मेष
तुमच्या राशीतील ग्रहमान पाहता काही जूने आजार पुन्हा उलटण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही पर्यायी औषधोपचार घ्या. मात्र अॅन्टी बायोटिक्स घेणे टाळा. व्हायरल इंफेक्शनपासून सावध रहा. आजारपण टाळण्यासाठी अस्वच्छ ठिकाणी तसेच बाहेरचे खाणे टाळा.
वृषभ
आरोग्याच्यादृष्टीने हा आठवडा तुम्हांला आरोग्यदायी ठरेल. मात्र खाण्यावर ताबा ठेवा. कारण पचनाचे विकार उद्भवण्याची दाट शक्यता आहे. तसेच अनपेक्षितपणे अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहने हळू चालवा. व्यायाम करताना सावधानता पाळा म्हणजे हाता-पायात गोळा येणार नाही.
मिथून
तुमच्या राशीतील ग्रहमान पाहता तुम्हांला व्हायरल इंफेक्शनचा धोका आहे. सुरवातीला हे आजार लहान वाटू शकतात. मात्र वेळीच योग्य उपचार न घेतल्यास त्याची गंभीरता वाढू शकते. कर्क तुमच्या राशीतील ग्रह आरोग्यास अनुकूल आहेत. त्यामुळे आरोग्यविषयक समस्यांची चिंता करू नका. मात्र म्हणून आरोग्याची हेळसांड करू नका. नियमित आहार आणि व्यायामाची पथ्य पाळा.
सिंह
तुमच्या राशीत सुर्याचा राहूवर परिणाम होत असल्याने आरोग्याच्या कुरबुरी वाढण्याची शक्यता आहे. ऋतूमानात बदल होत असल्याने व्हायरल इंफेक्शनची शक्यता आहे. तुमची रोगप्रतिकारशक्ती खालावल्याने कमजोरी वाढेल. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय करा. तसेच काही त्रासदायक वाटल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कन्या
तुमच्या राशीतील ग्रहमान पाहता तुम्हांला बदलत्या ऋतूचा त्रास होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्दी-तापाचा त्रास होईल. मात्र वेळीच डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार घ्यावेत. सोबतीला तुमची रोगप्रतिकारशक्तीदेखील मजबूत करा. त्यासाठी हेल्दी डाएटचा समावेश करा.
तूळ
आरोग्यविषयक या आठवड्यात चिंता करू नका. मात्र सर्दी-पडशासारखे लहान आजर त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऋतूमानाचा फटका कमी बसण्यासाठी त्यानुसार कपड्यांची निवड करा. पोषक आहार घ्या. खाण्या-पिण्याच्या वेळा पाळा. व्यायाम आणि ध्यानधारणा करणे टाळू नका.
वृश्चिक
ग्रहांची स्थिती पाहता तुम्हांला वायरल इंफेक्शनची शक्यता आहे. त्यामुळे सर्दी- खोकला सारख्या आजारांवर वेळीच योग्य उपचार करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य औषधं घ्या. पोषक आहार घ्या. निरोगी आरोग्यासाठी जीवनात सकारात्मक बदल करा.
धनू
राशीतील ग्रहमानानुसार आरोग्यविषयक काही तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. शरीराकडून मिळणार्या संकेतांकडे लक्ष द्या आणि वेळीच त्यावर नियंत्रण मिळवा. मधूमेही आणि रक्तदाबाच्या रुग्णांनी औषधांची टाळाटाळ करू नका.
मकर
या आठवड्यात मधूमेही आणि सांधेदुखीच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. औषधांंकडे दुर्लक्ष करू नका. पचन मार्गात बिघाड झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. जंक फूड खाणे टाळा. संतुलिक आणि पोषक आहार घ्या.
कुंभ
रक्तदाबाची समस्या असणार्या रुग्णांनी या आठवड्यात विशेष काळजी घ्या. लहान-सहान आजारांची काळजी न घेतल्यास भविष्यात हे त्रास गंभीर ठरण्याची शक्यता आहे. म्हणून अशा समस्यांबाबत हलगर्जीपणा न करता योग्य उपचार घ्या. त्यामुळे मध्यमवयीन आणि त्याहून अधिकवयाच्या लोकांनी फीट राहण्यासाठी हलके व्यायाम करावेत.
मीन
मध्यमवयीन आणि त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांना काही जुने विकार त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. मात्र त्याची गंभीरता वाढू नये म्हणून योग्य उपचार घ्यावेत. या आठवड्यात किडनीच्या विकारांपासून सावध रहा.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.