Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

तुमच्या पार्टनरसाठी या ‘६’गोष्टी अजिबात करू नका !

$
0
0

जर एखाद्या नात्यामुळे आपल्याला आपले अस्तित्व किंवा आपण जसे आहोत, जसे राहतो, वागतो हे बदलायला लागत असेल तर त्या नात्यात राहण्याचा उपयोग काय? किंवा हेच खरे प्रेम आहे का? असे प्रश्न आपल्याला पडतात. बरेचदा मुली खूप गोष्टीत समजून घेतात, अडजस्ट करतात. पण ते करताना छान वाटण्याऐवजी दुखावल्याची भावना असते. प्रत्येक नात्यात अडजस्ट करण्याची, समजून घेण्याची गरज असते. पण अडजस्ट ऐवजी तडजोड करणे वाढते ते चुकीचे असते. म्हणून मुलींनो तुमच्या पार्टनरसाठी काही गोष्टी करणे टाळा. जर त्याचे तुमच्यावर खरंच प्रेम असेल तर तो तुम्हाला सन्मानपूर्वक वागवेल.

1.  ड्रेसिंग स्टाईल बदलणे: आपण जसे कपडे घालतो ती आपली आवड आणि ओळख असते. तुम्हाला जर बोल्ड रंग आणि शॉर्ट ड्रेससेस आवडत नसतील तर त्यात चुकीचे काहीच नाही. फक्त तुमच्या पार्टनरला आवडत नाही म्हणून ड्रेसिंग स्टाईल बदलणे याला काहीच अर्थ नाही. फक्त पार्टनरला आवडतं म्हणून लांब केस ठेऊ नका. जर तुम्हाला ते कापावेसे वाटत असतील तर जरूर कापा. मेकअप करावासा वाटत नसल्यास करू नका. तुमची आवड जपा. त्याच्यासाठी तुमचे राहणीमान बदलू नका.

2.  तुमच्या स्वप्नांचा त्याग करू नका: जेव्हा प्रेम उफाळून येतं तेव्हा आपण डोक्याऐवजी मनाने विचार करू लागतो. तो जर त्याचे करियर व्यवस्थित करू शकतो तर मग तुम्ही तुमच्या स्वप्नांना आणि करियरचा त्याग का करता? तुमचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या स्वप्नांचा त्याग करू नका.

3.  मित्रमैत्रिणींसोबत राहू नको: तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा कुटुंबियांना फसवून त्याच्यासोबत फिरू नका. एकमेकांसोबत वेळ घालवणे गरजेचे आहे. पण तुम्हाला तुमचे वैयक्तिक आयुष्य देखील आहे. फक्त त्याला आवडत नाही म्हणून मित्रमैत्रिणींना सोडणे ही सगळ्यांत मोठी चूक ठरेल. सिंगल मुलींनो ! या ’6′ डेटिंग टीप्स टाळाच

4.  मुलं हवे: जर तुम्हाला मुलं नको असेल आणि तुम्ही त्यावर ठाम असाल तर त्याबद्दल तुमच्या पार्टनरशी बोला आणि तुमचे म्हणणे त्याला समजावून सांगा. बाळासाठी काही वर्ष थांबण्याची तुमची इच्छा असेल तर तसे करा. बाळाला जन्म देणे, वाढवणे ही खूप मोठी जबाबदारी असल्याने तुम्हाला त्याबद्दल निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे दोन मुलं हवीत, लगेच मुलं हवे अशा पार्टनरच्या अपेक्षांचे ओझे बाळगू नका. जरूर वाचा: आई होण्याचा निर्णय वयाच्या कोणत्या टप्प्यावर घेणं अधिक योग्य आहे ?

5.  त्याचसाठी उपाशी राहणे: पूर्वीच्या काळी नवऱ्यासोबत जेवण्यासाठी बायका थांबत असतं. जर तुम्हाला भूक लागली असेल तर असे करण्याची गरज नाही. उपाशी राहण्यापेक्षा योग्य वेळी जेवून घेणे योग्य ठरेल. वेळ मिळेल तेव्हा एकत्र जेवणाचा बेत करा. दुपारी एकत्र जेवणे शक्य नसेल तर रात्री एकत्र जेवा. जर त्याला रात्री उशीर होणार असेल तर तुम्हाला वेळेत जेवण्याचा पूर्ण हक्क आहे. त्याच्यासाठी थांबण्याची पार्टनरची इच्छा असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल परत विचार करण्याची गरज आहे. या ’6′ लक्षणांंवरून ओळखा ‘तो’ तुमच्याशी लग्न नाही करणार

6.  सेक्स करणे: सेक्सची इच्छा होणे हे वैयक्तिक आहे. सेक्स किती आणि कशाप्रकारे करावा हा दोघांनी मिळून घेण्याचा निर्णय आहे. त्यामुळे यावर त्याची मनमानी चालणार नाही. त्यामुळे तुम्ही कंम्फरटेबल नसताना किंवा तुमची इच्छा नसताना सेक्स करू नका. त्याच्या इच्छापूर्तीसाठी स्वतःवर जबरदस्ती करू नका. जाणून घ्या:  स्त्रियांमध्ये सेक्सची तीव्र इच्छा कधी होते ?

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>