महिला व पुरुष दोघांच्याही सौदर्यांत चेह-यावरील अॅक्नेची समस्या बाधा आणते.काही जणांना ही समस्या फक्त पौडांगवस्थेत येते तर काहीजणांना त्यानंतरही या समस्येला सतत तोंड द्यावे लागते.जर तुम्हाला देखील तोंडावर पिंपल्स येण्याचा त्रास होत असेल तर हे उपचार जरुर करा.मात्र लक्षात ठेवा पिम्पल्स एका रात्रीत गायब होत नाहीत त्यामुळे सहाजिकच ते दूर करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.खालील उपचार केल्यास काही आठवडयांनी तुम्हाला नक्कीच चांगला फरक दिसून येईल.
ओव्हर-दी काऊंटर औषधे-
जर तुम्हाला कधीतरी सौम्य पिम्पल्स येत असतील तर तुम्ही ते बरे करण्यासाठी ओटीसी औषधांचा वापर करु शकता.या औषधांमधील बेनझॉईल पेरॉक्साईड व सॅलीसिलीक अॅसीड या घटकांमुळे एक्नेमधील बॅक्टेरीयांचा नाश होतो व सुकलेली त्वचा निघून जाते.तुम्हाला ही औषधे कोणत्याही केमिस्टकडे जेल,क्रीम,लोशन,साबण या स्वरुपात मिळू शकतात.
डॉक्टरांनी सांगितलेली औषधे-
जर तुम्हाला अॅक्नेचा खुप त्रास होत असेल तर त्याबाबत तुम्ही डर्मटॉलॉजिस्टचा सल्ला घेऊ शकता.जे तुमच्या समस्येच्या मुळापासून विचार करुन तुम्हाला योग्य उपचार करण्याचा सल्ला देतील.कदाचित तुम्हाला ते ही पुढील औषधे घेण्याचा सल्ला देऊ शकतात.पण लक्षात ठेवा ही औषधे डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेतल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.
- टॉपिकल अॅन्टीबायोटीक्स
- रेटीनॉईडस जेल अथवा क्रीम
- ओरल अॅन्टीबायोटीक्स
- ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हस
- स्पिरोनोलॅक्टोन
- कोर्टिसोन इनजेक्शन
- आयसोट्रेटीनोइन
- लेझर उपचार-
डर्मटॉलॉजिस्टच्या सल्लानूसार लेझर उपचार व काही औषधांचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.तुमच्या पिम्पल्सच्या समस्येनूसार ते तुम्हाला योग्य उपचार सांगतात.अॅक्ने स्कार्स अथवा व्रण दूर करण्यासाठी देखील लेझर उपचार खुप प्रभावी ठरतात.
केमिकल पील्स-
एक्ने लवकर दूर करण्यासाठी केमिकल पील्सचा देखील तुम्हाला जरुर फायदा होऊ शकतो.एक्नेवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी सैलिसिलिक पील ही एक उत्तम पील असू शकते.
होमियोपॅथी -
अॅक्नेवर होमियोपॅथीमध्ये चांगले देखील उपचार करण्यात येतात.मात्र या उपचारांमुळे फायदा मिळण्यास थोडा वेळ लागतो.नियमित औषधे घेतल्यास तुम्हाला याचा चांगला फायदा होऊ शकतो.
काही होमियोपॅथी औषधे-
Sulphur-बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे येणारे जाडसर व कठीण एक्ने असल्यास.
Sanguinaria-मासिक पाळी व रक्ताभिसरणाच्या समस्या असलेल्या महिलांसाठी
Kali bromatum-चेहरा,मान व खांद्यावरच्या एक्नेसाठी
Antimonium crudum- चेह-यावरील छोट्या व लाल पिम्पल्ससाठी.
Antimonium tartaricum- postulation समस्येवर
Berberis aquifolium -खडबडीत त्वच्या असल्यास वारंवार एक्ने येतात.
Asterias Rubens-पौडांगवस्थेतील पिंपल्सवर
Nux vomica-लाल व डाग असलेली त्वचा
Ledum palustre-कपाळावरील कोरड्या पिंपल्स
घरगुती उपाय-
काही औषधी वनस्पतीमध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात.त्यामुळे ही औषधे घेतल्यास अॅक्नेमुळे येणारी सूज व लालसरपणा कमी होतो.
काही औषधी वनस्पती-
पॉट मेरीगोल्ड-ऑईनमेंट,लिक्वीड अथवा इन्फूशन स्वरुपात घेण्यात येते.
वाईल्ड केमोमाईल-सुर्यफुलाच्या वर्गगटातील वनस्पती.हे औषध चहाच्या स्वरुपात घेण्यात येते.
ओर्नामेंटल प्लांट- या वनस्पतीच्या साल व पानांचा अॅस्ट्रींजट म्हणून वापर करण्यात येतो.
टी ट्री ऑईल-ही वनस्पती एक्नेमधील बॅक्टेरियाचा नाश करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते.
तुम्ही जो आहार घेता त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो.यासाठी या उपचारांसोबत योग्य आहार घ्या.त्याच प्रमाणे त्वचेची दररोज योग्य काळजी घ्या यामुळे तुमचा पिंपल्सचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock