दही आरोग्यासाठी चांगले असल्याचे आपण जाणतोच. त्याच बरोबर ते खायला ही चविष्ट असते. आजकाल बाजारात विविध ब्रॅन्डचे दही उपलब्ध आहे. पण घरी बनवलेल्या दह्याची चव आणि ते खाण्याची गंमत काही वेगळीच आहे. तसचं ते अधिक आरोग्यदायी असते. नक्की वाचा: दही – युरिनरी ट्रॅक इंफेक्शनवर घरगुती उपाय! मग पहा घरच्या घरी क्रीमी दही बनवण्याच्या या काही पद्धती:
विरजणापासून दही: ही दही बनवण्याची खूप जुनी पद्धत आहे. विरजणापासून दही बनवण्यासाठी अर्धा लिटर दूध उकळवा आणि थंड करा. एका भांड्यात (ज्या भांड्यात दही लावणार आहेत ते भांड) दोन चमचे विरजण घेऊन ते चमच्याने थोडं फेटून घ्या. दूध बऱ्यापैकी कोमट झाल्यावर ते भांड्यात घाला आणि चमच्याने सतत ढवळत राहा. ते व्यवस्थित मिक्स झाल्यावर भांड्यावर झाकण ठेऊन अंधार असलेल्या जागी ठेवा. बरेचजण किचनच्या ओट्यावर गॅस शेजारी हे भांड ठेवतात. रात्रभर हे भांड तसचं ठेवा किंवा कमीत कमी ५-६ तास तरी त्याला हात लावू नका. एकदा दही तयार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेऊन २ दिवसांपर्यंत तुम्ही ते वापरू शकता. तुम्हाला जर या पद्धतीने दही लावायचे असेल तर आधी तुमच्याकडे थोडं दही (विरजण) असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही ते बाजारातून विकत ही आणू शकता. रात्री दही खाणे खरंच त्रासदायक ठरते का ?
सुकलेल्या लाल मिरच्या वापरून बनवलेले दही: तुम्हाला जर आपल्या पारंपरिक पद्धतीने दही लावायचे नसल्यास तुम्ही एक नवीन पद्धत ट्राय करू शकता. त्यासाठी तुम्हाला सुकलेल्या लाल मिरच्या लागतील. अर्धा लिटर दूध उकळवा आणि काही वेळ थंड होण्यास द्या. दूध कोमट झाल्यावर त्यात अख्या लाल मिरच्या देठासकट घाला. आणि रात्रभर किंवा ५-६ तास झाकून ठेऊन द्या. सुकलेल्या लाल मिर्च्यांमध्ये मोठ्या प्रमाणात lactobacilli असते. जे fermentation प्रक्रियेसाठी मदत करते. ज्यामुळे दुधाचे दही बनते. अशा प्रकारे बनवलेले दही फार घट्ट व क्रीमी नसते. पण हेच दही तुम्ही विरजण म्हणून वापरून पारंपारिक पद्धतीने दही बनवू शकता. वाटीभर दह्याने ठेवा वजन आटोक्यात !
दही बनव्यासाठी मायक्रोवेव्ह वापरा: घाईच्या वेळी तुम्हाला जर दही लवकर बनवायचे असेल तर मायक्रोवेव्ह चा उपयोग करा. अर्धा लिटर दूध उकळून कोमट करा. मायक्रोवेव्ह च्या भांड्यांत २ चमचे विरजण घेऊन ते फेटा आणि त्यात कोमट झालेले दूध घाला. नीट मिक्स होईपर्यंत चमच्याने सतत ढवळत रहा. त्यानंतर भांड्यावर झाकण ठेवा. मायक्रोवेव्ह १८० डिग्रीवर २ मिनिटांसाठी प्रीहीट करा आणि मग बंद करा. बंद केलेल्या मायक्रोवेव्ह मध्ये दह्याचं भांड ठेऊन द्या. ३ ते ४ तासात दही तयार होईल. ही वेळ दुधाच्या प्रमाणानुसार बदलेल. घरगुती साजूक तूपाची खास रेसिपी !
चांगल्या प्रतीचं दही बनवण्यासाठी काही खास टिप्स:
- घट्ट आणि क्रीमी दही बनवण्यासाठी टोन्ड दुधाचा किंवा साय काढलेल्या दुधाचा वापर करा.
- विरजण गरम दुधात घाऊ नका त्यामुळे दही पातळ आणि चवीला आंबट होईल.
- तुम्ही वापरत असलेले विरजण आंबट नसल्याची खात्री करा.
- ज्या भांड्यात तुम्ही दूध गरम करता त्यात दही लावू नका.
- हिवाळ्यात दही बनव्यासाठी तुम्हाला जास्त विरजण लागेल. त्याचबरोबर उन्हाळापेक्षा हिवाळ्यात दही बनण्यासाठी वेळही जास्त लागतो.
- दूध घालण्याआधी विरजण नीट फेटून घ्या. त्यामुळे दही नीट बनेल नाहीतर गुढळ्या तयार होतात.
- दूध अतिशय थंड किंवा गरम असू नये. त्यामुळे दही पातळ आणि लिबलिबीत होईल.
- दही बनल्यावर ते फ्रिज मध्ये ठेवा. जास्त वेळ उघडे ठेऊ नका त्यामुळे ते आंबट होईल.
- घरी बनवलेले दही दोन दिवसांपेक्षा अधिक काळ वापरू नका.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock