संकेत आहे का? असे कशामुळे होते? यासाठी मला नेत्रचिकित्सक (ophthalmologist) चा सल्ला घेण्याची गरज आहे का? मला खूप काळजी वाटते. कृपया यावर काही उपचार सांगा.

या प्रश्नाचे उत्तर न्यू दिल्लीच्या शार्प साईट सेन्टरचे नेत्रचिकित्सक डॉ. कमल बी. कपूर यांनी दिले. आयड्रॉप्स घालताना ही काळजी नक्की घ्या !

आपल्या डोळ्यातून पिवळसर रंगाचा चिकट स्त्राव निघतो. तो हानीकारक नसतो. हा शरीराच्या नैसर्गिक सुरक्षा संस्थेचा एक भाग आहे. डोळ्यातून निघणाऱ्या स्त्रावामागे अनेक करणे आहेत. त्यापैकी काही कारणं ही हानीकारक नाहीत, तर काही कारणं डोळ्यांच्या विकारांचा संकेत देतात. डोळ्यांवरील ताण हलका करणारे घरगुती उपाय

सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्यांच्या कडेला येणारा स्त्रावाला eye gunk म्हणतात. आजकाल वाढते प्रदूषण, कामाचे स्वरूप यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी जाणून घ्या: कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य ?

परंतु, डोळे चिकटण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. पाहिलं म्हणजे खूप तेलकट त्वचा असणे. जर तुमची त्वचा अतिशय तेलकट असेल तर त्वचेवरील sebaceous glands ला चालना मिळते व त्यामुळे अधिक तेल स्त्रवते. परिणामी डोळ्यातून निघणारा स्त्राव पापण्यांवर जमा होतो आणि डोळे चिकटतात. डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी या ’7′ सवयी दूर ठेवा

दुसरे कारण म्हणजे झोपेत असताना डोळ्यात बॅक्टरीयांचा शिरकाव झाल्यास डोळे चिकटतात. परंतु, immune cells किंवा व्हाईट ब्लड सेल्स डोळ्यात शिरकाव करणाऱ्या बॅक्टरीयांपासून संरक्षण करतात. त्यामुळे immune cells जाडसर पिवळा स्त्राव तयार करतात. तो चिकट असतो. नक्की वाचा: डोळ्यांमधील शुष्कता कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय !

परंतु, हे नैसर्गिक असल्यामुळे यात चिंतेचे काही कारण नाही. पण जर डोळ्यात चिकट पदार्थ तयार होण्यासोबत डोळे लाल होत असतील किंवा डोळ्यांना खाज येत असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. त्यामुळे बॅक्टरील किंवा व्हायरल कोणत्या प्रकारचे इन्फेकशन आहे, ते समजेल. जरूर वाचा: पापणी फडफडण्यामागील ’8′ कारणं !!

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>