अनेक लोकांना डोळे कोरडे होण्याची समस्या असते.डोळ्यातील ग्रंथींकडून पुरेसे अश्रू निर्माण न झाल्यास डोळे कोरडे होण्याची समस्या निर्माण होते.तसेच डोळ्याला सतत वंगण न मिळाल्यामुळे डोळे लाल होतात,त्यातून खाज येते व जळजळ होते.हे नक्की वाचा डोळ्यांच्या आरोग्याविषयक ’5′ रंजक अन महत्त्व पूर्ण गोष्टी !
बीजी रोड बेंगलोरच्या फोर्टीस हॉस्पिटलमधील चिफ डायटीशन मिस शालीनी अरविंद यांच्या कडून जाणून घेऊयात डोळे कोरडे होणे टाळण्यासाठी कोणते नैसर्गिक घरगुती उपाय करावेत.
पाणी-
भरपूर पाणी प्यायल्याने कोरडे डोळे होण्याच्या समस्येमध्ये नक्कीच आराम मिळतो.डोळे कोरडे होणे हे तुमचे शरीर डीहायड्रेट असल्याचा एक संकेत असू शकते.सतत एअर कंडीशन वातावरणात काम करणारे लोक पाणी पिण्याकडे सहज दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांना ही समस्या निर्माण होऊ शकते.यासाठी दिवसभरात २ लीटर अथवा ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो.मात्र असे असले तरी डोळे कोरडे होण्याच्या समस्येवर दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक पाणी पिणे आवश्यक असते.
विशेषत: जर तुम्ही कॉफी अथवा कॅफेन पेय सतत घेत असाल तसेच जर तुम्ही थंड व कोरड्या वातावरणात रहात असाल तर तुम्ही भरपूर पाणी पिणे गरजेचे अाहे.पुरेसे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी सतुंलित रहाते व त्यामुळे डोळ्यांमध्ये अश्रू निर्माण होण्याचे कार्य सुरळीत होते. अश्रूंमुळे डोळ्याच्या आतील त्वचा श्लेष्मल,ओलसर रहाते ज्यामुळे डोळ्यांचे इनफेक्शन पासून संरक्षण होते.त्यामुळे तज्ञांच्या मते कोरडे डोळे ही समस्या टाळण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या.जाणून घ्या कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य ?
ओमेगा ३ फॅटी अॅसिड-
ओमेगा ३ फॅटी अॅसिड व इसेंशीयल फॅटी अॅसिडमुळे डोळयातील द्रवपदार्थांचा योग्य निचरा होतो व डोळ्यांचे काचबिंदू आणि डोळ्यांवर दाब येण्यापासून संरक्षण होते.तसेच त्यामुळे डोळे कोरडे होण्याची समस्या देखील टाळता येते.यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फ्लॅक्स सीड ऑईल,फीश ऑईल,चीना सीड्स, अक्रोड,माश्यांची अंडी,फॅटी फीश,सीफूड,सोयाबीन आणि पालक असे ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असलेले पदार्थ वाढवा.
पोटॅशियम-
पोटॅशियम आपल्या शरीरातील संपुर्ण पेशींच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्व असते.पोटॅशियमचे प्रमाण कमी झाल्यास डोळे कोरडे होण्याची समस्या निर्माण होते.स्वीट पोटॅटो,पालक,टोमॅटो प्युरी व रस,केळी,सुकामेवा,लिंबूवर्गीय फळे,शहाळे व रागी यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते.
बी व्हिटॅमिन-
डोळ्यांचेआरोग्य,दृष्टी व अश्रू पटल यांच्यासाठी सर्वच व्हिटॅमिन उपयुक्त असतात.मात्र व्हिटॅमिन बी आणि फॉलिक अॅसिड यांचा सबंध पेशींच्या पुर्ननिर्माण व दुरुस्ती यांच्याशी येतो.त्यामुळे तुमच्या डोळ्यातील श्लेष्मल पडद्याला फॉलिक अॅसिडची अधिक गरज असते.तुम्हाला व्हिटॅमिन बी मांस,अंडी,मासे,पोल्ट्री प्रॉडक्टस,तृणधान्य,मशरुम,सुर्
व्हिटॅमिन ई-
व्हिटॅमिन ई हे एक उत्तम अॅन्टी-ऑक्सिडंट असून ते शरीराच्या रोग प्रतिकारशक्तीचा एक प्रमुख भाग असते.ते झिंक व बीटा कॅरोटीन सोबत घेतल्याने वयोमानानूसार डोळ्यात येणारा कोरडेपणाचा धोका कमी करता येतो.तसेच यामुळे मोतीबिंदू होण्यापासून देखील बचाव करता येतो.सुर्यफुलाच्या बीया,वनस्पती तेल,पालक,शेंगदाणे,बटर फ्रुट,बदाम,ब्रोकोली आणि मासे हे व्हिटॅमिन ई चे काही स्त्रोत आहेत.जाणून घ्या वयोमानानुसार होणारे डोळ्यांचे विकार
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock