नववधूचे सौंदर्य फक्त मेकअप, ड्रेस यावर अवलंबून नसते. यासोबतच तिच्या नैसर्गिक रूपावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यासाठी लग्नाच्या काही आठवडे आधी तयारी सुरु करावी लागते. म्हणूनच ब्युटी एक्स्पर्ट शहेनाज हुसेन यांनी काही नैसर्गिक उपायांनी सौंदर्य खुलवण्यासाठी सोप्या टीप्स दिल्या आहेत. त्यामुळे चेहरा तजेलदार होण्यास मदत होते. काही सोपे फेसपॅक आणि फेसमास्क वापरून घरच्या घरी ही किमया तुम्ही करू शकता. परंतु त्याआधी फेशिअल रुटीन कटाक्षाने सांभाळणं गरजेचं आहे. नववधूंना मेकअप कीट मध्ये आवश्यक असलेल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी जरूर वाचा: नववधूंच्या परफेक्ट मेकअपसाठी हव्यात या 5 गोष्टी !
- दिवसातून किमान दोनदा चेहरा पाण्याने स्वच्छ करा.
- रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून झोपा. त्यामुळे चेहऱ्यावरील धूळ, घाम स्वच्छ होऊन त्वचा मोकळा श्वास घेईल. चेहरा धुण्यासाठी खूप थंड किंवा गरम पाण्याचा वापर करू नका. त्यासाठी कोमट पाणी वापरा.
- सामान्य किंवा शुष्क अशा दोन्ही प्रकारच्या त्वचेला मॉइश्चराईझ करण्यासाठी क्लीनजिंग लोशन किंवा जेलचा वापर करा.
- घरातून बाहेर पडण्यापूर्वी सन्सक्रीम लोशन न चुकता लावा. योग्य सनस्क्रीम कसे निवडावे यासाठी जरूर बघा : व्हिडिओ: कशी कराल योग्य सनस्क्रिनची निवड ?
थंडीच्या दिवसात कोणते फेसपॅक वापराल?
सामान्य त्वचेसाठी: तीळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑइल एका बाटलीत सम प्रमाणात एकत्र करून ठेवा आणि रोज त्वचेवर लावा.
तेलकट त्वचेसाठी: जर तुमची त्वचा तेलकट असेल तर क्रीम लावल्यामुळे अधिक तेलकट होऊन पिंपल्स येऊ लागतात. त्यासाठी १ चमचा ग्लिसरीन, १ लिटर गुलाबपाण्यात घालून एका बाटलीत भरून ते मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. हे मिश्रण नियमित वापरा. किंवा २ चमचे गव्हाच्या कोंड्यात १ चमचा बदाम पावडर, दही आणि गुलाबपाणी घालून फेसपॅक बनवा आणि वापरा.
कोरड्या त्वचेसाठी: त्वचा कोरडी असेल तर मध आणि कोरफडीचा गर एकत्रित करून त्वचेवर लावा आणि २० मिनिटांनंतर पाण्याचे धुवा.
मिश्र त्वचेसाठी: मिश्र त्वचेसाठी ३ चमचे दह्यात मध आणि गुलाबपाणी घालून पॅक बनवा. चेहरा स्वच्छ करून हा पॅक लावा आणि डोळ्यावर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवा. त्यामुळे डोळ्यांनाही आराम मिळेल.
ओठ फाटल्यावर: थंडीतून ओठ फाटण्याची समस्या फार वाढते. त्यासाठी बदामाचे तेल रात्रभर ओठांना लावून ठेवा. ओठ मुलायम होतील.
डोळ्यांभोवती येणाऱ्या सुरकुत्या: अधिक थंडीमुळे डोळ्यांभोवती सुरकुत्या दिसू लागतात. त्यावरही बदाम तेलाने हलकासा मसाज करा. जरूर वाचा:
Read this in Hindi
Translated By –Darshana Pawar
सौजन्य: आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त सौंदर्य तज्ज्ञ व हर्बल क्वीन शहनाज हुसेन.
चित्र सौजन्य: सौंदर्य तज्ज्ञ व हर्बल क्वीन शहनाज हुसेन.