Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

दुधासोबत हे चार पदार्थ खाणे टाळलेलेच बरे !

$
0
0

आपले आरोग्य हे आपल्या खाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे  दिवसभरात पदार्थांची निवड करताना आपण थोडे दक्ष  राहणे आवश्यक आहे. कारण  आपण खात असलेल्या पदार्थांचा शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे एकापाठोपाठ एक अतिखाल्ल्यास किंवा  विरुदध जातीचे पदार्थ खाल्ल्यास शरीरावर घातक परिणाम होतो. यालाच आयुर्वेदात ‘ विरुद्ध आहार’ म्हणतात.

दूध हे पूर्ण अन्न मानले जाते. त्यामुळे अनेकजण मधल्या वेळेत लागणारी भूक मिटवण्यासाठी दूध  पितात. परंतू त्याच्या सोबत काही चुकीचे पदार्थ खाल्ल्यास शरीरात आम निर्मिती होते. हे विषसमान असल्याने अनेकदा आपले आरोग्य बिघडते. म्हणून ‘ पंचवटी आयुर्वेदिक केंद्रा’च्या डॉ. सौरभी कोरगावे यांनी दुधासोबत हे काही पदार्थ खाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

  • दूध आणि फळं - 

मिल्कशेक किंवा फ्रुट सॅलेड हे चवीला स्वादिष्ट असले तरीही आयुर्वेदात दूध आणि फळं  हा विरूद्ध आहार मानला जातो.  आंबट  फळ दूधासोबत खाणे  टाळावीत. मात्र अपवादात्मक स्थितीत नैसर्गिकरित्या पूर्ण पिकलेले केळं, आंबा यासारखी गोड फळ तुम्ही शिरा किंवा मिल्कशेकमध्ये वापरू शकता.  ( कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे ओळखण्याच्या स्मार्ट क्लुप्त्या)

  • दूध आणि मसाला -

चमचमीत पदार्थांमध्ये ग्रेवी वाढवण्यासाठी अनेकदा दुधाचा वापर केला जातो. पण यामुळे शरीरात दोषनिर्मिती होते. म्हणून मसालेदार पदार्थांसोबत दूध पिणे टाळा.

  • दूध आणि मांसाहार - 

मासे, चिकन, मटण यांसोबत दूध पिणे टाळा.  मांसाहार हा उष्ण असतो तर दूध हे थंड असल्याने शरीरात दुधातील प्रोटीन  व मांसाहार  यांमध्ये रिअ‍ॅक्शन होऊन शरीरात दोष निर्माण होतात.

यासोबतच दूध आणि मीठ एकत्र खाणे देखील टाळावे.

विरुद्ध आहाराचे शरीरावर होणारे दुष्परिणाम 

शरीरात दूध आणि त्याविरुद्ध जातीतील काही पदार्थ एकत्र आल्यास पचनक्रिया बिघडते.  परिणामी त्वचेवर रॅश येणे,  काही त्वचारोग उत्पन्न होणे, पित्त वाढून उलट्या होणे किंवा अपचन होणे अशा समस्या उद्भवतात. त्यातूनच शरीरात गंभीर आजारांची निर्मिती होते.

संबंधित दुवे - 

हळदीचे दूध प्या आणि या ’7′ समस्यांना दूर ठेवा

त्वचेवर खाज येतेय? मग करा हे 6 घरगुती उपाय!

छायाचित्र सौजन्य – shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा. 

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>