Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

बेबी किक्स बाबत या ६ इंटरेस्टिंग गोष्टी

$
0
0

गरोदरपण हा स्त्रीच्या आयुष्यातील एक सुखद अनुभव असतो.गर्भातील बाळाच्या हालचाली व त्याच्या नाजूक लाथांचा अनुभव घेणे हे खूपच रोमांचक असू शकतो.तुमचे गरोदरपण सुखरुप व बाळाची वाढ योग्य दिशेने होत असल्याचे हे एक लक्षण असू शकते.जाणून घेऊयात बाळाच्या या हालचाली व गरोदरपणात तुमच्या शरीरात होणारे बदल नेमके काय दर्शवतात.

१.बेबी किक्स कशा ओळखाल-

मुंबईतील कोकीलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलच्या consultant obstetrician, foetal and maternal medicine, specialist Shantala Vadeyar यांच्या मते बाळाची वाढ व विकास सुरु झाला की बाळ गर्भाशयात हालचाल करु लागते.बाळाच्या या हालचालींना बेबी किक्स असे म्हणतात.या हालचाली बाळाने हात व पाय ताणणे,बाळ एका कुशीला वळणे अशा स्वरुपाच्या असू शकतात.यातील सर्व हालचाली सुरुवातीला आईला जाणवतातच असे नाही.ज्या हालचाली आईला जाणवतात त्या तिला लाथांसारख्या वाटतात.पण पुढे काही आठवड्यांनी जेव्हा बाळ खरोखरच लाथ मारणे अथवा अंग ताणणे अशा हालचाली करु लागते तेव्हा त्या स्त्रीला या हालचाली नेमक्या ओळखणे कठीण जाते.

२.बेबी किक्सचा बाहेरील वातावरणाशी सबंध असतो-

बाळ गर्भाशयात आरामासाठी हात अथवा पाय ताणू लागते तेव्हा त्या हालचाली आईला लाथांप्रमाणे जाणवतात.डॉक्टरांच्या मते या किक्स अथवा हालचालींचा बाळाच्या वाढ व विकासाशी सबंध असतो.बाळ कदाचित बाहेरुन येणारा आवाज,प्रकाश अथवा आईकडून त्याला मिळणारे खाद्य याला प्रतिसाद देण्यासाठी लाथ मारत असू शकते.

३.आई जेवल्यानंतर बाळ खुप वेळ लाथा मारते-

पोटातील एक सुदृढ बाळ दिवसभरात कमीतकमी १५ ते २० वेळा लाथ मारु शकते.ब-याचदा बाळ आईच्या जेवणानंतर व बाहेर मोठा आवाज येत असल्यास अधिक लाथा मारु शकते.

जाणून घ्या गर्भात असताना बाळ करते या ’8 इंटरेस्टिंग गोष्टी !

४.बाळ नऊ आठवड्यांनी लाथ मारण्यास सुरुवात करते-

डॉक्टरांच्या मते बाळाच्या लाथा जरी आईला १८ ते १९ व्या आठवड्यापासून जाणवत असल्या तरी सामान्यत: बाळ नऊ आठवड्यांनी या हालचाली करण्यास सुरुवात करते.या हालचाली सुरुवातीला मातेला जाणवल्या नाही तरी अल्ट्रा साउंडच्या सहाय्याने त्या तिला पहाता येतात.जर मातेने जाणिवपुर्वक लक्ष दिले तर बाळाच्या या हालचाली सुरुवातीपासूनच तिला जाणवू शकतात.पण ब-याच माता याकडे पुरेसे लक्ष देत नसल्यामुळे या हालचाली प्रथम त्यांना जाणवत नाहीत.मात्र २४ व्या आठवड्यानंतर या लाथांचे प्रमाण खुप वाढल्यामुळे त्या मातेला मोठ्या प्रमाणावर जाणवू लागतात.जी माता दुस-यांदा आई होणार असते तिला या हालचाली १३ व्या आठवड्यानंतर नक्कीच जाणवू शकतात.

५.बाळाचे लाथा मारणे कमी होणे हे काही तरी समस्या असल्याचे हे एक लक्षण असू शकते-

एक निरोगी बाळ पोटात १५ ते २० वेळा लाथ मारु शकते.डॉक्टरांच्या मते बाळाचे लाथ मारणे कमी होणे हे काळजी करण्याचे एक कारण असू शकते.याचा अर्थ बाळाला पुसेसे पोषण व ऑक्सिजन मिळत नाही असा असू शकतो.याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तज्ञ अल्ट्रासाउंड स्कॅन व नॉन-स्ट्रेस टेस्ट करतात.त्यामुळे बाळाचे ठोके व हालचाली त्यांना समजू शकतात.कधीकधी अशा वेळी समस्या टाळण्यासाठी त्वरीत डिलीव्हरी करावी लागू शकते.थोडक्यात बाळाच्या हालचाली अथवा लाथा कमी झाल्यास त्याला मदतीची गरज आहे हे लक्षात ठेवा.त्यामुळे जर जेवल्यानंतर देखील बाळ एक तास काहीच हालचाल करत नसेल तर याबाबत त्वरीत तज्ञांचा सल्ला घ्या.कधीकधी आईची शूगर लेवल कमी झाल्यास देखील बाळाची हालचाल कमी होऊ शकते.

६.प्रत्येक वेळी बाळाची हालचाल अथवा लाथा मारणे कमी होणे हे काळजीचे कारण असेलच असे देखील नाही-

बाळ कधीकधी ४० ते ५० मिनीटे गर्भात विश्रांती घेऊ शकते किंवा कधीकधी ३६ आठवड्यांनंतर बाळाला गर्भातील जागा अपुरी पडत असल्यास देखील त्याची गर्भातील हालचाल कमी होऊ शकते.त्यामुळे बाळाची हालचाल कमी होणे हे नेहमी चुकीचे असेलच असे नाही. गरोदरपणातील ’10 गंमतशीर गैरसमज !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>