Quantcast
Channel: » Marathi
Viewing all 1563 articles
Browse latest View live

या सहज सोप्या उपायाने वाढवा शुक्राणूची संख्या !

$
0
0

भारतीय पुरुषांमध्ये वंध्यत्व ही वाढत चाललेली समस्या आहे. आपली बदललेली जीवनशैली हे यामागचे कारण आहे. पण याची कल्पना बऱ्याचजणांना नाही. याचबरोबर टाईट अंडरवेअर घातल्याने वंधत्व येण्याचा धोका वाढतो. तसंच गरम पाण्याने अंघोळ केल्यास किंवा सोना बाथ घेतल्याने देखील इंफेर्टीलिटीचा धोका वाढतो. याचीही अनेकांना माहिती नाही. केइएम हॉस्पिटल आणि जी. एस. मेडिकल कॉलेज मुंबईचे होनर्री प्रोफेसर आणि सेक्शुअल मेडिसिन डिपार्टमेंटचे हेड डॉ. राजन भोसले यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार गुप्त भागाची स्वच्छता कोमट पाण्याने करावी. नक्की वाचा : या ’5′ व्यवसायातील पुरूषांमध्ये इन्फ़र्टीलिटीचा धोका अधिक असतो !

ट्रक ट्रायव्हर सतत गाडी चालवत असतात आणि अति उष्णतेच्या सान्निध्यात असल्याने त्यांना वंध्यत्व येऊ शकते. खेळाडू जे ट्रेनिंग घेताना सतत जलद गतीने हालचाली करत असतात त्यांना देखील लो स्पर्म काउंटमुळे येणाऱ्या इन्फर्टिलिटीच्या समस्येला सामोरे जावे लागते. नक्की वाचा: Sperm Count कमी होण्यामागील ’17′ कारणं !

जर तुम्हाला देखील ही समस्या असेल तर डॉ. राजन भोसले यांनी यावर परिमाणकारक अशी टीप दिली आहे. यासाठी गुप्त भाग बर्फाच्या थंड पाण्याने धुवावा किंवा रोज १५ मिनिटे बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवा. डॉ. भोसले यांच्या म्हणण्यानुसार या उपायाने अनेकांना फायदा झाला आहे. याचे कारण असे की टेस्टिकल जे शुक्राणूंची निर्मिती करतं, त्याचं तापमान शरीराच्या तापमानापेक्षा एक किंवा दोन अंश कमी असतं. आणि हे तापमान स्पर्म काउंट करण्यासाठी योग्य असतं. तापमानात थोडसं जरी वाढलं तरी शुक्राणूंच्या निर्मितीत अडथळा येतो. त्यामुळे स्पर्म काउंट कमी होतो. टेस्ट्सचे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा कमी असल्याने ते शरीराबाहेर असतात. म्हणूनच गरम पाण्याने अंघोळ केल्याने किंवा सोना बाथ घेतल्याने टेस्ट्सचे कार्य मंदावते आणि वंधत्वाचा धोका वाढतो. जरूर वाचा:  अश्वगंधा – पुरूषांमधील इन्फर्टिलीटीचा त्रास दूर करण्याचा रामबाण उपाय !

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


पुरूषांना अधिक हॅन्डसम करतील या ’7′ब्युटी ट्रीटमेंंट्स !

$
0
0

सध्या पुरुषांमध्ये देखील मेल ग्रुमींग व सौदर्यांबाबत अधिक जागरुकता वाढू लागली आहे.अधिक आकर्षक दिसण्यासाठी पुरुष स्त्रीयांप्रमाणेच सौदर्योपचार करुन घेतात.दिल्लीच्या नॅशनल स्कीन सेंटर मधील डॉ.तनेजा यांच्या मते सध्या अनेक पुरुष फेशियल व क्लिन-अप करुन घेताना आढळतात तर अनेक जोडप्यांना त्यांच्या लग्न प्रसंंगी प्रि-वेडींग पॅकेजमधील खास उपचार करुन घेणे आवडते.

पुरुषांच्या चेह-याचा आकार व त्वचा स्त्रीयांच्या चेह-याच्या आकार व त्वचेपेक्षा वेगळी असते.त्यामुळे पुरुषांवर करण्यात येणारे सौदर्योपचार वेगळे असतात.पुरुषांची त्वचा जाड व केसाळ असते.त्यामुळे त्यांच्या त्वचेचा प्रकार,संवेदनशीलता,त्वचा समस्या,गरज यानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येतात.

स्त्री अथवा पुरुष दोघांमध्ये देखील त्वचा तजेलदार दिसण्यासाठी करण्यात येणारे व अॅन्टी एजींग उपचार हे समान असू शकतात.फक्त त्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल अथवा ऑरर्गेनिक पील,लेझर एनर्जी व इन्टेन्टसीटी,बोटोक्स व फिलर्स प्रत्येकाच्या त्वचेच्या गरजेनुसार निरनिराळे असू शकतात.पुरुष ब-याचदा चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी,अ‍ॅक्नेची भीती घालवण्यासाठी,अपघातानंतर आलेले व्रण काढण्यासाठी,त्वचा अधिक तजेलदार करण्यासाठी,केमिकल पील यासारखे सौदर्योपचार करण्यात येतात.अशा वेळी त्यांच्या समस्येनुसार योग्य त्वचातज्ञांचा सल्ला घेऊन त्यांच्यावर सौदर्योपचार करण्यात येतात.

दिल्लीच्या नॅशनल स्कीन सेंटरचे डायरेक्टर,डर्मोटोलॉजीस्ट  डॉ.नवीन तनेजा यांच्या सल्लानुसार पुरुषांसाठी करण्यात येणारे हे काही सौदर्योपचार-

डर्मल फिलर्स-

डर्मल फिलर्स हा उपचार त्वचेवरील स्कार्स व रिंकल्स या सारख्या समस्या दूर करण्यासाठी करण्यात येताे.आधुनिक पद्धतीनुसार यासाठी Restylane, Perlane, Juviderm ultra, Juviderm ultra plus व Juviderm XC चा वापर करण्यात येतो.त्वचेवर सुरकुत्या व अ‍ॅक्नेचे व्रण असल्यास हे फिलर्स त्वचेमध्ये इंजेक्शन द्वारा सोडण्यात येतात.हा उपचार सहन करण्यासारखा असून त्यामुळे त्वरीत परिणाम दिसून येतो. नक्की वाचा : तेलकट त्वचेसाठी 5 उपयुक्त फेसवॉश

बोटोक्स-

बोटोक्स हे एक नैसर्गिक प्रोटीन असून त्यामुळे चेह-यावरील स्नायू पुर्ववत झाल्याने सुरकुत्या कमी होतात.बोटोक्समुळे आयब्रोजवळील आडव्या फ्रोन लाईन्स,कपाळावरील आडव्या रेघा,डोळ्यांच्या कोप-याजवळ असलेल्या सुरकुत्या,नाकाच्या खाली असलेल्या बनी लाईन्स नाहीशा होतात.

केमिकल पील्स-

चेह-याच्या त्वचेवरील आऊटर लाईन्स काढण्यासाठी केमिकल पील मध्ये सेद्रींय फळांचे अॅसिड सोल्यूशन वापरण्यात येते.या फेशियल पील मुळे त्वचेचा पोत सुधारतो व त्वचा अधिक मुलायम होते.चेह-यावर डाग,सुरकुत्या व असमान पिंगमेंटेंशन असल्यास हा उपचार लाभदायक ठरतो.

मेसोथेरपी-

या थेरपीमध्ये त्वचेच्या खालील थरात विटामिन,मिनरल्स,औषधे व अमिनो अॅसिड असलेले वेदनारहीत इंजेक्शन दिले जाते.या थेरपीमुळे केसांची वाढ,चेहरा व मानेला तजेलदारपणा,चेहरा उठावदार दिसणे हा फायदा होतो. जाणून घ्या नवरदेवांसाठी खास ’7′ एक्सपर्ट ब्युटी टीप्स !

फोटो फेशियल-फोटोथेरपी अथवा लाईट थेरपीमुळे त्वचेला कृत्रिम तजेला येतो.सुरकुत्या,पिंगमेंटशेनचे डाग आणि वयोमानानूसार येणारी इतर काही लक्षणे असल्यास या उपचारांचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.

लेझर स्कीन रिज्यूवेशन-

आजकाल लेझर उपचार करुन सहज त्वचेचा वरचा थर काढून टाकण्यात येतो.या उपचारांमुळे त्वचेमध्ये टाईटनींग इफेक्ट येतो.त्वचा मुलायम होते व त्वचेवरील डाग कमी होतात.त्वचेची छिद्रे मोठी झाली असल्यास लहान करता येतात.लेझर उपचारांचा रिंकल,फाईन लाईन्स,फोरडेड क्रिजींग व काऊज फिट या समस्या देखील फायदा होतो.

डार्क सर्कल ट्रिटमेंट-

जर तुमच्या त्वचेवर हायपर पिंगमेंटेश मुळे डार्क सर्कल्स आले असतील तर लवकरात लवकर चांगल्या एखाद्या त्वचातज्ञाचा सल्ला घ्या.कारण ते तुम्हाला याबाबत योग्य उपचार करण्याचा सल्ला देऊ शकतील.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Breast pump –उपयोग,फायदे आणि मर्यादा

$
0
0

बाळाला स्तनपान करण्याचे अनेक फायदे असतात.स्तनपानामुळे बाळाचे पुरेसे पोषण होते.स्तनपानामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते.मात्र आजकाल करीयरसाठी स्त्रीयांना बाळंतपणानंतर लगेच घराबाहेर पडावे लागते.त्यामुळे त्यांना बाळाला स्तनपान करण्यासाठी मर्यादा येतात.अशा वेळी तुम्हाला ब्रेस्टपंपचा नक्कीच फायदा होऊ शकतो.घराबाहेर पडणा-या नवमातांसाठी ब्रेस्टपंप वरदान ठरु शकते.यासाठी नवमातेला ब्रेस्टपंपचा उपयोग व फायद्यांविषयी  माहीती असणे आवश्यक आहे.ब्रेस्टपंप विषयी अधिक जाणून घेण्यासाठी ही माहीती जरुर वाचा.

ब्रेस्टपंपचा कसा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?

ब्रेस्टपंपच्या सहाय्याने तुम्ही बाळासाठी तुमचे दूध काढून साठवून ठेऊ शकता व त्यामुळे तुम्ही बाळाजवळ नसलात तरी बाळाला तुमचे दूध मिळू शकते.ब्रेस्टपंपमुळे तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावरही तुमच्या बाळाला तुमच्या दूधाची कमतरता भासत नाही.केवळ काम करणा-याच नव्हे तर घरी रहाणा-या बाळाच्या आईला देखील या ब्रेस्टपंप मुळे एखाद्या महत्वाच्या कामासाठी वेळ काढता येऊ शकतो.एखाद्या बाळाला जन्मानंतर दूध चोखण्यास त्रास होत असेल अशा वेळी देखील ब्रेस्ट पंप फायद्याचा ठरु शकतो.प्रिमॅच्यूर बाळाला ठराविक काळाने वेळेत दूध देण्यासाठी देखील या ब्रेस्टपंपचा तुम्हाला फायदा चांगला फायदा होतो. जाणून घ्या स्तनपान करणाऱ्या मातांच्या आहारात असावेत हे ‘६’ पदार्थ !

चांगला ब्रेस्टपंप कसा निवडाल?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आईची गरज व वापर यानूसार ब्रेस्टपंप निवडा.

इंटरनॅशनली सर्टिफाईड प्रेगन्सी,लेक्टेशन अॅन्ड चाईल्ड न्यूट्रीशियन काउंसलर सोनाली शिवलानी यांच्या मते जर तुम्हाला कधीतरीच ब्रेस्टपंप वापरायचा असेल तर तुम्ही मॅन्युअल पंप खरेदी करु शकता.पण जर तुम्हाला डिलीव्हरी नंतर पुन्हा तुमच्या नोकरीवर रुजू व्हायचे असेल आणि तुमचे बाळ सहामहिन्यांपेक्षा लहान असेल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक ब्रेस्टंपंप वापरणे योग्य ठरेल.ब्रेस्टपंप निवडताना तो पंप तुमच्या स्तनाग्रांवर योग्य रितीने बसेल व तुम्हाला आराम मिळेल अशा पद्धतीचा निवडा.चांगल्या दर्जाच्या ब्रेस्टपंप मधून दूध काढताना जास्त वेदना होत नाहीत.इलेक्ट्रॉनिक ब्रेस्टपंप वापरताना तो स्तनांग्रांवर बसवून मशिन सुरु करावे लागते त्यामुळे दूध पंपाला जोडलेल्या उपकरणात जमा होते.इलेक्ट्रॉनिक ब्रेस्टपंपच्या सहाय्याने दोन्ही स्तनातून १५ मिनीटामध्ये दूध काढले जाते.जर तुम्हाला यासाठी खुपच कमी वेळ मिळत असेल तर तुम्ही ऑटोमेटीक ड्यूअल पंप वापरु शकता. नक्की वाचा जाणून घ्या नवमातांचे दूध वाढवतील आयुर्वेदाने सुचवलेले हे ’5′ घरगुती उपाय

मॅन्यूअल ब्रेस्ट पंप मध्ये मात्र तुम्हाला दूध सक्शन पंपाच्या सहाय्याने दूध स्तनामधून पिळून काढावे लागते.मॅन्यूअल पंपाने दूध काढण्यासाठी खुप वेळ व कष्ठ लागतात.मॅन्यूअल पंपाच्या सहाय्याने दोन्ही स्तनांमधील दूध काढण्यास ४५ मिनीटे लागतात.

सोनाली यांच्या मते ब्रेस्टपंपची निवड करताना अधिक स्पीड असलेला व बाळाप्रमाणे दूध ओढण्याची क्रिया करणारा ब्रेस्टपंप निवडा ज्यामुळे तुम्हाला अधिक आराम मिळेल.

जर तुम्हाला रोज ब्रेस्टपंप वापरावा लागणार असेल तर प्रथम ब्रेस्टपंप वापरण्याआधी  एकदा ब्रेस्टपंपने दूध काढण्याचा सराव करा.सुरवातीला स्पीड कमी ठेऊन सराव करा त्यानंतर पंपाचा वेग वाढवा.सराव केल्याने दररोज तुम्ही शांतपणे व आरामात दूध काढू शकता.

प्रत्येक वेळी वापर केल्यानंतर मात्र ब्रेस्टपंपचा प्रत्येक भाग स्वच्छ व निर्जंतुक करण्यास विसरु नका.

ब्रेस्टमिल्क साठवून ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता?

बाळासाठी ब्रेस्टमिल्क साठवण्याचे अनेक मार्ग आहेत. दूध साठवून ठेवताना या गोष्टी जरुर लक्षात ठेवा.

  • बाळासाठी ब्रेस्टमिल्क साठवताना ते चांगल्या स्टीलच्या भांड्यात अथवा मिल्क स्टोरेज बॅग्ज मध्ये साठवणे गरजेचे असते.सोनाली यांच्या मते.दूध साठवण्यासाठी काचेचे भांडे घेणे टाळा कारण काचेला दूधातील पेशी चिकटतात व त्यामुळे त्या बाळापर्यंत पोहचू शकत नाहीत.
  • स्तनांमधील दूध काढल्यानंतर ते सामान्य तापमानामध्ये चार तास राहू शकते.सोनाली यांच्या मते जर यापेक्षा अधिक काळ दूध साठवण्याची गरज असेल तर ते फ्रीज मध्ये ठेवा किंवा खुपच जास्त वेळ साठवण्याची गरज असेल तर ते तुम्ही फ्रीजर मध्ये देखील ठेऊ शकता.
  • फ्रीजमधील आईचे दूध पाच दिवस चांगले राहू शकते.तर फ्रीजर मध्ये तुम्ही आईचे दूध दोन आठवडे टिकवून ठेऊ शकता.
  • फ्रीजरसाठी वेगळा कप्पा व डोअर असल्यास टेंपरेचर शुन्य डिग्री एफ वर हे दूध तुम्ही सहा महीने तर अगदी डीप फ्रीजर मध्ये टेंपरेचर-४डिग्री एफ वर १२ महीने दूध तुम्ही साठवू शकता.पण लक्षात ठेवा जितके जास्त दिवस दूध साठवणार तितकी जास्त त्यातील गुणवत्ता कमी होत जाणार.यासाठी साठवलेले दूध लवकरात लवकर बाळाला देणे हे फायदेशीर असू शकते.
  • २४ तासांच्या वर गोठवलेले दूध सामान्य तापमानावर आणल्यानंतर एक तासाच्या आत बाळाला द्या.
  • बाळाला पाजल्या नंतर भांड्यात उरलेले दूध टाकून द्या.
  • स्तनातून दूध काढताना आनंदी रहा.
  • ब्रेस्टपंप अथवा त्याच्या उपकरणांना हात लावण्यापुर्वी तुमचे हात स्वच्छ धुवा.

साठवलेले ब्रेस्ट मिल्क बाळाला कसे पाजावे?

साठवलेले स्तनातील दूध प्रथम सामान्य तापमानावर आणा व मगच बाळाला द्या.सोनाली यांच्या मते यासाठी दूधाची बॉटल वापरु नका कारण त्यामुळे बाळाला निपल्स मधला फरक जाणवेल.साठवलेले दूध बाळाला चमचा अथवा सिप्परच्या सहाय्याने पाजा.जर बॉटलने दूध द्यायचे असेल तर प्रत्येक वेळी ती स्वच्छ व निर्जंतुक करायला विसरु नका.तुम्ही बॉटल स्टर्लाझर वापरुन अथवा १५ मिनिटे पाण्यात उकळून निर्जतुक करु शकता. नक्की वाचा: स्तनपान देणार्‍या नवमातांसाठी खास ८ एक्सपर्ट टीप्स !

ब्रेस्टपंप दिवसातून किती वेळा वापरता येतो?

आईच्या ईच्छेनूसार ती ब्रेस्टपंप कधीही व कितीही वेळा वापरु शकते.मात्र फक्त आवश्यक्ता असेल तेव्हाच ब्रेस्टपंपचा वापर करा.जर पुरेसे दूध साठवले असेल तर उगाचच पंपने दूध दिवसभर काढत बसू नका.

ब्रेस्टपंप वापरण्याच्या काय मर्यादा आहेत?

वेळ मर्यादा-कामाच्या ठिकाणी प्रत्येक वेळी ब्रेस्टपंपने दूध काढण्यासाठी खाजगी वेळ व जागा तुम्हाला मिळेलच असे नाही.त्याचप्रमाणे दूध बाहेर साठवण्यासाठी देखील मर्यादा येतात.तसेच काही मातांच्या मते बाळाला स्तनपान करण्यापेक्षा ब्रेस्टपंप वापरण्यातच अधिक वेळ जाऊ शकतो.

भावनिक मर्यादा-सोनाली यांच्या मते ब्रेस्टपंपाच्या सहाय्याने काढलेले दूध पाजल्यामुळे बाळ व आईमध्ये भावनिक नाते दृढ होत नाही.त्यामुळे याचा परिणाम बाळाच्या वाढ व विकासावर होतो.

नव्या बाळासोबत ‘बॉन्डींग’ वाढवण्यासाठी स्टेप बाय स्टेप गाईड !

शारीरिक मर्यादा-जास्त प्रमाणात ब्रेस्टपंप वापरल्यामुळे आईच्या दूधाच्या पुरवठयावर दुष्परिणाम होतो.पंप कितीही चांगला असला तरी तो बाळाप्रमाणे दूध ओढू शकत नाही त्यामुळे आईला दूध भरपूर येण्याची प्रेरणा मिळू शकत नाही.

जर ब्रेस्टपंपने पुरेसे दूध येत नसेल तर काय कराल?

  • यासाठी चांगल्या रचनेते व आकाराचे ब्रेस्ट पंप घ्या जे तुमच्या स्तनांवर योग्य रितीने बसवता येतील.
  • ब्रेस्टपंपची सेटींग व्यवस्थित करा ज्यामुळे दूध योग्य वेगाने काढणे तुम्हाला शक्य होईल.अती वेगाने अथवा कमी वेगाने दूध काढल्यास त्याचा दूध पुरवठयावर परिणाम होतो.
  • सारखा सारखा पंप वापरल्यामुळे देखील दूध कमी येऊ शकते.तुमच्या शरीराला दूध निर्माण करण्यासाठी पुरेसा वेळ द्या.एकदा दूध काढल्यानंतर दोन तासांनी पुन्हा पुरेसे दूध निर्माण होऊ शकते.त्यामुळे सारखे सारखे दूध काढू नका.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock

बाळाला दात येताना ही काळजी नक्की घ्या

$
0
0

दात येणे ही बाळाच्या वाढी दरम्यान होणारी एक खूप महत्वाची प्रक्रिया आहे.दात येत असल्यास बरीच मुले रडून हैराण होतात.सहाजिकच त्यामुळे बाळाला दात येणे ही पालकांसाठी एक आव्हानात्मक स्थिती असू शकते.मुंबईतील कोकीलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलच्या कन्सल्टंट पिडीयाट्रिशन डॉ.तनू सिंघल यांच्या मते सामान्यत: बाळाला वयाच्या ६ ते २४ महिन्यांच्या दरम्यान दात येतात.पण कधीकधी काही मुलांना अगदी लवकर म्हणजे ३ महीन्यांनी तर कधीकधी अगदी उशीरा म्हणजे १२ महिन्यांनी देखील दात येण्यास सुरुवात होते.त्याचप्रमाणे वरच्या पुढील दातांआधी बाळाला खालचे पुढील दात प्रथम येतात.

दात येताना बाळाच्या हिरड्या संवेदनशील होतात त्यामुळे बाळ रडते अथवा चिडचिड करते.आपल्या तान्हा बाळाला वेदना सहन करताना पहाणे पालकांना देखील थोडे कठीण जाते. तुमचे बाळ या वेदना सांगू शकत नसल्याने ते त्याच्या भावना रडून अथवा चिडून व्यक्त करु शकते.

 दात येताना बाळामध्ये दिसणारी काही लक्षणे-

  • बाळ चिडचिड करते-असे असल्यास काळजी करु नका.तुमच्या बाळाला दात येत आहेत का ते पहा.
  • दूध पिण्यास अथवा खाण्यास नकार देते-असे असल्यास बाळाला जबरदस्ती खाण्यास देऊ नका कारण दात येत असल्यामुळे बाळाची भूक कमी होते.
  • तुमच्या बाळाची नेहमीपेक्षा जास्त लाळ गळते-बाळाची नेहमीेपेक्षा जास्त गळणारी लाळ हे त्याला दात येण्याचे एक प्रमुख लक्षण असू शकते.पण ब-याचदा पालकांचा असा गैरसमज होतो की ही लाळ आपल्या हातातील चॉकलेट किंवा गोड पदार्थांमुळे गळत आहे.
  • हात,बोटे किंवा मिळेल ती वस्तू बाळ चावू लागते-असे पदार्थ अथवा बोटे चावल्याने बाळाच्या हिरड्यांना आराम मिळतो.
  • काहीही कारण नसताना मोठ्या मोठ्याने ओरडून आवाज करणे-बाळ रागाने चिडचिड करत नसून त्याला तुम्हाला त्याचा वेदना सांगायच्या असतात म्हणून ते मोठ्या मोठ्याने आवाज करते.

बाळाला दात येताना होणा-या वेदनेपासून आराम देण्यासाठी काही टीप्स-

तुमच्या बाळाला दात येत आहेत हे लक्षात येताच त्याला आराम मिळण्यासाठी या गोष्टी जरुर करा.

तुमच्या बाळाच्या हिरड्यांना मसाज करा-

तुमच्या बाळाला हिरड्या येत आहेत हे लक्षात येताच त्याच्या कोवळ्या हिरड्यांवरुन स्वच्छ बोटे अथवा कापड फिरवून त्याच्या हिरड्यांना हलका मसाज करा.डॉ.सिंघल यांच्यामते यासाठी कोणतेही औषधी जेल वापरणे टाळा. जाणून घ्या लहान मुलांच्या दूधाच्या दातांबाबत वेळीच जाणून घ्या या ’8′ गोष्टी !

बाळासाठी तीथर्स खरेदी करा-बाळासाठी योग्य व सुरक्षित अशी पाणी,जेल अथवा बीपीए फ्री प्लास्टीकचा वापर केलेली तीथर्स अथवा खेळणी त्यांना चावण्यासाठी द्या.डॉ.सिंघल यांच्या मते थंड तिथींग रिंग मुळे बाळाला आराम मिळू शकतो फक्त ती फ्रोजन नसावी कारण त्यामुळे बाळाच्या हिरड्यांना जखम होऊ शकते.

बाळाला नैसर्गिक पदार्थ चावण्यास द्या-

तुमच्या समोर तुम्ही तुमच्या बाळाला थंड गाजरासारखे नैसर्गिक पदार्थ चावण्यास देऊ शकता.डॉ.सिंघल यांच्या मते फक्त असे करताना तुम्ही स्वत: लक्ष ठेवा कारण असे पदार्थ चावल्यास त्याचा तुकडा बाळाच्या घशात अडकण्याची शक्यता असते.

इतर काही गोष्टी-जर सतत बाळाची लाळ गळत असेल तर मऊ कापडाने ती स्वच्छ करा नाहीतर त्यामुळे तुमच्या बाळाच्या गळा व चेह-यावर रॅशेस येऊ शकतात.

त्रास अगदीच असह्य असेल तर बाळाला औषधे द्या-

डॉ.सिंघल यांच्या मते सर्वात आधी बाळाचा त्रास कमी करण्यासाठी वरील सर्व गोष्टी करा.पण तरीही बाळाला वेदना सहन होत नसतील तर बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरासिटीमॉलचा छोटा डोस ६ ते ८ तासांनी द्या.मात्र बाळाच्या या समस्येवर होमियोपॅथीवर करण्यात येणारे उपचार योग्य आहेत याबाबत अजून कोणतेही वैद्यकीय पुरावे हाती आले नाही आहेत. नक्की वाचा  लहान मुलांचे दात काढल्यानंतर कशी घ्याल काळजी ?

लक्षात ठेवा-

बाळाला दात येताना ताप व डायरिया येेणे हे दात येण्याचे लक्षण नाही.त्यामुळे तुमच्या बाळाला ताप व डायरिया असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जा.त्याकडे दात येण्याचे लक्षण म्हणून दुर्लक्ष करु नका.

तुमच्या बाळाला दुधाचे काही दात आल्यावर ते दिवसातून दोन वेळा मऊ टुथब्रशने स्वच्छ करण्यास विसरु नका.

बाळ जरा मोठे झाल्यावर रात्री स्तनपान करणे अथवा दूधाच्या बाटलीने दूध देणे कमी करा.त्यामुळे बाळाचे दात लवकर किडणार नाहीत.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock

अक्कल दाढ काढण्याचा निर्णय का घ्यावा लागतो ?

$
0
0

अक्कलदाढ आणि त्याबाबतचे अनेक समज -गैरसमज आपल्या मनात असतात. अनेकदा अक्क्लदाढ काढण्याचा सल्ला डेन्टीस्ट देतात. यामागील कारण जाणून घेण्यासाठी हा सल्ला नक्की जाणून घ्या.

अक्कलदाढ म्हणजे नेमके काय ?

हळूहळू बाळाची वाढ होताना दूधाचे दात येतात, हळूहळू ते पडतात आणि नवे कायमस्वरूपाचे दात येतात. वाढत्या वयानुसार, दातांची पुरेशी काळजी न घेतल्यास तेही पडतात. पण दरम्यान अक्कल दाढ येते. तोंडात मागच्या बाजूला दोन वर आणि दोन खालच्या बाजूला दातांची वाढ होते. काहीजणांमध्ये याचे प्रमाण कमी जास्त असू शकते. तर काहींना एकही नसते. सुमारे 16-25 या वयामध्ये अक्कलदाढ येऊ शकते.

अक्कलदाढ का काढावी ?

हिरड्यामधून अक्कल दाढ वर येते. असा समज होता की पूर्वीच्या काळी लोकांचे जबडे मोठे होते. दातही अधिक होते. ज्यामुळे मांसाहार, कंदमुळं खाणं सोपे होत असे. पण जसजसा काळ पुढे सरकला तसे आहारातही अनेक बदल झाले. आता आपण तुलनेत खूपच मऊ, पुरेसे शिजवलेले पदार्थ खातो. त्यामुळे आता अक्कल दाढेचा तितकासा  काहीच उपयोग नाही.

काहींमध्ये हळूहळू अक्कलदाढेचे तुकडे पडायला लागतात किंवा ते इतर दातांच्या तुलनेत ती खूप वेडीवाकडी असल्यास स्वच्छ करणं कठीण होते.अशा ठिकाणी फटीजवळ अडकलेल्या अन्नकणांवर बॅक्टेरियाची वाढ होते. परिणामी इन्फेक्शन वाढू शकते. यामध्ये हिरड्यांमध्ये सूज येणं, लालसरपणा वाढणं अशा समस्या वाढतात. सोबतच तीव्र वेदना जाणवणं, तोंडाला दुर्गंधी येणं अशा समस्या वाढतात. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास इन्फेक्शन अधिक गंभीर होण्याची शक्यता असते.

मात्र जर तुमचा दात तुटलेला, वेड्यावाकड्या आकारात असल्यास जीभेलाही त्रास होऊ शकतो. दातांजवळ पुरेशी जागा नसल्यास असलेल्या दातांची दाटीवाटी वाढते. तसेच अक्कलदाढेच्या आसपासच्या दातांजवळच्या दातालाही त्रास होतो. तेथेही हिरड्यांना त्रास होण्याचा धोका अधिक असतो.

अक्कलदाढीला वाढायला पुरेशी जागा नसल्यास त्याची वाढ हिरड्यांच्या,हाडाच्या किंवा इतर दातांच्या दरम्यान राहते. यामुळे नसांचेही नुकसान होते तसेच आजुबाजूच्या दातांवर दाब येतो. काहीवेळेस पस निर्माण होतो. परिणामी जबडा, हिरड्या दुखावू शकतात. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये पसमध्येच ट्युमर तयार होतो. अशावेळेस शस्त्रक्रिया करणे भाग असते. अशावेळेस अक्कलदाढेजवळ वाढणारा ट्युमर पाहता सर्जिकल एक्सट्राक्शन करणे गरजेचे असते.

जर अक्कलदाढेच्या विरुद्ध दिशेला दात नसेल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. तो केवळ समोरच्या बाजूला इजा करतो. अशावेळी त्याला काढण्याशिवाय काहीच उपाय नसतो. दुखणार्‍या किंवा त्रास देणार्‍या दाताला वेळीच काढल्यास पुढे वाढणार्‍या अनेक समस्या आटोक्यात ठेवणं शक्य असते. म्हणूनच वाढत्या वयानुसार त्रास अधिक गंभीर होणार नाही याची काळजी घ्या.

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Portion Control ने घाला अति खाण्याच्या सवयीवर आळा !

$
0
0

तुम्ही किती प्रमाणात जंक फूड खाता? सॉफ्ट ड्रिंक्स किंवा फ्राईज वर किती पैसे खर्च करता? स्वस्त पडतो म्हणून लहान पॉपकॉर्न टबऐवजी मोठा विकत घेता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर तुम्ही तुमच्या आरोग्याचे खूप नुकसान करत आहात. जर तुम्हाला आरोग्यदायी दीर्घ आयुष्य हवं असेल तर तुम्हाला पोर्शन साईजवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. न्यूट्रिशनिस्ट दिव्या सांगलीकर यांच्या सल्ल्यानुसार प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात कॅलरीज लागतात. कारण प्रत्येकाची गरज वेगळी असते. त्याचे प्रमाण वय, लिंग, वजन, उंची, कामाचे स्वरूप यावर अवलंबून असते. पोर्शन साईज नियंत्रित ठेवल्याने वजन आटोक्यात राहते आणि उत्तम आरोग्य लाभते. म्हणूनच पोर्शन साईज नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांनी काही उपाय व युक्त्या सांगितल्या आहेत.

पोर्शन साईज म्हणजे काय?

पोर्शन साईझ ही सर्विंग साईझपेक्षा वेगळी असते. पोर्शन साईझ म्हणजे तुम्ही प्लेटमध्ये घेतलेल्या अन्नाचे प्रमाण. उदा. जर तुम्ही एक संत्र खाल्ले तर तो एक फळाचा भाग झाला. आणि जर तुम्ही एक व्हेजिटेबल सँडविच(२ स्लाइसचं) खाल्ले तर तो दोन cereals चा भाग झाला.

पोर्शन साईजवर नियंत्रण कसे ठेवावे?

फूड पिरॅमिडचा नीट अभ्यास करा. त्यातून तुम्हाला कळेल की आपल्याला दिवसाला कोणत्या पौष्टीक घटकाची किती आवश्यकता असते. त्यानुसार तुम्ही तुमचा डाएट प्लॅन करू शकता. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक खाल्ले जाणारे पदार्थ टाळता येतील आणि कॅलरीज नियंत्रित राहतील. जर तुम्ही एका दिवसात ५ वेगवेगळे कडधान्य खाणार असाल तर ते एका वेळेस न खाता काही वेळच्या अंतराने ३-४ वेळा खा. त्यामुळे पोर्शन साईजवर नियंत्रण राहील.

सकस आणि संतुलित आहार घ्या. त्याचबरोबर साखर व मीठ कमी प्रमाणात खा. आहारातील अति प्रमाणातील साखर, मीठ नियंत्रणात ठेवण्यासाठी खास टीप्स ! तुम्हाला किती कॅलरीजची गरज आहे आणि तुम्ही किती घेताय याकडे लक्ष ठेवा. त्यामुळे पोर्शन साईज नियंत्रित राहील. पोर्शन साईज नियंत्रित ठेवण्यासाठी पदार्थ कपने मोजण्याची गरज नाही. हाताने किंवा रोजच्या वापरातील वस्तूने तुम्ही पदार्थ मोजू शकता.

  • मटणाचे प्रमाण मोजताना तुमच्या एका तळहातात राहील इतके मटण घ्या. त्याचे वजन साधारण ७५ ग्रॅम्स इतके असेल.
  • भात, पास्ता, उकडलेले बटाटे यांचे प्रमाण मोजण्यासाठी तुमच्या कॉम्पुटर माऊसकडे बघा त्याचा आकार अर्ध्या कपाइतका असेल. तितके हे पदार्थ म्हणजेच साधारण १२५ ग्रॅम घ्या.
  • भाजी किंवा सलाड करण्यासाठी हाताच्या ओंजळभर भाज्या घ्या.
  • आईसक्रीमची आदर्श पोर्शन साईझ म्हणजे टेनिस बॉलची साईज होय.

पोर्शन साईझवर नियंत्रण ठेवण्याचे आणखी काही उपाय:

  • काही वेळच्या अंतराने थोडे थोडे खात राहा. त्यामुळे पोर्शन साईझ नियंत्रित राहील आणि मेटाबोलिसम सुधारेल.
  • दोन जेवणाच्या मधल्या वेळेत हेल्दी पदार्थ खा. त्यामुळे भूक भागवली जाईल आणि अती खाण्याला आळा बसेल.
  • पोर्शन साईज आटोक्यात ठेवण्यासाठी लहान आकाराच्या प्लेट्स, वाट्या, ग्लास वापरा.
  • तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार लाल रंग अधिक प्रमाणात अन्नग्रहण करण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे लाल रंगाच्या प्लेट्स, वाट्या, ग्लास वापरणे टाळा. त्याचबरोबर घरच्या भिंती देखील लाल रंगाने रंगवू नका.
  • निळा, हिरवा, पिवळा असे शांतता प्रदान करणाऱ्या रंगाच्या प्लेट्स, वाट्या, ग्लासेस वापरा.
  • कामाच्या वेळेत कार्ब्सचे प्रमाण कमी असलेले पदार्थ खा. कारण त्यामुळे सुस्तावल्यासारखे वाटते आणि झोप येते.

पोर्शन साईजवर नियंत्रण ठेवणे म्हणजे कमी खाऊन उपाशी राहणे नव्हे. तर याचा अर्थ शिस्तबद्ध आहार घेणे हा आहे. थोडेसे प्रयन्त आणि नियमित सरावाने तुम्ही पोर्शन साईजवर नियंत्रण मिळवू शकता. ज्या पद्धतीने तुम्ही आहार घेणार आहात त्यासाठी तुमच्या शरीर व मनाला तयार करा. आरोग्यदायी आणि संतुलित जीवनाचे हेच रहस्य असल्याचे डॉ. दिव्या यांनी सांगितले.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 

थंडीच्या दिवसात खरंच अधिक केस गळतात का?

$
0
0

केस गळणे ही नैसर्गिक बाब आहे. ज्यामध्ये जुने केस गळून नवीन केस येण्यासाठी जागा मिळते. पण हिवाळ्यात केस डोक्यावर कमी आणि कंगव्यात अधिक दिसतात. हे तुम्हाला ही जाणवले असेल. हे खरंच थंडीमुळे होते का?  Trichologist Dr. Priya Mohod यांनी थंडीच्या दिवसात अधिक केस गळण्याचे कारण सांगितले.

हे खरं आहे का की हिवाळ्यात अधिक केस गळतात?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा गैरसमज अजिबात नाही आहे. हिवाळ्यात खरंच खूप केस गळतात. आपण सस्तन असल्यामुळे थंडीच्या दिवसात आपल्याला या समस्येला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर ऋतुमानातीळ बदल हे देखील केसगळतीचे कारण आहे. नक्की वाचा: केसगळती होतेय ? हे ‘ 7′ घरगुती उपाय नक्की करुन पहा

थंडीत टाळूत  काय बदल होतात?

थंडीत टाळू कोरडा होतो. केस कोरडे झाल्यामुळे केसांची मूळ कमकुवत होतात आणि त्यामुळे केस गळतात. असे Dr Mohod म्हणाले. तसंच थंडीच्या दिवसात फंगल इन्फेकशन वाढते त्यामुळे टाळूच्या ठिकाणी  अनेक समस्या उद्भवतात. केसांत कोंडा होऊन केस गळू लागतात. केसगळती रोखण्यासाठी दिवसातील ’5 मिनिटं’ हा उपाय नक्की करा

ऋतुमानानुसार होणाऱ्या केसगळतीची त्रास पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक होतो का?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या समस्येतून स्त्री आणि पुरुषाशी कोणीही सुटलेलं नाही. केसगळतीची समस्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये ही सामान आढळून येते. त्यामुळे दोघांनाही केसगळतीचा अनुभव आला असेल. जाणून घ्या: स्त्रियांमध्ये वाढणार्‍या केसगळतीमागे दडली आहेत ही ’10′ कारणं !

हिवाळयात उद्भवणाऱ्या केसगळतीच्या समस्येला प्रतिबंध कसा करावा?

  • स्वच्छता हा महत्त्वाचा मुद्दा आहे:  स्काल्फ स्वच्छ ठेवण्यासाठी केस नियमित धुवा. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाजारात मिळणाऱ्या शाम्पूमध्ये सल्फेटचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याऐवजी डॉक्टरांनी दिलेला मेडिकेटेड शाम्पू वापरणे योग्य ठरेल. केसगळती रोखणारा रामबाण घरगुती हेअरपॅक
  • तेल लावून घराबाहेर जाऊ नका: जर तुम्ही तेल लावून घराबाहेर पडलात तर तेलकट केसात धूळ. धूर, कचरा चिकटून राहील आणि केस अधिकच खराब होतील.  तेल लावल्यानंतर १०-१५ मिनिटांनी केस धुवा किंवा रात्री झोपण्यापूर्वी तेल लावा. कांद्याने हटवा केसगळतीची समस्या !
  • केस झाकून घ्या: ओढणी किंवा शालने केस झाकून घेतल्यास उन्हापासून किंवा स्काल्फला हानी पोहचवणाऱ्या इतर गोष्टींपासून स्काल्फचे संरक्षण होते.

या लहान सहान गोष्टी पाळल्यास थंडीच्या दिवसात केस सुरक्षित राहतील.

References: 1. Hamad, F. A. Seasonal hair loss.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

पुरुषांना देखील मोनोपॉजला सामोरे जावे लागते का?

$
0
0

सुरेश ४० वर्षांचा असून त्याचं करियर उत्तम आहे आणि त्याला मस्त फ्रेंड्स देखील आहेत. ‘पार्टी मॅन’ म्हणून ओळखला जाणारा सुरेश खरंतर दोन आयुष्य जगतोय. एकीकडे हा पार्टी मॅन आहे तर दुसरीकडे त्याला अनेकदा भावनिक चढउतार, मूड सविंग्सला सामोरे जावे लागते. आणि त्याची कामवासना (सेक्सुअल डिजायर) मरत चालली आहे. त्याची पार्टी मॅनची इमेज कायम राखण्यासाठी तो त्याच्या या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि ताणामुळे असं होत, असं मानतो. पण हा त्याचा मोनोपॉजचा टप्पा असल्याची पुसटशी कल्पना त्याला आहे.

पुरुषांमध्ये होणारा मोनोपॉज ही एक सत्य परिस्थिती आहे. जी प्रत्येक पुरुषामध्ये ४०शी नंतर आणि ५०शी च्या आधीच्या काळात दिसून येते. हे नक्की काय आहे? असा प्रश्न पडला का? तर आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं Men’s health physician and medical sex therapist Dr Vijayasarathi Ramanathan यांनी दिली आहेत.

मेन मोनोपॉज म्हणजे नक्की काय? हा एक गैरसमज आहे का?

नाही. हा गैरसमज नाही. काही पुरुषांमध्ये ४०शीच्या शेवटच्या टप्प्यात आणि ५० शी च्या सुरवातीच्या टप्प्यात काही शारीरिक, मानसिक, भावनिक, लेंगिक बदल किंवा लक्षणे दिसून येतात. या सर्व लक्षणावरून समजते की हा andropause किंवा male menopause चा काळ आहे. हार्मोनल इमबॅलन्समुळे स्त्रियांमध्ये होणारे बदल आणि मेन मोनोपॉजची ही लक्षणे साधारणपणे सारखीच असतात. मध्यम वयात हार्मोन testosteroneच्या स्त्रावामुळे ही लक्षणे दिसून येतात, असे म्हटले जाते. पण हे चुकीचे आहे. खरंतर वाढत्या वयाबरोबर पुरुषांच्या शरीरातील testosterone ची पातळी कमी होते. काही वेळेस testosterone च्या कमतरतेमुळे ही लक्षणे दिसून येतात. परंतु काही पुरुषांमध्ये ही लक्षणे आढळण्याचा आणि testosterone चा काही संबंध नसतो.

हे कधी आणि केव्हा होतं?

साधारपणे ही लक्षणे मध्यम वयात दिसून येतात. आयुष्याचा अर्धा टप्पा पूर्ण झाल्यावर ही फेज येते म्हणून याला ‘मिडलाईफ क्रायसेस’ असे म्हणतात. या सर्व लक्षणांसाठी आर्थिक अडचणी, नातेसंबंधातील समस्या, व्यस्त जीवनशैली आणि आरोग्यविषयी समस्या इत्यादींमुळे येणारा ताण आणि वाटणारी काळजी या गोष्टी कारणीभूत ठरतात.

पुरुषांना ठळकपणे जाणवतील अशी याची लक्षणे कोणती? फीमेल मोनोपॉजप्रमाणे हे देखील गंभीर असते?

नैराश्य, सेक्सची इच्छा न होणे, मूड सविंग्स, कोरडी आणि पातळ त्वचा, थकवा, अधिक घाम येणे, चिडचिड करणे, निरुत्साही वाटणे, मसल्स कमी होणे, एकाग्रता कमी होणे, erectile dysfunction, hot flashes अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. सगळ्यांच पुरुषांमध्ये सारखी लक्षणे आढळत नाहीत. या लक्षणांची तीव्रता आणि प्रकार हे व्यक्तीनुसार बदलते.

एखाद्या व्यक्तीला डॉक्टरांच्या सल्ल्याची किंवा ट्रीटमेंटची गरज का भासते?

काहीतरी चुकीचं, वेगळं जाणवू लागलं की आपल्या विश्वासु व्यक्तीसोबत सगळं शेअर करा. या गोष्टी मनात ठेवण्यापेक्षा शेअर केल्यास बरं वाटतं. आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास स्थिती सुधारण्यास आणि लक्षणे आटोक्यात येण्यास मदत होते. त्याचबरोबर आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून आयुष्यात पुढे जाण्याची मानसिकता विकसित होण्यास मदत होईल.

यावर उपाय काय?

यावर अनेक उपाय आहेत आणि लक्षणांच्या गंभीरतेनुसार ते केले जातात. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. ऑलोपेथिक औषधे, समुपदेशन, वागण्यातील बदल असे अनेक उपाय आहेत.

या परिस्थितीतून जाताना पुरुषांना कमी ‘manly’ वाटतं का?

काही लक्षणांना सामोरं जाताना असं वाटू शकतं. उदा. erectile dysfunction त्यामुळे अचानक सेक्सुअल इनअक्टिव्हनेस येतो. त्यामुळे मनात अशी शंका येऊ शकते.

मोनोपॉजचा टप्पा कधी संपतो?

हे सांगणं खरंतर कठीण आहे. काही लक्षणं आयुष्यभर (व्यक्ती जिवंत असेपर्यंत) दिसून येतात. तर काही काळानुसार विरून जातात. काही लक्षणे औषधांनी आटोक्यात येतात आणि त्या व्यक्तीला पुन्हा आत्मविश्वास मिळवून देण्यास मदत करतात. त्यामुळे ती व्यक्ती आनंदी आयुष्य जगू शकते.

ही लक्षणे आटोक्यात आणण्यासाठी स्वतःहून काही प्रयत्न करता येईल का? आणि यासाठी उत्तम पर्याय कोणता?

नियमित योगसाधना, प्राणायाम, ध्यानधारणा केल्यामुळे नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे संवाद साधा. तुमच्या जवळच्या व्यक्तीशी किंवा डॉक्टरांशी याविषयी बोला. त्यामुळे परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत होईल. खरंतर पुरुषांना आपल्या आरोग्यविषयक तक्रारी  इतरांना सांगणे आवडतं नाही. पण या समजातून बाहेर पडा आणि समस्या गंभीर होण्याआधी ती खुलेपणाने सांगून त्यावर मार्ग काढा.

पुरुषाच्या अशा परिस्थितीत त्याच्या पार्टनरने त्याला कशी मदत करावी?

सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे या कठीण काळात त्याला आधार देणे. त्याच्या अवस्थेबद्दल त्याची चेष्टा करण्याऐवजी जे काही मनात आहे, जे काही वाटतं ते बोलण्यास प्रवृत्त करणे. आणि जरी तो सेक्सुअली कमी पडत असेल तरी त्याचा पुरुषार्थ जपण्याचा प्रयन्त करा.

Reference:

NHS

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


योग्य अस्थमा इन्हेलर कसा निवडावा?

$
0
0

अस्थमा पेशन्टसाठी अस्थमा इन्हेलर हे डिव्हाईस अतिशय परिणामकारक ठरते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे अस्थमा इन्हेलर्स उपलब्ध आहेत. एखाद्याला असलेल्या त्रासाच्या स्वरूपानुसार आणि गंभीरतेनुसार योग्य असे इन्हेलर निवडणे थोडे कठीण आहे. Venkateshwar Hospital, Dwarka, New Delhi चे Senior Consultant at Pulmonology Dr. Brig Ashok K Rajput (Retd) MD (Medicine), MD (Chest), DTCD, DNB (Pulmonary Medicine), FNCCP(I) यांनी आपल्या आजारानुसार योग्य इन्हेलर्स कसे निवडायचे आणि ते वापरण्याची अचूक पद्धत याबाबत मार्गदर्शन केले.

फुफ्फुसांच्या तीव्र आजारावर Aerosol or inhalational therapy हा ट्रीटमेंट चा महत्त्वाचा भाग आहे. Aerosol चा परिणाम हा तीन गोष्टींवर अवलंबून असतो:

  • डिव्हाईसची योग्य निवड
  • इन्हेलर वापरण्याची पद्धत.
  • काही ठराविक परिस्थिती औषधे घेणे.

प्रामुख्याने तीन प्रकारचे इन्हेलर्स वापरले जातात.

1. Pressurized Metered Dose Inhaler (pMDI): गेल्या ३० वर्षांपासून वापरले जाणारे हे डिव्हाईस आहे. यात असलेल्या propellant- HFA (Hydro Fluoro Alkane) आणि surfactant- (sorbitan trioleate, lecithin or oleic acid) या औषधांमुळे श्वसनात अडथळा निर्माण करणाऱ्या बारीक कणांना अटकाव होतो. आणि औषधांचा योग्य परिणाम घडून येतो.

MDI वापरण्याची योग्य पद्धत:

  1. इन्हेलरची कॅप काढा आणि ३-४ वेळा इन्हेलर हलवा. (शेक करा.)
  2. इन्हेलर सरळ पकडा.
  3. मान ४५ अंशात मागे वाकवा. ज्यामुळे श्वसन नलिकेसोबाबत तोंडाचा भाग सरळ राहील.
  4. सावकाशपणे संपूर्ण श्वास सोडून द्या. फुफ्फुसं पूर्णपणे रिकामी होऊ दे.
  5. इन्हेलरचा तोंडात घालायचा भाग (mouthpiece) दोन ओठांच्या मध्ये पकडा. आणि ओठ बंद करा.
  6. सावकाश आणि खोल श्वास घेताना एकदा इन्हेलर अक्टिव्ह करा. aerosol चा मीटर डोस घशापर्यंत जाईल.
  7. अजून ५ सेकंद श्वास घेत रहा. जोपर्यंत फुफ्फुसं पूर्णपणे भरत नाहीत. आता औषधाचा परिणाम श्वसनमार्गाच्या खालच्या भागात जाणवू लागेल.
  8. १० सेकंद किंवा शक्य असल्यास अधिक वेळ श्वास धरून ठेवा.
  9. आता श्वास तोंडाने नव्हे तर नाकावाटे बाहेर सोडा.
  10. ३-५ मिनिटानंतर आधी घेतल्याप्रमाणे पुन्हा श्वास घ्या.
  11. कॉम्बिनेशन थेरपीमध्ये दोनदा असे केल्यानंतर तोंड पाण्याने धुवा.

Breath actuated MDI: Breath actuated metered dose inhalers (BA-MDIs) ला चालू होण्यासाठी पेशंटच्या श्वसनाची गरज असते. श्वसनाच्या कमी प्रवाहात देखील ते कार्य करते. त्यामुळे हे योग्य प्रकारे वापरण्यासाठी अधिक सरावाची किंवा ट्रेनिंग ची गरज भासत नाही. वापरण्यास अतिशय सोपं आणि अनेक वेगवेगळ्या ड्रग फॉरम्युलेशन मध्ये याचा उपयोग करता येतो. pMDI चे कार्य बिघडल्यावर देखील हे वापरणे फायदेशीर ठरते.

2. ड्राय पावडर इन्हेलर (DPI)

  • एक किंवा अधिक औषधांच्या कॉम्बिनेशन साठी वापरू शकता.
  • उच्छवासातून बाहेर येणारे ड्रग पार्टिकल्स कॅर्रीर मोलिक्युलस पासून वेगळे करून फुफ्फुसांना योग्य प्रमाणात औषधाचा पुरवठा करतात.
  • या डिव्हाईसच्या कार्यात कोणताही अडथळा येत नाही. फक्त योग्य वापरासाठी अधिक श्वास घेण्यासोडण्याची गरज असते.

DPI वापरण्याची योग्य पद्धत:

  1. Assemble apparatus.
  2. त्यानंतर त्यात औषधाचे डोस भरा.
  3. माऊथपीस खालच्या दिशेला राहील अशा पद्धतीने इन्हेलर तोंडात धरा.
  4. डोकं थोडं मागे करा.
  5. सावकाश फुफ्फुसं रिकामी होईपर्यंत श्वास सोडा.
  6. माऊथपीस ओठांमध्ये घट्ट धरून ठेवा. (ओठ उघडू नका.)
  7. पटकन (२-३ सेकंद)  आणि खोलवर (६०ली/मिनिट) श्वास घ्या.
  8. आता इन्हेलर काढा आणि नॉर्मल श्वास घ्या.

3. Nebulizers:

  • हे डिव्हाईस इतके परिणामकारक नाही.
  • श्वसनमार्गाच्या खालच्या भागात १-५% इतकेच औषधं पोहचतं.
  • या  डिव्हाईसमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते.

थोडक्यात:

  • ५० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील पेशंटच्या श्वसनमार्गातील अडथळ्यांना नियंत्रित करण्यासाठी Aerosol therapy अत्यंत फायदेशीर आहे. आणि काळानुसार त्यात प्रगतशील बदल झाले आहेत.
  • वेगवेगळ्या औषधांचे फॉरमेशन्स आपण यांत वापरू शकतो. पण औषधं शरीराला मिळण्याचं प्रमाण अजूनही कमीच आहे.
  • प्रत्येक डिव्हाईसचे काही फायदे आणि तोटे असतातच.
  • MDI हे डिव्हाईस valved spacer असताना किंवा नसताना ही चांगले कार्य करते आणि प्रामुख्याने वापरले देखील जाते. परंतु त्यासाठी योग्य परिस्थिती असणे गरजेचे आहे. तसंच काही पेशन्टसाठी हे डिव्हाईस गैरसोयीचे ठरू शकते.
  • Breath‐activated डिव्हाईसच्या वापरासाठी श्वसन प्रवाह अधिक असणे गरजेचे आहे. त्यामुळे श्वसनाच्या काही मर्यादा असणाऱ्या पेशन्टसाठी हे कठीण ठरू शकेल. जरूर वाचा: लसूण- श्वसनविकारांना दूर ठेवणारा रामबाण घरगुती उपाय !
  • पेशंटच्या क्षमतेनुसार आणि औषधांनुसार डिव्हाईस निवडावे.
  • पेशंटला डिव्हाईसबद्दल सगळी व्यवस्थित माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर निवडलेले डिव्हाईस वापरण्यास सोयीचे असायला हवे.
  • aerosol medication च्या उत्तम कार्यासाठी सुरुवातील ते योग्य पद्धतीने वापरले गेले पाहिजे.
  • हेल्थ प्रोफेशनल्सने सगळ्या delivery systems बाबत उत्तम माहिती ठेवणे आणि त्यात नैपुण्य साधणे गरजेचे आहे.

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

सेक्स न करताही होऊ शकतात हे लैंगिक आजार !

$
0
0

STD म्हणजे सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीज. सामान्यतः हा आजार असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे होतो. पण तुम्हाला माहित आहे का? की लैंगिक संबंध नसताना ही या आजाराची लागण होऊ शकते. ही ’7′ लक्षणं देतात लैंगिक आजारांचे संकेत !

लैंगिक संबंध नसताना STD होण्याची कारणे:

STD ग्रस्त व्यक्तीशी शारीरिक संबंध आल्यास हा आजार होऊ शकतो. तसंच ओरल सेक्स मुळे देखील एखादी व्यक्ती या आजाराला बळी पडू शकते. ओरल सेक्समध्ये संपूर्ण शारीरिक संबंध ठेवले जात नाहीत तरीही हे इन्फेकशन होण्याचा धोका असतो. ओरल सेक्स करताना पार्टनरच्या शरीराच्या इन्फेक्टड भागाशी संबंध आल्यास gonorrhoea, chlamydia, herpes, hepatitis इत्यादी बॅक्टरीया, व्हायरस यांची लागण होते. त्याचप्रमाणे गुप्त भागात शेव्ह केल्याने त्वचेवर ब्रेक्स येतात आणि इन्फेकशनचा धोका वाढतो. vaginal infections जडण्याची कारणं, लक्षणं आणि उपचार !

स्वच्छतागृहांमधून STD चे इन्फेकशन होऊ शकते का?

ही शक्यता देखील नक्कीच आहे. अस्वच्छ टॉयलेट मधून अशा प्रकारचं इन्फेकशन पसरू शकतं. स्वच्छतागृहामध्ये इन्फेकशन पसरवणारे किटाणू, वस्तू असेल आणि ती जर ब्रेक्स असलेल्या त्वचेच्या संपर्कात आली तर STD चे इन्फेकशन होऊ शकते.

trichomoniasis या सारखे आजार ओले कपडे किंवा टॉवेल याच्या संपर्क इन्फेकशन झालेल्या भागाशी आला तर होतात. केसातील उवा एकमेकांच्या अती जवळीकतेमुळे होतात. त्याचबरोबर एकमेकांचे कपडे, टॉवेल वापरल्याने देखील केसात उवा होण्याची भीती असते.

STD चे सामान्य प्रकार आणि ते पसरण्याचे मार्ग:

 1. Gonorrhoea and Chlamydia
Gonorrhoea and Chlamydia याप्रकारचे इन्फेकशन साधारणपणे ओरल सेक्स किंवा शारीरिक संबंधांमुळे पसरते. गर्भारावस्थेत आईला झाले असेल तर बाळाला होऊ शकते.
टीप: शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करा. तसंच ओरल-व्हेजीनल सेक्स करताना डेंटल डॅम्स वापरल्यास इन्फेकशन होण्याचा धोका कमी होतो.

2. हेपिटायटिस
हेपिटायटिस ए हा आजार इन्फेक्टड व्यक्तीशी अतिशय घनिष्ट संबंध आल्यास किंवा असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास होतो. नक्की वाचा: असुरक्षित सेक्सनंतर घ्या हे ’3′ खबरदारीचे उपाय !

हेपिटायटिस बी हा आजार अतिशय गंभीर असून इन्फेक्टड व्यक्तीच्या रक्त, सेमेन किंवा योनीतून येणाऱ्या द्रवाशी थेट संबंध आल्यास होतो.
हा आजार आईकडून बाळाला होण्याची शक्यता अधिक असते. कारण त्यांचा सारखा जवळून संबंध येत असतो. घरातील इन्फेक्टड वस्तू यामुळे हा आजार होऊ शकतो. तसंच असुरक्षित इंजेकशन्स आणि रक्ताची देवाणघेवाण यातूनही हे इन्फेकशन पसरण्याची संभावना असते.
हेपिटायटिस सी हा आजार रक्ताची देवाणघेवाण करताना इन्फेक्टड रक्त शरीराला मिळाल्यास हा आजार पसरतो. आईमुळे बाळाला होऊ शकतो. औषधोपचार करताना झालेल्या असुरक्षित इंजेकशन्स मुळे तसंच इंजेकशन मध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधामुळे हा आजार होऊ शकतो.
हेपेटायटिसला प्रतिबंध करणाऱ्या काही टीप्स:
योग्य लसीकरण करून घेणे ही हेपेटायटिसला प्रतिबंध करण्याची पहिली पायरी आहे. लहान मुलं आणि मोठी माणसे या दोघांना ही हे उपयुक्त ठरेल.
स्वच्छ पाणी प्या, टॉयलेटवरून आल्यावर स्वच्छ हात धुवा, सुरक्षित सेक्सचा आनंद घ्या, स्वतःचे लेझर्स, सुया इतरांना वापरायला देऊ नका. स्वच्छतेच्या अशा काही लहान सहन गोष्टी नक्कीच फायदेशीर ठरतील.

3. Herpes:
Herpes हा व्हायरस एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी जवळचा संबंध आल्यास पसरतो. तसंच ओरल सेक्स, टूथब्रश, जेवणाची ताट, ग्लास इन्फेक्टड व्यक्तीसोबत शेअर केल्याने हा आजार होतो. आईमुळे बाळाला हा आजार होऊ शकतो.
टीप: काही साध्या सवयी आपल्याला या आजारापासून दूर ठेवतील. उदा. स्वच्छता राखणे व पाळणे, हात स्वच्छ धुणे, इत्यादी.
4. एचआयव्ही:
ओरल सेक्स मुळे एचआयव्ही होण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी असते. पण त्याबाबत गाफील राहू नये.
इन्फेक्टड रक्ताशी संबंध आल्यास, इन्फेक्टड इंजेकशन्स किंवा सुया वापरल्यास, ट्याटू करताना असुरक्षित सुई वापरली गेल्यास एचआयव्ही होण्याचा धोका असतो. प्रेग्नसी मध्ये एचआयव्ही झालेल्या आईकडून बाळाला तसंच ब्रेस्टफीडिंग करताना बाळाला हा रोग होऊ शकतो. जरूर वाचा: आईकडून बाळाला संक्रमित होणार्‍या HIV च्या धोक्याबाबत ’10′ प्रश्न व त्याची एक्सपर्ट उत्तरं !

हा व्हायरस अधिक काळ माणसाच्या शरीराच्या बाहेर राहत नाही.  शरीरातील ज्या द्रवात याची उत्पत्ती होते ते सुकल्यावर हा व्हायरस पटकन मरतो. त्यामुळे हा आजार किटाणूंपासून होत नाही. आणि तापाच्या व्हायरस सारखा तो पसरत ही नाही.

टीप: असुरक्षित लैंगिक संबंध टाळल्यास आणि योग्य ती स्वच्छता पाळल्यास आपण एचआयव्हीला प्रतिबंध करू शकतो.

1. Aspinall EJ, Hawkins G, Fraser A, Hutchinson SJ, Goldberg D. Hepatitis B prevention, diagnosis, treatment and care: a review. Occup Med (Lond). 2011 Dec;61(8):531-40. doi: 10.1093/occmed/kqr136. Review. PubMed PMID: 22114089.

2. Lü FX, Jacobson RS. Oral mucosal immunity and HIV/SIV infection. J Dent Res. 2007 Mar;86(3):216-26. Review. PubMed PMID: 17314252.

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

दिवसा सारख्या येणाऱ्या झोपेवर काही सोपे उपाय!

$
0
0

रात्री झोप झाल्यानंतर ही दिवसभर तुम्हाला झोप येत असते का? काम करत नसताना देखील तुम्हाला दमल्यासारखे वाटते? जर या प्रश्नांची उत्तर हो असतील तर तुम्हाला या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला पाहिजे. कारण ही underlying sleep disorder ची लक्षणं आहेत. याला hypersomnia असे म्हणतात.  Internal medicine and endocrinology at Apollo Clinics चे  consultant general physician डॉ. राजेंद्र नारायण शर्मा यांच्या सल्ल्यानुसार या विकारामध्ये दिवसा देखील खूप झोप येते. त्याचबरोबर निरुत्साही, थकल्यासारखे वाटते, विचारात स्पष्टता येत नाही.

रात्री जर पुरेशी झोप झाली असेल तर दिवसा झोप कशी येते?

बदललेली जीवनशैली हे याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे. बैठे काम करणाऱ्या आणि अतिशय कमी प्रमाणात व्यायाम करणाऱ्या लोकांना hypersomnia होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर असलेल्याना हा विकार होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. hypersomnia होण्याची अजून काही कारणे देखील आहेत.

या परिस्थितीतून मार्ग कसा काढावा?

डॉ. शर्मांच्या सल्ल्यानुसार जर तुम्हाला दिवसभर निरुत्साही, सुतावल्यासारखे वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. आजाराच्या गंभीरतेनुसार तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाईल. यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप महत्त्वाची आहे. जर झोपताना येणारा श्वसनाचा अडथळा फार गंभीर स्वरूपाचा नसेल तर ही समस्या जीवनशैलीत काही लहानसे बदल करूनही दूर होऊ शकते. रात्रीच्या शांत झोपेसाठी करा हे ’3′ मिनिटांचे श्वसनाचे व्यायाम !

Apollo Cradle च्या  consultant obstetrician डॉ. शिल्पा आपटे यांनी hypersomnia तून बाहेर येण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत:

  • योग्य, पुरेशी झोप घ्या. आणि झोपेला महत्त्व द्या.
  • ३० मिनिटे व्यायाम करा.
  • दिवसा डुलकी काढणे कमी करा.
  • रात्रीच्या जेवणात जास्त मसालेदार, तेलकट पदार्थ घेणे टाळा. त्यामुळे असिडिटी होईल.
  • भरपूर पाणी प्या. झोपण्याआधी जास्त पाणी किंवा इतर पेय पिणे टाळा. त्यामुळे रात्रीच्या वेळी लघवीसाठी झोप मोड होणार नाही.

प्रेग्नसीमध्ये hypersomnia आढळून आला तर त्यावर उपाय काय?

प्रेग्नसीमध्ये अतिरिक्त झोप येणे साहजिकच आहे. डॉ. शिल्पांच्या सल्ल्यानुसार ७८% प्रेगनेंट महिलांमध्ये हा विकार दिसून येतो. परंतु प्रेगन्सीची १०व्या आठवड्यानंतर तो नाहीसा होतो. आधीपासून sleeping disorder असलेल्या महिलांमध्ये हा विकार अधिक दिसून येतो. प्रेग्नेंसीमध्ये hypersomnia होण्याची काही कारणे:

  • पहिल्या तीन महिन्यात progesterone हार्मोनची पातळी कमी होणे.
  • gastro-esophageal reflux disease म्हणजेच असिडिटीमुळे झोपेत येणारा अडसर, रात्री सारखी लघवीला होणे, चिंता, ताण यामुळे होणारी अपूरी झोप.
  • प्रेगन्सी मध्ये यावर काही औषध दिली जात नाहीत. त्यामुळे शक्य त्या टीप्स पाळून त्यावर नियंत्रण मिळवू शकता. परंतु प्रेगन्सीच्या काळात शरीराला आवश्यक तितकी झोप जरूर घ्या. अधिक माहितीसाठी नक्की वाचा: गर्भारपणात कशी घ्याल पुरेशी झोप?

 

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

ओव्हूलेशन कीटमुळे गर्भधारणेचा निश्चित काळ ओळखता येतो का?

$
0
0

लग्नानंतर प्रत्येक स्त्री सहाजिकच मातृत्वासाठी आतूर असते.खुप प्रयत्न करुनही कधीकधी गर्भधारणेमध्ये अनेक समस्या येतात.गर्भधारणेच्या यशातील मुख्य अडचण असते ती म्हणजे गर्भधारणेचा निश्चित काळ समजणे.ओव्हूलेशनच्या काळात गर्भधारेसाठी प्रयत्न केल्यास यश मिळण्याची शक्यता अधिक असते.त्यामुळे ओव्हूलेशनचा काळ ओळखण्यासाठी ही माहीती तुमच्या फायद्याची असू शकते.

ओव्हूलेशन म्हणजे काय आणि गर्भधारणेसाठी ते किती महत्वाचे आहे-

महिलांच्या मासिक पाळीच्या दोन आठवड्यांच्या काळात स्त्रीच्या अंडकोषातून बीजांड बाहेर पडते व गर्भधारणेसाठी तयार होते या काळाला ओव्हूलेशन असे म्हणतात.या काळात जर स्त्री व पुरुषांनी गर्भनिरोधके न वापरता शारीरिक संबध ठेवले तर शुक्राणू स्त्रीबीजात शिरुन गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते.

मात्र असे होण्यामध्ये समस्या ही असते की प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशीच हा काळ येतो असे नाही.प्रत्येक महिन्याचे ओव्हूलेशन कधी होणार हे सांगणे तसे कठीण असते.त्यात जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल तर ओव्हूलेशनचा काळ शोधणे अधिकच कठीण होऊन बसते.

गर्भधारणेसाठी ओव्हूलेशनचा काळ महत्वाचा का असतो?

शूक्रजंतू दोन ते तीन दिवस जीवंत राहू शकतात.पण स्त्रीबीजामध्ये ओव्हूलेशन झाल्यानंतर फक्त २४ तासापर्यंतच फलित होण्याची क्षमता असते.त्यामुळे यशस्वी गर्भधारणेसाठी तुम्ही ओव्हूलेशन होण्याआधीच्या एक-दोन दिवसापासून ते ओव्हूलेशन झाल्यावर २४ तासांच्या आतच प्रयत्न करणे गरजेचे असते. जाणून घ्या यशस्वी गर्भधारणेसाठी कसा ओळखाल ओव्हूलेशनचा दिवस ?

ओव्हूलेशनचा काळ ओळखण्यासाठी काही टीप्स-

सिंम्पल कॅल्क्युलेशन-

तुमच्या पुढील मासिक पाळीच्या ड्यू डेटच्या १२ ते १६ दिवस आधी तुमचे ओव्हूलेशन होऊ शकते.जर तुमचे २८ दिवसांचे मासिकचक्र असेल तर १४ वा दिवस ओव्हूलेशनचा असू शकतो.पण जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल तर मात्र ही पद्धत तुमच्या उपयोगाची नाही.

ओटीपोटात वेदना होतात-

काही स्त्रीयांना ओव्हूलेशनच्या काळात काही मिनीटे अथवा काही तास पोटात सौम्य वेदना जाणवतात.या स्थितीला mittelschmerz असे म्हणतात.पण कधीकधी काही वेगळ्या कारणांनी वेदना होत असल्यास हा नेमका ओव्हूलेशनचा काळ आहे हे समजणे कठीण असू शकते.

व्हर्जायनल डिस्चार्ज बदलतो-

ओव्हूलेशनच्या काळात योनीमार्गातून बाहेर पडणा-या स्त्रावाचा रंग,प्रमाण व टेक्चर बदलतो.या स्त्रावावरुन तुम्ही तुमचा ओव्हूलेशनचा काळ शोधू शकता.ओव्हूलेशन होण्याच्या काही दिवस आधी या स्त्रावाचे प्रमाण वाढते व तो अधिक शुभ्र व स्वच्छ दिसतो. नक्की वाचा गरोदरपणाच्या काळात योनिमार्गातून स्त्राव होणं योग्य आहे का?

शरीराचे basal body temperature (BBT) अथवा सामान्य तापमान बदलते-

ओव्हूलेशनच्या काळात तुमच्या शरीराचे तापमान ०.४ ते १.० डिग्री इतके वाढते.हे तापमान क्षणात बदलत असल्यामुळे ते साध्या थर्मामीटरने मोजणे कठीण असू शकते.यासाठी तुमचे बीबीटी दररोज सकाळी मोजा व त्याची नोंद करुन ठेवा असे २ ते ३ महीने केल्यावर तुम्हाला पुढील मासिक पाळीतील ओव्हूलेशनचा काळ ओळखणे सोपे होईल.लक्षात ठेवा हे तापमान वाढू लागल्यानंतर दुस-या ते तिस-या दिवशी तुमचा गर्भधारणेचा योग्य काळ असू शकतो.

अल्ट्रासाउंड स्कॅनींग करा-

ही इनफर्टिलीटी ट्रिटमेंटमध्ये महत्वाची गोष्ट आहे.या स्कॅनींग मुळे दिवसेंदिवस तुमच्या स्त्रीबीजाचा होणारा विकास व ओव्हूलेशनमध्ये त्यांचे फलीत होणे तपासता येते.

वर देण्यात आलेल्या इतर पद्धती अविश्वसनीय असू शकतात व अल्ट्रासाउंड स्कॅनींग ही पद्धत वेळकाढू व खर्चीक असते.त्यामुळे ओव्हूलेशन काळ ओळखण्यासाठी ओव्हूलेशन कीट घेणे हा उत्तम पर्याय असू शकतो.

ओव्हूलेशन कीट- या आधुनिक पद्धतीमुळे तुमच्या मासिक पाळीचक्रातील ओव्हूलेशनच्या काळात वाढणा-या हॉर्मोन्सच्या पातळीतील बदलानूसार तुमच्या ओव्हूलेशनचा नेमका काळ शोधता येतो.हे ओव्हूलेशन कीट वापरणे अतिशय सोपे व सुलभ असते.तसेच या कीट मुळे तुम्हाला ९७ टक्के ओव्हूलेशनचा काळ शोधणे सोपे जाते.तुम्ही हे कीट कोणत्याही केमिस्ट कडून अथवा ऑनलाईन विकत घेऊ शकता.

ओव्हूलेशन कीट कसे वापराल?

१.तुमच्या मासिक पाळीचक्रातील दिवसांचा अंदाज घ्या.जर तुमच्या मासिक पाळीेचे दिवस वेगवेगळे येत असतील तर मागील तीन सायकलमधून छोटा मासिककाळ निवडा.

उदा-समजा तुमचा सप्टेंबर,ऑक्टोबर  महीन्यातला काळ ३१ दिवसांचा होता व ऑगस्ट मधला २९ दिवसांचा होता तर तुम्ही तुमच्या मासिकचक्राचा काळ २९ दिवसांचा आहे असे समजा.

२.तुमच्या पुढील मासिक पाळीच्या १७ व्या दिवसाआधी टेस्ट करणे सुरु करा.म्हणजे तर तुमचे मासिकचक्र २९ दिवसांचे असेल तर तुम्ही मासिक पाळीच्या १२ व्या दिवशी टेस्ट करणे अपेक्षित आहे.

३.एका भांड्यांत युरीन घ्या व ते ओव्हूलेशन किटमध्ये दिलेल्या युरीन स्टीकने किटवर सोडा.इंटीकेटर पहात रहा त्यात होणारे रंगातील बदल पाहून तुमचे ओव्हूलेशन झाले आहे का ते ओळखा.टेस्ट पॉझिटीव्ह असेल तर तुमचे २४ ते ४८ तासांत ओव्हूलेशन होणार आहे असे समजा.

लक्षात ठेवा ओव्हूलेशन कीटमुळे फक्त तुमचे एलएच सर्ज मोजता येते.यामुळे तुम्ही गरोदर आहात का हे समजू शकत नाही.

ओव्हूलेशन कीट का फायदेशीर नसू शकते-

जर तुम्ही आई होण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर या गोष्टींचा तुम्हाला काही बाबतीत नक्कीच फायदा होऊ शकतो.पण गर्भधारणेसाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते निरोगी जीवनशैली व उत्तम सेक्स लाईफ.जर या दोन गोष्टी असतील तर तुम्हाला लवकरच गोड बातमी मिळू शकते.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock

डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स का निर्माण होतात?

$
0
0

डोळ्याभोवती काळी वर्तुळे येणे याला Periorbital circles अथवा डार्क सर्कल्स असे म्हणतात.तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नसेल,तुम्ही खुप ताणात असाल किंवा जर तुमची तब्येत ठीक नसेल तर तुमच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे दिसू लागतात.कधीकधी मद्यपान,धुम्रपान,अति मेक-अप करणे,सतत उन्हामध्ये फिरणे,काही औषधे,अॅलर्जी,सर्दी-खोकल्याच्या समस्या यामुळे देखील तुमच्या डोळ्याभोवती डार्क सर्कल्स येऊ शकतात.

डोळे हा आपल्या आरोग्याचा आरसा असतात.त्यामुळे डोळ्याभोवती डार्क सर्कल्स येणे हे आरोग्य समस्येचे एक लक्षण असू शकते.मात्र वयोमानानुसार येणा-या पिगमेंटेशमुळे या समस्येकडे ब-याचदा दुर्लक्ष केले जाते.पेरीयर बायटल हायपिगमेेंटेशन मध्ये डोळ्यांच्या त्वचेखालील मेलॅनीनचे प्रमाण वाढते व ही समस्या निर्माण होते.त्यामुळे जर तुम्हाला खुप डार्क सर्कल्स असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.

या आरोग्य समस्येमुळे डार्क सर्कल्स येऊ शकतात-

अॅनिमिया-

शरीरात लोहाचा अभाव असल्यास अॅनिमियामुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळे येतात.लोहासारख्या मिनरल्सच्या अभावामुळे शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा कमी पुरवठा होतो व डोळ्यांच्या खालील त्वचेच्या रंगात बदल होतो.

Periorbital cellulitis-

डोळ्याच्या पापण्या व आजूबाजूच्या भागाला हे इनफेक्शन व दाह झाल्यामुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळे येतात.

Parasite infection-

कच्चे अथवा कमी शिजवलेले मटण खाल्यामुळे हे इनफेक्शन होते यामुळे डोळे सूजतात,डोळ्यांच्या त्वचेचा रंग बदलतो व डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येतात.डोळ्यांच्या त्वचेखालील रक्तवाहिन्यांमध्ये हे इनफेक्शन झाल्यामुळे ही लक्षण दिसू लागतात.किटकदंशामुळे देखील हे इनफेक्शन होते.असे असल्यास चेह-यावर किटक चावलेल्या भागाकडील डोळ्याची पापणी सूजते. नक्की वाचा थंडगार दुधाने हटवा, डार्क सर्कल्सची समस्या!

Atopic dermatitis (eczema)-

या स्थितीत त्वचा लालसर होते व खाज येते.यामुळे पापण्यांवर लालसर,तपकिरी अथवा राखाडी चट्टे येतात.

थायरॉईड समस्या-

कधीकधी थायरॉईड हॉर्मोन्सच्या अभावामुळे डोळ्याच्या टिश्यूजमध्ये पाणी जमा झाल्याने काही लोकांच्या डोळ्याखालील त्वचेचा रंग गडद होेतो.

किडनीचे नुकसान-

किडनीमध्ये बिघाड झाल्यास त्वचेखाली द्रवपदार्थ साठू लागतात.त्यामुळे या विकाराचे प्रथम लक्षण सूजलेले व काळी वर्तुळे निर्माण झालेले डोळे हे असू शकते.

यकृतामध्ये बिघाड-

यकृताचा आकार वाढणे अथवा हिपॅटायटीस या समस्येमुळे यकृताच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे डार्क सर्कल्स दिसू शकतात.

दृष्टी दोष-

जवळचे किंवा लांबचे पाहताना त्रास होत असल्यास, समोरचे पाहताना डोळ्यांवर ताण येत असल्यास  डोळ्यांभोवती काळी वर्तुळे निर्माण होतात.

Amyloidosis-

अॅमलॉईड या प्रोटीनच्या जमा होण्याने ही समस्या निर्माण होते.कधीकधी काही रुग्णांमध्ये  यामुळे त्वचेतून रक्त देखील येऊ लागते.या स्थितीत डोळ्यांच्या पापण्यांखालील छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जमा झाल्याने त्वचेवर गडद रंगाचे चट्टे दिसतात. जाणून घ्या डार्क सर्कल्स हटवण्याचा घरगुती उपाय !

Porphyria

या समस्येमध्ये हेम या घटकाच्या निर्मितीवर परिणाम होतो.हेम हा हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लागणारा एक लोहघटक अाहे.या स्थितीमुळे डोळ्याच्या त्वचेखालचा रंग बदलतो ज्यामुळे डार्क सर्कल्स दिसू लागतात.

1. Sheth PB, Shah HA, Dave JN. Periorbital hyperpigmentation: a study of its prevalence, common causative factors and its association with personal habits and other disorders. Indian J Dermatol. 2014 Mar;59(2):151-7. doi: 10.4103/0019-5154.127675. PubMed PMID: 24700933; PubMed Central PMCID: PMC3969674.

2. Colucci G, Alberio L, Demarmels Biasiutti F, Lämmle B. Bilateral periorbital ecchymoses. An often missed sign of amyloid purpura. Hamostaseologie. 2014;34(3):249-52. doi: 10.5482/HAMO-14-03-0018. Epub 2014 Jun 30. PubMed PMID: 24975676.

3. Bulat V, Lugović L, Situm M, Buljan M, Bradić L. Porphyria cutanea tarda as the most common porphyria. Acta Dermatovenerol Croat. 2007;15(4):254-63. Review.  PubMed PMID: 18093456.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock

पालकाच्या अतिसेवनाचे शरीरावर होतात हे ’5′दुष्परिणाम !

$
0
0

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे हे वाईटच असते. अगदी आरोग्यदायी गोष्टी, पदार्थ आणि सवयीदेखील त्रासदायक ठरू शकतात. अनेकदा आहारतज्ञ पालेभाज्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. त्यामधून शरीराला पोषणद्रव्य मिळण्यास मदत होते. मात्र सतत पालेभाज्या खाणं हे जितकं कंटाळवाण आहे तितकेच ते त्रासदायकही ठरू शकते. पालक ही अशीच एक पालेभाजी आहे. त्यामधून शरीराला आयर्न, फायबर आणि इतर मिनरल्सचा पुरवठा होतो. मात्र अतिप्रमाणात पालक खाल्ल्यास काय होते हे जाणून घेण्यासाठी Fortis Hospital कलकत्त्याच्या आहारतज्ञ मिता शुक्ला यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या.

पोट फुगणे – पालक मधून शरीराला फायबर्सचा पुरवठा होतो तसेच पचन सुधारण्यास मदत होते. पण पालक खाल्ल्यानंतर त्याचे शरीरात शोषण होण्यास अधिक वेळ लागू शकतो. तुम्ही नुकतीच पालक खाण्यास सुरवात केली असेल तर घाई करू नका. वरचेवर पालकच्या भाजीचा आहारात समावेश करणे त्रासदायक ठरू शकते. यामुळे पोटात गॅस होणे, बद्धकोष्ठतेचा त्रास होणं अशा समस्या वाढू शकतात.

डायरिया – अति प्रमाणात फायबरचा आहारात समावेश केल्यास पचनकार्यामध्ये बिघाड होऊ शकतो. पालकसोबतच काही अति फायबरयुक्त पदार्थ आहारात घेतल्यास पोटदुखी, पचनविकार वाढण्याचा धोका असतो. म्हणूनच पालकासोबत प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.

किडनीस्टोन – पालकामध्ये oxalic acid घटक आढळतात. पालकाची प्युरी शरीरात शोषल्यानंतर त्यातून युरिक अ‍ॅसिडची निर्मिती होते. युरीक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्यानंतर किडनीस्टोन निर्माण होण्याची शक्यताही वाढते.

गाऊट – पालकच्या अतिसेवनामुळे शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. परिणामी सांधेदुखी, सांध्यातील दाह आणि गाऊटचा त्रासही वाढतो.

मिनरल्स शरीरात शोषण्याचे प्रमाण कमी होते – पालकामध्ये  oxalic acid चेही प्रमाण अधिक असते. त्याचे कॅल्शियम किंवा आयर्न घटकांशी शरीरात संपर्क आल्यास मिनरल्स शोषून घेण्याची प्रक्रिया मंदावते.

या टीप्सने मिळवा टाईप 2 डाएबिटीसवर नियंत्रण !

$
0
0

मधूमेह हा विकार पुर्ण बरा होऊ शकत नसला तरी त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य असते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवल्यास तुम्हाला डोळ्यांचे विकार,किडनी विकार,ह्रदय विकार,मज्जातंतू बिघाड व पायाच्या गंभीर समस्या टाळता येतात. मधूमेहींनी निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम,पौष्टिक आहार,नियमित रक्तातील साखर तपासणे व वेळेवर हेल्थ चेक-अप करणे आवश्क आहे. तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ?

मधूमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी करा या महत्वाच्या गोष्टी-

नियमित योग्य आहार घ्या-

दिवसभरात कमीतकमी तीन वेळा वेळेवर जेवण घ्या.त्याचसोबत दर चार ते पाच तासांनी काहीतरी योग्य खाल्याने तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहील.बाहेर प्रवास करताना कार्बोहायड्रेट पदार्थ अथवा १० ते १५ ग्रॅम कार्बोहायड्रेट घटक असलेले पेय सोबत घ्या.प्रवासात रक्तातील साखर अचानक कमी झाल्यास त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल.

निरनिराळे खाद्यपदार्थ खा-

असे अन्नपदार्थ खा ज्यामुळे तुम्हाला पोषण मिळेल.यासाठी कमी फॅट्स,कमी साखर व कमी मीठ असलेले पदार्थ खा.तळलेले पदार्थ खाणे टाळा.यासाठी बेक केलेले,उकडलेले अथवा वाफावलेले पदार्थ खाणे फायदेशीर ठरेल.रेड मीट अजिबात खाऊ नका.कमी फॅट असलेले दूधाचे पदार्थ खा.भरपूर प्रमाणात फायबर असलेल्या भाज्या व फळे,तृणधान्ये व कडधान्ये असे पदार्थ खा. (नक्की वाचा – मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6 गैरसमज ! )

रक्तातील साखर नियंत्रित ठेवा-

डॉक्टरांच्या सल्लानूसार दिवसभरात दोन ते चार वेळा ब्लडशूगर तपासा.यासाठी रक्तातील शूगर तपासण्याचे इलेक्ट्रानिक मशीन घरी ठेवा.या मशीनसोबत असलेली छोटी सुई बोटांवर टोचून थेंबभर रक्त मशीनला लावलेल्या केमीकली अॅक्टीव्ह डीस्पोजेबल टेस्ट स्ट्रीपवर  टाका त्यामुळे काही सेंकदामध्ये त्या डिजीटल मशीनमध्ये तुमची ब्लडशूगर दर्शविली जाईल.

A1C वेळेवर करा-

दर तीन महीन्यातून एकदा ही टेस्ट करा.त्यामुळे गेल्या काही महीन्यांपासून तुमच्या शरीरातील लाल रक्तपेशींमध्ये ग्लूकोजचे प्रमाण किती आहे हे तुमच्या लक्षात येईल.दर तीन महीन्यांनी शरीरात नवीन लाल रक्तपेशी निर्माण होतात.जर तुमची ब्लडशूगर ७० ते १४० मिग्रॅ/डीएल इतकी असेल तर तुमचे A1C ६ ते ७ टक्के असणे अपेक्षित असते.

मद्यपान व धुम्रपान टाळा-

जर तुम्ही मधूमेही असाल मद्यपान व धुम्रपानामुळे तुम्हाला अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.मद्यपानामुळे शरीराला कोणतेही पोषण मिळत नाही व कॅलरीज मात्र खुप वाढतात.मद्यपान केल्यामुळे तुम्ही मधूमेहावर घेत असलेल्या औषधांचा परिणाम कमी होतो व आरोग्य समस्या निर्माण होतात. रिकाम्या पोटी मद्य घेतल्याने तुमच्या रक्तातील साखर अचानक खुप कमी होते.

कार्यक्षम व्हा-

शारीरिक अॅक्टीव्हीटीमुळे तुम्ही फीट रहाता.त्यामुळे तुमचे वजन व रक्तातील साखर नियंत्रित रहाते.शारीरिक कसरतीमुळे रक्तप्रवाह सुधारतो व ह्रदय समस्या दूर होतात.वजन कमी करण्यासाठी देखील याचा फायदा होतो.

नियमित रक्तदाब व कोलेस्ट्रॉल तपासा-

तुम्ही तुमचा रक्तदाब वर्षातून दोन ते चार वेळा व कोलेस्ट्रॉल (फास्टींग लिपीड प्रोफाईल) वर्षातून एकदा तपासणे गरजेचे असते.जर तुम्ही मधूमेही असाल तर तुम्हाला उच्चरक्त दाब व हायकोलेस्ट्रॉल या समस्या निर्माण होऊन पुढे गंभीर विकार होऊ शकतात. कोलेस्टेरॉल कमी करायचयंमग आहारात ठेवा हे 7 पदार्थ

मज्जातंतूच्या बिघाडाची लक्षणे तपासा-

डायबेटीक न्यूरोपॅथी हा मधूमेहींची रक्तातील साखर वाढल्यामुळे मज्जातंतूमध्ये बिघाड होणारा विकार आहे.यामध्ये हात-पायाला मुंग्या येणे,डायरिया,इरेक्टाईल डिसफंक्शन,मूत्राशयावरी नियंत्रण जाणे, दृष्टी दोष,चक्कर अशी लक्षणे आढळतात.जर तुम्हाला अशी कोणतीही लक्षणे आढळली तर त्वरीत तुमच्या डॉक्टरकडे जा.काही शारिरीक टेस्टकरुन डॉक्टर तुमच्या स्पर्श,हालचाली व संवेदना तपासतील.काही समस्या आढल्यास पुढील तपासण्या करुन त्वरीत उपचार करण्यात येतील.

पायांची विशेष काळजी घ्या-

मज्जातंतू बिघाड व कमी रक्तपुरवठा यामुळे मधूमेहींमध्ये अनेक समस्या निर्माण होतात.मधूमेहींना पायांची समस्या देखील वारंवार होते.त्यामुळे तुमच्या पायावर कोणतीही जखम अथवा इनफेक्शन झाले आहे का हे दररोज तपासा.धोका टाळण्यासाठी अनवाणी चालणे टाळा.पायांची नखे वेळेवर कापा.पायांची योग्य निगा राखा. मधूमेहींनी पायांची काळजी घेण्यासाठी या ’7′ गोष्टींकडे अवश्य लक्ष द्यावे

डोळे तपासा-

दरवर्षी नियमित डोळ्यांची तपासणी करण्यास विसरु नका. रक्तातील साखर सतत अनियंत्रित असल्यास डोळ्याच्या रेटीनामधील छोट्या रक्तवाहिन्यांचे नूकसान होते.या स्थितीला डायबेटीक रेटीनापॅथी असे म्हणतात.त्यामुळे दृष्टी अंधूक होते,दृष्य दोन दिसतात किंवा कायमचे अंधत्व येऊ शकते. मोतीबिंदू व काचबिंदू होण्याचा धोका वाढतो. कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य ?

किडनीची तपासणी करा-

वर्षातून एकदा किडनीची तपासणी करा.कारण मधूमेहामुळे किडनीमधील रक्तवाहीन्यांचे नुकसान होते.जर तुम्हाला मधूमेह व उच्चरक्तदाब दोन्हीही असेल तर तुम्हाला हा धोका अधिक असू शकतो.या विकाराचे प्रथम लक्षण लघवीमध्ये यूरीन येणे हे असू शकते त्यात जर किडनीमध्ये बिघाड झाल्यास परिस्थिती खुपच गंभीर होऊ शकते.तुमच्या शरीरातील रक्तदाब,कोलेस्ट्रॉल व ट्राग्लीसाईड वाढते.यामुळे पायाला सूज येत संपुर्ण शरीराला सूज येऊ शकते.पण जर लवकर या स्थितीचे निदान झाले तर उपचार करुन स्थिती सुधारता येऊ शकते. किडनी विकाराच्या या ’12 लक्षणांना दुर्लक्षित करू नका!

दात व हिरड्या तपासा-वर्षातून दोनदा तुम्ही दात व हिरड्या तपासणे गरजेचे असते.मधूमेहामुळे दात,हिरड्या व तोंडातील पोकळीचे नुकसान होऊ शकते.रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे दात किडण्याचा धोका निर्माण होतो.मधूमेहामध्ये हिरड्यांच्या समस्या देखील निर्माण होतात. मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी हे ९ घरगुती उपाय

$
0
0

काही खाद्यपदार्थ व तोंडातील कोरडेपणा यामुळे तोंडात दुर्गंध येऊ लागतो.घराबाहेर असताना तो कमी करण्यासाठी प्रत्येकवेळी तुम्ही ब्रश करु शकत नाही.तोंड स्वच्छ करण्यासाठी बाजारामध्ये अनेक माऊशवॉशनर उपलब्ध आहेत.मात्र घरातील काही नैसर्गिक पदार्थामुळे तोंडाचा दुर्गंध सहज दूर करता येतो.हे पदार्थ तुम्ही बाहेर जाताना देखील तुमच्या सोबत ठेऊ शकता.

मुखशुद्धीसाठी नैसर्गिक उपाय-

बडीसोप-

जेवण झाल्यावर ब-याचदा आपल्याकडे बडीसोप खाण्याची पद्धत आहे.ही बडीसोप खाल्याने पचनशक्ती सुधारते.बडीसोप एक उत्तम माऊथफ्रेशनर देखील आहे.बडीसोपमुळे अधिक प्रमाणात लाळ निर्माण होते व जंतूंचा नाश होतो ज्यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही.जेवणानंतर येणारे आंबट ढेकर व अॅसिडीटी बडीसोपमुळे कमी होते.दररोज थोडी बडीसोप चघळल्यामुळे तुमच्या तोंडातून चांगला सुगंध येऊ शकतो. जाणून घ्या  जेवणानंतर बडीशेप सोबत धनाडाळ का खावी ?

२.मिंट अथवा पुदीना-

बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक माऊथ फ्रेशनर्स मध्ये मिंट हा महत्वाचा घटक असतो.खाद्यपदार्थांच्या सजावटीसाठी पुदिन्याची पाने तुम्ही वापरु शकता.या पानांच्या ताज्या व थंडगार सुगंधामुळे तुम्हाला अधिक फ्रेश वाटू शकते.यासाठी पुदिन्याची काही पाने चघळा अथवा एक कप पुदिन्याचा चहा घ्या.

३.छोटी सोफ-

डेजर्ट व बेक केलेल्या पदार्थांमध्ये हा घटक वापरण्यात येतो व कधीकधी मद्यामध्ये प्लेवरसाठी हा पदार्थ वापरण्यात येतो.याला गोडसर व अॅरोमिक प्लेवर येतो.या बीयांमध्ये अॅरोमासोबत अॅन्टीबॅक्टेरीयल घटक देखील असल्यामुळे ते चांगले माऊथफ्रेशनर असू शकते.तुम्ही या बीया चघळू शकता किंवा गरम पाण्यात या बीया भिजत ठेवा व ते पाणी नैसर्गिक पद्धतीने माऊशवॉश करण्यासाठी वापरा.

४.पार्सली-

तुम्ही पार्सली तुमच्या खाद्यपदार्थांच्या सजावटीसाठी वापरु शकता.पार्सलीमधील क्लोरोफील हा घटक जंतुनाशक आहे.त्यामुळे जेवणाच्या शेवटी पार्सली खाल्यास तुमच्या तोंडाचा दुर्गंध कमी होईल.पार्सलीच्या तेलाचा वापर माऊथ फ्रेशनर,साबण व परम्युममध्ये सुगंधासाठी करण्यात येतो.

५.लवंग-

स्वयंपाकामध्ये लवंग चव व सुगंधासाठी वापरण्यात येते.पुर्वीपासून दातदुखत असल्यास लवंग वापरण्यात येत असल्यामुळे आजकाल टूथपेस्ट व माऊथवॉश मध्ये देखील लवंग वापरण्यात येते.लवंगमुळे तोंडाचा दुर्गंध कमी होतो कारण तिच्यामध्ये अॅन्टीबॅक्टेरीयल घटक असतात.तुम्ही कधीतरी एखादी लवंग नक्कीच चघळू शकता.

६.दालचिनी-

दालचिनी हा एक मसाल्याचा पदार्थ आहे.दालचिनीमध्ये देखील अॅन्टीबॅक्टेरीयल घटक असल्यामुळे त्यामुळे तोंडाचा दुर्गंध कमी होतो.यासाठी तुम्ही एखादा दालचिनीचा तुकडा चघळू शकता किंवा ंदालचिनीचा एक कप चहा घेऊ शकता.त्याचप्रमाणे दालचिनीचे तुकडे पाण्यात उकळून ते तुम्ही माऊथवॉश करण्यासाठी देखील वापरु शकता.

७.वेलची किंवा इलायची -

वेलचीला एक गोडसर व अॅरोमिक सुगंध येतो.त्यामुळे तुमच्या तोंडाला दुर्गंध येत असल्यास तोंडात वेलची ठेवा.किंवा जेवल्यानंतर वेलची टाकलेला चहा घेण्यास हरकत नाही.

८.लिंबूवर्गीय फळे-

संत्री,लिंबू या फळांमुळे तुमच्या लाळग्रंथीला चालना मिळते व भरपूर लाळ निर्माण होते.लाळेतील अॅसीड घटकांमुळे तोंडातील मृतपेशी व अन्नघटक दूर होतात.

९.धणे अथवा कोंथिबीर-

स्वयंपाकातील कांदा व लसूण या पदार्थांमुळे तोंडाला उग्र वास येतो.पण अन्नपदार्थावर कोथिंबीर टाकल्याने हा दुर्गंध कमी होऊ शकतो.जेवणानंतर कोथिंबीरींची काही पाने चघळा त्यामुळे तोंडांचा दुर्गंध निघून जाईल.किंवा चिमूटभर मीठासोबत धणे तव्यावर रोस्ट करा व चघळा.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock

या ‘९’टीप्सने करा प्रेगन्सीमध्ये होणाऱ्या मूड स्विंग्सवर मात !

$
0
0

मातृत्वाची चाहूल लागणं हा अतिशय सुखद अनुभव असतो. पण तो अनुभवताना अनेक भावनिक चढ उतारांना सामोरं जावं लागत. एका क्षणी आपण आनंदाच्या शिखरावर आहोत असं वाटतं तर दुसऱ्या क्षणी चिडचिड होते. काही हार्मोन्समुळे मूड स्विंग्स होतात.  विशेषतः पहिल्या तीन महिन्यात ही समस्या अधिक जाणवते. प्रसूती वेदनांची भीती, बाळाबद्दलची काळजी आणि चिंता यामुळे मूड सतत बदलत राहतात. गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?

मूड स्विंंग्स कमी करण्यासाठी काही खास टीप्स:

  •  पुरेशी झोप घ्या. दिवसभराच्या कामातून छोटासा ब्रेक घेऊन रिलॅक्स व्हा.
  • सकस, संतुलित आहार घ्या. काही वेळच्या अंतराने थोडे थोडे खात राहा. गर्भवती स्त्रियांच्या आहारात आवश्यक आहेत ही ‘१० सुपरफुड्स’
  • नुसते बसून न राहता सतत काहीतरी करत रहा. शारीरिकरीत्या अ‍ॅक्टिव्ह राहिल्याने मूड चांगला राहण्यास मदत होईल. चालणे किंवा स्विमिंगअसे व्यायाम तुम्ही करू शकता. ताण कमी करण्यासाठी योगसाधना, ध्यान जरूर करा.
  • प्रेग्नंसीबद्दलची चिंता सोडून द्या. काही वेळ मित्र-मैत्रिणींबरोबर घालवा. चांगले सिनेमे पहा.जरूर वाचा: नैसर्गिक प्रसुतीसाठी 9 खास टिप्स
  • वाचन, लेखन, चित्र काढणे, नवीन पदार्थ बनवणे किंवा झाडं लावणे यांसारखे तुमचे काही छंद असतील तर ते जरूर जोपासा. छंद जोपासणं हा अतिशय सुंदर अनुभव आहे. त्यामुळे मनावरील सगळे ताण निघून जातात आणि रिलॅक्स वाटतंं. तसंच मनात सकारात्मक विचार येण्यास मदत होते.
  • घरच्या घरी मसाज घ्या. स्वतःचे लाड पुरवा. मनाला शांतता आणि प्रसन्नता देणारं संगीत ऐका. आणि कोणत्याही गोष्टीचा अधिक ताण घेऊ नका.
  • तुमच्या साथीदारासोबत वेळ घालवा. तुमच्या पालकत्वाची कल्पना करा. एकत्र बसून मुलांची नावं ठरवा. बाळाचे फोटोज गोळा करा.
  • तुमच्या जवळच्या व्यक्तीसमोर मनातील भावना व्यक्त करा. तुम्हाला सकारात्मकता देणाऱ्या व्यक्तींसोबत बोला. यामुळे तुमचं मन हलकं, शांत होईल आणि विचारात स्पष्टता येण्यास मदत होईल.
  • प्रेग्नेंसीच्या शेवटच्या टप्प्यात प्रसूती वेदनांच्या अधिक विचारामुळे मूड सविंग्स होतात. Lamaze क्लास लावा. त्यात एकाग्रता वाढण्यासाठी, आराम देणारे विविध तंत्र शिकवले जातात. तसंच प्रसूती वेदना सौम्य होण्यास मदत होते.

 

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 

या ‘८’आरोग्यदायी फायद्यासाठी अवश्य प्या नारळपाणी !

$
0
0

नारळाचे पाणी हे आरोग्यदायी असल्याचे आपण सगळेच जाणतो. हे पाणी १००% शुद्ध असून त्यात ९४% पाणी असते. अगदी कमी कॅलरीज आणि शून्य टक्के कोलेस्ट्रॉल असल्याने हे एक नैसर्गिक आरोग्यदायी पेय आहे. तसंच त्यात व्हिटॅमिन बी, अमिनो असिड, सायटोकायनिन (cytokinins) आणि पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, मेगनिज यांसारखी मिनरल्स असतात. या काही आरोग्यदायी फायद्यांमुळे नारळाचे पाणी रोज घ्या.

1. हृदयाच्या आरोग्यासाठी:
फक्त तहान क्षमावण्यासाठी नाही तर नारळपाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. काही अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की नारळपाण्यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होते. तर दुसऱ्या अभ्यासानुसार नारळपाण्यात मुबलक प्रमाणात असलेल्या पोटॅशिअममुळे हायपरटेन्शनचा त्रास कमी होतो.
2. किडनी स्टोनचा धोका कमी होतो:
नियमित नारळपाणी घेतल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो. त्यात असलेल्या पोटॅशिअम व मॅग्नेशिअममुळे लघवी साफ होण्यास मदत होते. त्याचबरोबर तुम्हाला किडनी स्टोन असल्यास लघवीसोबत स्टोन निघून जाण्यास मदत होईल.
3. डायरियावर गुणकारी:
डायरियामध्ये शरीरातील पाणी कमी होते. नारळपाण्यामुळे ती कमतरता भरून निघते त्याचबरोबर इलेक्ट्रोलाइट्स आणि मिनिरल्सची कमी देखील भागवली जाते. शरीरातील विषद्रव्ये शरीराबाहेर टाकली जातात. आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या इलेकट्रॉलेटचे प्रमाण यात असते.
4. हायड्रेट ठेवते:
उन्हाळयात सतत घाम आल्यामुळे शरीर डीहायड्रेट होते. त्यामुळे पोटाला थंडावा देणारे पदार्थ खावेसे वाटतात. अशावेळी नारळपाण्यासारखा दुसरा उत्तम पर्याय नाही. कारण यात कार्ब्स, साखर कमी प्रमाणात तर इलेक्टोलेट्स मुबलक प्रमाणात असतात. फक्त नारळपाणी प्या किंवा त्यात लिंबाचा रस घालून ही तुम्ही हे हेल्दी ड्रिंक घेऊ शकता.
5. व्यायाम  करताना आणि करून झाल्यावर:
व्यायाम करताना हायड्रेट राहणे खूप गरजेचे आहे. नारळपाण्यात कोणत्याही प्रकारचे प्रेजर्वेटिव्हस किंवा कृत्रिम साखर नसल्यामुळे हे एक नैसर्गिक स्पोर्ट्स ड्रिंक आहे. त्यामुळे व्यायाम करताना आणि झाल्यानंतर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसंच यात कमी कॅलरीज आणि पोटॅशिअम असते. आणि शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यास मदत करते.
6. त्वचा टवटवीत होते:
नारळपाण्यामुळे त्वचा मऊ मुलायम होते. त्वचेला नवा तजेला येतो. दिवसातून दोनदा नारळपाणी चेहरा, हाताला लावा आणि स्वतःच फरक बघा. त्यात असलेल्या cytokinins मुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या येत नाहीत.
7. प्रेग्नसीमधील काही समस्यांवर फायदेशीर:
नारळपाणी हे नैसर्गिकरित्या शुद्ध असते. म्हणून प्रेग्नसीमध्ये हे पाणी पिणे सुरक्षित असते. प्रेग्नसीमध्ये होणारी असिडिटी, बद्धकोष्टता, छातीतील जळजळ यावर अत्यंत फायदेशीर ठरते.
8. तुटलेल्या दातांसाठी:

दात तुटल्यास डॉक्टरांकडे जाण्यापर्यंत दात त्याच्या जागी व्यवस्थित राहत नसल्यास नारळपाणी स्टोरेज सोल्युशन म्हणून वापरू शकता.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

दात काढण्याचा निर्णय या ’5′कारणांमुळे घ्यावा लागतो !

$
0
0

दात हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे.त्यामुळे दातांची योग्य स्वच्छता व निगा राखणे आवश्यक असते.दातांच्या समस्या असल्यास त्वरीत डेन्टीस्टचा सल्ला घेणे गरजेचे असते.पुर्वी दातांच्या कोणत्याही समस्येवर दात मुळासकट उपटून काढणे हाच एक उपाय असायचा.पण आजच्या आधुनिक काळात दातांवर अनेक प्रगत वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत.त्यामुळे कोणतीही समस्या असली तरी डेन्टीस्ट दातांवर उपचार करताना ते काढून टाकण्याचा पर्याय टाळतात. मात्र दातांच्या काही समस्येवर दात काढणे हाच एकमेव पर्याय असू शकतो.

या  काही कारणांमुळे दात मुळापासून उपटून काढावे लागतात-

दातांच्या एखाद्या समस्येवर उपचार नसणं - 

जेव्हा दातांमध्ये भयंकर कीड लागते,दात फॅक्चर होतात किंवा हिरड्यांमधील हाडांची झीज होते तेव्हा दाताचे नुकसान झाल्यामुळे दात मुळापासून उपटून काढण्याशिवाय कोणताही मार्ग उरत नाही. जाणून घ्या दात किडण्याची ही 10लक्षणे

दातांची रचना चुकीची / वेडीवाकडी असल्यास-

ब-याचदा  अक्कलदाढ ही चुकीच्या जागी येते अथवा जागे अभावी ती हिरड्यांच्या बाहेर येऊ लागते.चुकीच्या रचनेमुळे दात स्वच्छ करणे कठीण जाते व त्यामुळे इनफेक्शन होण्याची दाट शक्यता निर्माण होते.जीभ अथवा गालाच्या आतील बाजूने अक्कलदाढेचे घर्षण झाल्यामुळे तोंडांला अल्सर होऊन वेदना होऊ शकतात.अशा स्थितीमुळे तोंडामध्ये सिस्ट अथवा ट्यूमर विकसित होण्याची देखील शक्यता असते.अक्कलदाढ चुकीच्या जागी आल्यामुळे होणा-या या समस्या टाळण्यासाठी ती दाढ त्वरीत काढून टाकणे आवश्यक असते.

अक्कलदाढेला जबडयामध्ये पुरेशी जागा न मिळाल्याने इतर दातांच्या रचनेवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो.अक्कलदाढेच्या वाढीमुळे इतर दातांच्या नसा व मुळांचे नुकसान होऊ शकते.या परिस्थितीत दातांच्या रचनेत बदल होऊ लागल्यास हिरडयांच्या समस्या निर्माण होतात.त्यामुळे अशा परिस्थितीत अक्कलदाढ काढून टाकणे हेच योग्य असू शकते.

काही ऑर्थोडोन्टीक कारणांमुळे-

ऑर्थोडोन्टीक उपचारांमध्ये दातांची रचना सुधारण्यासाठी योग्य जागा निर्माण करताना काही वेळा एखादा दात काढून टाकण्याची गरज भासू शकते.

एक्स्ट्रा दात असल्यास-

तुम्हाला नैसर्गिकरित्या जास्तीचे दात आल्यास गालाच्या आतील भाग अथवा जीभ वारंवार दुखावली जाऊ शकते.अशा दातांमुळे दातांची योग्य स्वच्छता राखणे कठीण होते.त्यामुळ असे दात काढून टाकावे लागतात.नियामित  ब्रश करताना या ’7 चुका टाळा म्हाणजे त्यांचे आरोग्य सुधारायला मदत होईल. 

डोके व मानेला रेडीएशन घेण्यापुर्वी-

डोके व मानेला रेडीएशन उपचार घेताना जबडयातील हाडांवर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.अशा वेळी दात किडले असल्यास अथवा हिरड्या कमजोर झाल्या असल्यास थेरपीमधील दुष्परिणाम टाळण्यासाठी असे दात काढून टाकावे लागतात. दातदुखी कमी करण्याचे हे नैसर्गिक उपाय नक्की आजमावून पहा. 

वर दिलेल्या या कारणांव्यतिरिक्त इतर कोणत्या कारणांमुळे तुम्हाला दात काढण्याचा सल्ला दिला जात असेल तर मात्र सेकंड ओपिनीयन घ्यायला विसरु नका. नैसर्गिक उपायांनी वाढवा दातांची शुभ्रता !

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock

या कारणांंसाठी गरोदर स्त्रियांंनी कॅल्शियम सप्लिमेंंट घेणं गरजेचे आहे

$
0
0

गरोदरपणात स्त्रीला फॉलीक अॅसीड,आयर्न प्रमाणेच कॅल्शियमची देखील अधिक आवश्कता असते.यासाठीच इतर मल्टीविटामिन्स सोबत तुमचे गायनेकालॉजिस्ट तुम्हाला कॅल्शियम सप्लीमेंट घेण्याचा सल्ला देतात.हाडांच्या मजबूती व विकासासाठी शरीराला कॅल्शियम गरजेचे असते.Max Hospital, New Delhi,च्या Senior Consultant Obstetrician and Gynaecologist, डॉक्टर उमा वैद्यनाथन यांच्या मते जाणून घेऊयात गरोदरपणाच्या काळात कॅल्शियम सप्लीमेंटची आवश्यकता का असते ?

१.अर्भकाच्या हाडांची वाढ व विकासात मदत होते - 

गर्भाच्या हाडांच्या विकासासाठी कॅल्शियमची गरज असते हे आपल्या सर्वांना माहीत आहेच.गर्भाची वाढ व विकास होण्यासाठी गर्भवती स्त्रीने आपल्या आहारातून पुरेसे कॅल्शियम घेणे आवश्यक असते.तिच्या आहारातून तिला पुरेसे कॅल्शियम मिळत नसल्यास तिला कॅल्शियम सप्लीमेंट घेण्याची गरज भासू शकते.

२.प्रेगन्सीमध्ये हाडांची झीज होण्यापासून बचाव होतो-

बाळाच्या हाडांच्या विकासासाठी कॅल्शियमचा अधिक पुरवठा होत असल्याने गर्भवती स्त्रीमध्ये कॅल्शियमचा अभाव होऊ शकतो.त्यामुळे तिस-या तिमाहीमध्ये तिच्या हाडांची झीज होण्याचे प्रमाण वाढते व हाडांची मिनरल डेन्सिटीदेखील कमी होते.या समस्येपासून वाचण्यासाठी तिने पुरेसे कॅल्शियम सप्लीमेंट घेणे आवश्यक असते.

३.स्तनपानासाठी दूधनिर्मितीचे प्रमाण वाढते-

स्तनपान करताना दूधनिर्मिती होण्यासाठी कॅल्शियमची गरज असते ही गोष्ट अनेक महीलांना माहीत नसते त्यामुळे पुढे स्तनपान करताना तिच्या शरीरातील कॅल्शियमच्या वापरावर ताण येतो.स्तनपान करताना स्त्रीयांना दिवसभरात ३०० ते ४०० मिग्रॅ कॅल्शियमची गरज असते.त्यामुळे ही गरज भागवण्यासाठी शरीर मातेच्या हाडांमधील कॅल्शियम शोषते.त्यामुळे सहाजिकच मातेच्या हाडांमधील कॅल्शियम कमी होते.ही समस्या टाळण्यासाठी डॉक्टर गरोदरपणापासूनच तिला पुरेसे कॅल्शियम सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देतात.

कॅल्शियम सप्लीमेंट घेताना या टीप्स लक्षात ठेवा-

गरोदर महीलेला दररोज १००० मिग्रॅ कॅल्शियमची गरज असते.तुमच्या दररोजच्या आहारातून पुरेसे कॅल्शियम मिळू शकत नाही.त्यामुळे कॅल्शियम सप्लिमेंट घेणे आवश्यक आहे-

  • विटामिन डी सप्लीमेंट अथवा विटामिन डी असलेले पदार्थ आहारात घ्या.यामुळे हाडांना कॅल्शियम शोषण्यास मदत होईल. गर्भवती स्त्रीच्या आहारात आवश्यक असलेली दहा सुपरफूड्स 
  • जर तुम्ही आयर्न सप्लीमेंट घेत असाल तर त्यासोबत कॅल्शियम सप्लीमेंट घेणे टाळा.कारण आयर्न त्यातील कॅल्शियम शोषून घेते.
  • काही लोकांना कॅल्शियम सप्लीमेंट घेतल्याने बद्धकोष्ठता अथवा डायरिया ची समस्या निर्माण होते.तर काही जणांना यामुळे ढेकर येण्याची समस्या होते.असे असल्यास औषध घेणे थांबवण्यापेक्षा त्वरीत तुमच्या डॉक्टरांना कळवा ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील. कॅल्शियमची कमतरता भरूनकाढेल हा खास ‘डाएट प्लॅन’ !

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Viewing all 1563 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>