एखादी सुंदर, आकर्षक व्यक्ती समोर येताच हृदयाचे ठोके अचानक वाढतात. ती व्यक्ती मनोमनी आवडू लागते. आणि सगळं अतिशय मस्त, धुंद भासू लागतं. मग तुम्हाला वाटतं तुम्ही प्रेमात पडलाय. पण खरंच प्रेम इतक्या पटकन होतं का? खरंतर हे त्या व्यक्तीबद्दलचं आकर्षण असतं पण आपण त्याला प्रेम समजत राहतो. मग वचनं देणं घेणं, ते पाळणं ओघानेच आलंच. परंतु, आकर्षण हे उथळ असतं. एखाद्या व्यक्तीबद्दल खोलवर भावना निर्माण व्हायला थोडा वेळ द्यावा लागतो. आणि मगच तुम्ही त्याला प्रेम म्हणू शकाल. या लक्षणांवरून ओळखा तुम्हाला प्रेम नाही आकर्षण झालंय.
- आकर्षण वाटत असताना तुम्ही सारखा त्या व्यक्तीचा विचार करता, तुम्हाला सारखं त्या व्यक्तीसोबत असावं वाटतं, लाडात, प्रेमात यावं वाटतं किंवा नुसतं त्याला/तिला बघूनही बरं वाटतं. पण प्रेमात तुम्ही त्या व्यक्तीसोबत असणं मिस करता तसंच त्या व्यक्तीसोबत बोलावं वाटतं. असं वाटतं जरी असलं तरी भेटण्यास जमणार नसेल तर फोन, मेसेजवर बोलून देखील तुम्ही आनंदी होता.
- आकर्षण हे काहीसं बालिश असल्याने तुम्ही सारखे त्या व्यक्तीच्या मागे असता. म्हणजेच त्याचे/तिचे प्रत्येक फोटोज, स्टेटस लाईक करणे, कमेंट करणे तसेच कॉम्प्लिमेंट देणे. व्हॉट्सअॅपवर लास्ट सीन सतत चेक करणे. ब्रेकअपनंतर फेसबूक, व्हॉट्सअॅप वापरताना या ’5′ गोष्टींचे भान ठेवा !
- तुम्हाला भेटून कमी दिवस झाले असले तरी तुमचे स्वप्नरंजन चालू होते. तुम्ही त्या व्यक्तीचा लाईफ पार्टनर म्हणून विचार करू लागता. प्रेमात असं लगेच काही होत नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. तुम्हाला एखादी व्यक्ती प्रथम भेटीत किंवा बघताक्षणी आवडू शकते. पण प्रेमभावना उत्पन्न व्हायला थोडा वेळ द्यावा लागतो. तो पर्यंत सगळं आकर्षण असतं.
- काही दिवसांच्या भेटीतच तुम्ही त्या व्यक्तीला पूर्ण ओळखता असा तुमचा दावा असतो. तुम्ही त्यांच्यासाठी निर्णय घेऊ लागता किंवा त्यांचे उत्तर काय असेल हे गृहीत धरू लागता. पण असे करू नका कारण काही महिन्यांतच ती व्यक्ती तुमच्या इच्छा-अपेक्षांपेक्षा वेगळं वागू लागेल आणि तुमच्या आशेचा हा फुगा लगेच फुटेल. कसं सांगाल त्याला की, तो तुमचा ‘Mr. Right’ नाही.
- ती व्यक्तीसोबत नसताना एकटेपणा जाणवतो. तर खऱ्या प्रेमात ती व्यक्तीसोबत नसतानाही तुम्ही आनंदी आणि उत्साही असता. आकर्षणामध्ये त्या व्यक्तीच्या सतत जवळ राहावेसे वाटते.
- तुमचं आयुष्य त्या व्यक्तीभोवती फिरत राहतं. त्याचा परिणाम काम आणि वैयक्तिक आयुष्यावर होतो. तुमचा बराचसा वेळ त्या व्यक्तीच्या विचारात व्यतीत होतो. त्या व्यक्तीसाठी तुम्ही काहीही करायला तयार होता. खऱ्या प्रेमात असं काही होत नाही. प्रेमात एकमेकांसोबत ग्रो होण्यात आनंद मिळतो. तुम्ही एकमेकांना स्वीकारता आणि नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयन्त करता. आकर्षणात तुम्ही त्याग करायला तत्पर असता आणि जेव्हा त्याची तीव्रता कमी होते तेव्हा हाच त्याग कंटाळवाणा वाटू लागतो.
- आकर्षणात असुरक्षितता जाणवते. तर प्रेमात तुम्हाला तुमच्या पार्टनरवर पूर्ण विश्वास असतो. पार्टनरच्या प्रेम आणि प्रामाणिकपणाबद्दल तुम्हाला खात्री असते. कामात व्यस्त असल्यामुळे दिवसभर बोलणे जमले नसेल किंवा मेसेजला रिप्लाय केला नसेल हे समजण्याचा समजुदारपणा खऱ्या प्रेमात असतो. तर आकर्षणात जलसी, भीती आणि असुरक्षितता जाणवते. या ’10′ कारणांमुळे घ्यावा लागतो ‘ब्रेकअप’चा निर्णय !!
- त्या व्यक्तीने तुमचे विश्व व्यापून टाकलेले असते. त्यामुळे तुम्ही कुठेही सारखे त्या व्यक्तीबद्दल बोलत राहता. त्या व्यक्तीचा विचार करताना तुम्ही मनातल्या मनात लाजत आणि गालातल्या गालात हसत राहता. त्याने/तिने केलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला आवडू लागते. त्या व्यक्तीचे नाव लिहिणे, फोटोज बघणे ही सगळी आकर्षणाची लक्षणे आहेत. प्रेमात असणारे असा बालिशपणा करत नाहीत.
- त्या व्यक्तीने पूर्णपणे तुमच्याकडे लक्ष द्यावे असे तुम्हाला वाटत असते. तुम्ही दोघांनीच फिरावे असे तुम्हाला वाटते. मग त्याचे किंवा तिचे मित्र मैत्रिणींचा अडसर वाटू लागतो. परंतु प्रेमात तुमची स्विकार करण्याची भावना वाढलेली असते. तुम्हाला त्या व्यक्तीच्या मित्र मैत्रिणींना, कुटुंबियांना भेटावेसे वाटते. एकमेकांना समजून घेण्यासाठी त्याचे/तिचे वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्याची तुमची इच्छा असते. सिंगल मुलींनो ! या ’6′ डेटिंग टीप्स टाळाच
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock