पूर्वी मासिक पाळीत कपड्याचे पॅड वापरले जात होते. अजूनही काही महिला त्याचा वापर करतात. परंतु, भारतीय महिला अधिकतर सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. त्याप्रमाणात tampons आणि menstrual cups अधिक वापरले जात नाहीत. तर कपड्याचे पॅड गावात, ग्रामीण भागात वापरले जातात. साडी, टॉवेल, नॅपकिन्स, बेडशीट्स पासून बनवलेले पॅड्स वापरण्यास योग्य आणि स्वस्त असतात. त्याचप्रमाणे त्यामुळे पर्यावरणाला देखील कोणतीही हानी पोहचत नाही. परंतु, काही वेळेस ते वापरणे गैरसोयीचे ठरते. तसंच त्याबद्दल अनेक गैरसमज महिलांच्या मनात असतात.
कपड्यांचे पॅड वापरणे आरोग्यसाठी चांगले असतात का?
सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्यास सुलभ आणि सुरक्षित असल्याने ते प्रामुख्याने वापरले जातात. परंतु याचा अर्थ असा नाही की कपड्यांचे पॅड वापरणे चांगले नाही. जरूर वाचा: सॅनिटरी पॅड्समुळे सर्व्हायकल कॅन्सर होतो का ?
न्यू दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलच्या Consultant Gynaecologist आणि Unit Head डॉ. उमा वैद्यनाथन यांच्या सल्ल्यानुसार जुन्या साड्या, टॉवेल, नॅपकिन्स इत्यादींचे पॅड्स वापरण्याने आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही. परंतु ते स्वच्छ धुणे गरजेचे आहे. तसंच कपड्यांच्या पॅडची स्त्राव शोषून घेण्याची क्षमता सॅनिटरी नॅपकिन्स पेक्षा कमी असते. त्यामुळे ते सतत बदलावे लागतात. पण ते देखील स्त्रावाच्या प्रमाणावर अवलंबून आहे. मासिकपाळीच्या दिवसात किती वेळाने सॅनिटरी पॅड बदलणे गरजेचे आहे?
पॅड्ससाठी कोणत्या प्रकारचा कपडा वापरावा यावर काही बंधन नाही. परंतु कॉटनचा कपडा वापरणे अधिक चांगले ठरेल. कारण त्यामुळे योनीमार्गात हवा खेळती राहील. त्याचप्रमाणे सुती कपड्याची शोषण क्षमता इतर कपड्यापेक्षा अधिक असते. परंतु, खूप जुना कपडा वापरणे टाळा. कारण त्यामुळे अॅलर्जी होण्याची शक्यता असते. मासिकपाळीबद्दल मुलींच्या मनातील ’10′ प्रश्नांवर तज्ञांची खास उत्तरं !!
कपड्यांचे पॅड वापरण्याचा एक तोटा म्हणजे ते लवकर ओले होतात. म्हणून ते रात्रीच्या वेळेस वापरणे गैरसोयीचे ठरते. तसंच पॅड खूप ओला झाल्यानंतर डाग पडण्याची भीती असते व योनीजवळील भाग खूप वेळ ओल्या वातावरणात राहिल्यामुळे इन्फेकशनचा धोका वाढतो. हा धोका कमी करण्यासाठी मासिक पाळीच्या काळात योग्य स्वच्छता राखा. पाणी आणि साबणाचा वापर करून पॅड्स स्वच्छ धुवा आणि नैसर्गिकरित्या ते सुकू द्या. मासिक पाळी दरम्यान पाळा या १० स्वच्छता टीप्स
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock