मांसाहारी म्हटले की माश्याच कालवण, ओलं-सुकं चिकन, मटण किंवा अगदी तळलेले तुकडे हे पदार्थ समोर येतात. पण मटणप्रेमींना पाया सूपचेही आकर्षण असते. म्हणूनच केवळ चविष्ट नव्हे तर सोबतच हेल्दी पाया सूप चाखण्याचे हे काही आरोग्यदायी फायदे आहारतज्ञ प्रिया काथपाल यांनी सुचवले आहेत. या ’7′ आरोग्यदायी कारणांसाठी जरूर मारा ‘चिकन’वर ताव
- पोटात गॅस होणं किंवा बद्धकोष्ठतेसारख्या पचनाच्या समस्या तुम्हांला जाणवत असल्यास पाया सूप पिणे फायदेशीर ठरते. मटणातील हड्डींच्या तुकड्यांमध्ये gelatin घटक आढळतात. यामुळे गॅस्ट्रो इन्टेसस्टिनल मार्ग सुधारण्यास तसेच पचन कार्यामध्ये सुधारणा होण्यास मदत होते.
- मटणातील हड्डींच्या तुकड्यांत उच्च दर्जाचे मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम,सोडियम घटक आढळतात. यामुळे हाडांचे आरोग्य सुधारायला मदत होते.
- मटणाच्या हड्डींमध्ये hyaluronic acid आढळते. यामुळे केसांचे, नखांचे आरोग्य सुधारायला मदत होते. तर कोलेजन घटक हाडांना, स्नायूंना, लिगामेंटला मजबूत करतात.
- journal Chest मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, श्वसनाच्या विकारांमध्ये मटणाच्या हाडांचा आहारात समावेश केल्यास शरीरात पांढर्या पेशींची संख्या सुधारते. परिणामी फ्लू, सर्दी -खोकल्याचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.
- पाया सूप मध्ये अमायनो अॅसिड प्रोलाईन आणि glycine घटक आढळतात. यामुळे अंतर्गत दाह कमी होण्यास मदत होते. यामुळे शरीर शांत होते तसेच झोप येण्यास मदत होते.
मग असे आरोग्यदायी पाया सूप नेमके कसे बनवावे हे जाणून घेण्यासाठी पहा त्याची सविस्तर कृती :
- 4 पायाचे तुकडे
- 1 टेबलस्पून धणे
- 1 टेबलस्पून जिरं
- 1 चिरलेला कांदा
- 5-6 लसणाच्या पाकळ्या
- 2 हिरव्या मिरच्या
- 10 काळामिरी
- 2 टेबलस्पून तेल
- 4-5 कप पाणी
- चवीपुरता मीठ
- कसे बनवाल सूप
मटणाचे लेग पीस कांदा, लसूण, काळामिरीपुड, धणे, जिरं,मिरची, मीठ आणि तेलाच्या मिश्रणामध्ये मॅरिनेट करा.
- या मिश्रणाला प्रेशर कूकरमध्ये पाण्यासोबत लावा. त्यानंतर 5-6 शिट्ट्या करा.
- मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा मीठ घाला आणि परत 2-3 शिट्या होऊ द्याव्यात.
- त्यानंतर गरमागरम पाया सूपवर मिरपूड टाकून त्याची चव चाखा. पाया सूप प्रमाणेच पहा हेल्दी चिकन सूपची टेस्टी रेसिपी
References:
[1] Rennard BO, Ertl RF, Gossman GL, Robbins RA, Rennard SI. Chicken soup inhibits neutrophil chemotaxis in vitro. Chest. 2000 Oct;118(4):1150-7. PubMed PMID: 11035691.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock