तुम्ही किती प्रमाणात जंक फूड खाता? सॉफ्ट ड्रिंक्स किंवा फ्राईज वर किती पैसे खर्च करता? स्वस्त पडतो म्हणून लहान पॉपकॉर्न टबऐवजी मोठा विकत घेता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर तुम्ही तुमच्या आरोग्याचे खूप नुकसान करत आहात. जर तुम्हाला आरोग्यदायी दीर्घ आयुष्य हवं असेल तर तुम्हाला पोर्शन साईजवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. न्यूट्रिशनिस्ट दिव्या सांगलीकर यांच्या सल्ल्यानुसार प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात कॅलरीज लागतात. कारण प्रत्येकाची गरज वेगळी असते. त्याचे प्रमाण वय, लिंग, वजन, उंची, कामाचे स्वरूप यावर अवलंबून असते. पोर्शन साईज नियंत्रित ठेवल्याने वजन आटोक्यात राहते आणि उत्तम आरोग्य लाभते. म्हणूनच पोर्शन साईज नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांनी काही उपाय व युक्त्या सांगितल्या आहेत.
पोर्शन साईज म्हणजे काय?
पोर्शन साईझ ही सर्विंग साईझपेक्षा वेगळी असते. पोर्शन साईझ म्हणजे तुम्ही प्लेटमध्ये घेतलेल्या अन्नाचे प्रमाण. उदा. जर तुम्ही एक संत्र खाल्ले तर तो एक फळाचा भाग झाला. आणि जर तुम्ही एक व्हेजिटेबल सँडविच(२ स्लाइसचं) खाल्ले तर तो दोन cereals चा भाग झाला.
पोर्शन साईजवर नियंत्रण कसे ठेवावे?
फूड पिरॅमिडचा नीट अभ्यास करा. त्यातून तुम्हाला कळेल की आपल्याला दिवसाला कोणत्या पौष्टीक घटकाची किती आवश्यकता असते. त्यानुसार तुम्ही तुमचा डाएट प्लॅन करू शकता. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक खाल्ले जाणारे पदार्थ टाळता येतील आणि कॅलरीज नियंत्रित राहतील. जर तुम्ही एका दिवसात ५ वेगवेगळे कडधान्य खाणार असाल तर ते एका वेळेस न खाता काही वेळच्या अंतराने ३-४ वेळा खा. त्यामुळे पोर्शन साईजवर नियंत्रण राहील.
सकस आणि संतुलित आहार घ्या. त्याचबरोबर साखर व मीठ कमी प्रमाणात खा. आहारातील अति प्रमाणातील साखर, मीठ नियंत्रणात ठेवण्यासाठी खास टीप्स ! तुम्हाला किती कॅलरीजची गरज आहे आणि तुम्ही किती घेताय याकडे लक्ष ठेवा. त्यामुळे पोर्शन साईज नियंत्रित राहील. पोर्शन साईज नियंत्रित ठेवण्यासाठी पदार्थ कपने मोजण्याची गरज नाही. हाताने किंवा रोजच्या वापरातील वस्तूने तुम्ही पदार्थ मोजू शकता.
- मटणाचे प्रमाण मोजताना तुमच्या एका तळहातात राहील इतके मटण घ्या. त्याचे वजन साधारण ७५ ग्रॅम्स इतके असेल.
- भात, पास्ता, उकडलेले बटाटे यांचे प्रमाण मोजण्यासाठी तुमच्या कॉम्पुटर माऊसकडे बघा त्याचा आकार अर्ध्या कपाइतका असेल. तितके हे पदार्थ म्हणजेच साधारण १२५ ग्रॅम घ्या.
- भाजी किंवा सलाड करण्यासाठी हाताच्या ओंजळभर भाज्या घ्या.
- आईसक्रीमची आदर्श पोर्शन साईझ म्हणजे टेनिस बॉलची साईज होय.
पोर्शन साईझवर नियंत्रण ठेवण्याचे आणखी काही उपाय:
- काही वेळच्या अंतराने थोडे थोडे खात राहा. त्यामुळे पोर्शन साईझ नियंत्रित राहील आणि मेटाबोलिसम सुधारेल.
- दोन जेवणाच्या मधल्या वेळेत हेल्दी पदार्थ खा. त्यामुळे भूक भागवली जाईल आणि अती खाण्याला आळा बसेल.
- पोर्शन साईज आटोक्यात ठेवण्यासाठी लहान आकाराच्या प्लेट्स, वाट्या, ग्लास वापरा.
- तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार लाल रंग अधिक प्रमाणात अन्नग्रहण करण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे लाल रंगाच्या प्लेट्स, वाट्या, ग्लास वापरणे टाळा. त्याचबरोबर घरच्या भिंती देखील लाल रंगाने रंगवू नका.
- निळा, हिरवा, पिवळा असे शांतता प्रदान करणाऱ्या रंगाच्या प्लेट्स, वाट्या, ग्लासेस वापरा.
- कामाच्या वेळेत कार्ब्सचे प्रमाण कमी असलेले पदार्थ खा. कारण त्यामुळे सुस्तावल्यासारखे वाटते आणि झोप येते.
पोर्शन साईजवर नियंत्रण ठेवणे म्हणजे कमी खाऊन उपाशी राहणे नव्हे. तर याचा अर्थ शिस्तबद्ध आहार घेणे हा आहे. थोडेसे प्रयन्त आणि नियमित सरावाने तुम्ही पोर्शन साईजवर नियंत्रण मिळवू शकता. ज्या पद्धतीने तुम्ही आहार घेणार आहात त्यासाठी तुमच्या शरीर व मनाला तयार करा. आरोग्यदायी आणि संतुलित जीवनाचे हेच रहस्य असल्याचे डॉ. दिव्या यांनी सांगितले.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock