अनेकदा नखं कमजोर झाल्यानंतर ती मध्येच तुटतात, हळूहळू त्यावरील एक एक स्तर निघतात.वैद्यकीय भाषेत या समस्येला Onychoschizia म्हणतात. नखांच्या वरचा स्तर निघायला सुरवात झाली की हळूहळू नखं कमजोर होतात. तसेच ती तुटतात. अशाप्रकारची बेढंग नखं विचित्र दिसतात. यावर मात करण्यासाठी नखांची स्वच्छता आणि काळजी वेळच्या वेळी घेणं गरजेचे आहे. Trasi’s Clinic च्या डरमेटॅलॉजिस्ट डॉ. शेफाली त्रासी नेरूरकर यांनी या समस्येची काही कारणं आणि त्यावरील उपचार सांगितले आहेत.
नखं कमजोर होण्याची काही कारणं :
- पोषणद्रव्यांचा अभाव – शरीरात फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए , यांचा अभाव असल्यास नखं कमजोर होतात.
- Chronic systemic disease – यकृताचे आजार, chronic renal failure यामध्ये नखं कमजोर होतात.
- अंगठा चोखण्याची सवय, नखं कुरतडण्याची सवय यामुळे देखील नखं कमजोर होतात.
- नेल पॉलिश, नेल पॉलिश रिमुव्हरमध्ये घातक केमिकल्सचा वापर केला जातो. त्याचा नखांवर सतत मारा झाल्यास नखं कमजोर होतात आणि तुटतात. नक्की वाचा : नेलपॉलिश लावण्याच्या या ’5′ सवयींमुळे बिघडते नखांचे आरोग्य !
कमजोर नखांचा त्रास आटोक्यात कसा ठेवाल ?
- डॉ. त्रासीच्या सल्ल्यांनुसार, आहारात प्रोटिन रिच पदार्थ तसेच व्हिटॅमिन ए युक्त पदार्थ पुरेशा प्रमाणात ठेवणे गरजेचे आहे.
- फावल्या वेळात नखं खाण्याची सवयं कटाक्षाने टाळा. नखं खाण्याची सवय दूर करतील या ’6′ गोष्टी !
- घरातील कामं करताना, प्रामुख्याने क्लिनिंग एजंटयुक्त पदार्थ वापरून साफसफाई करत असल्यास, हेअर कलर करत असल्यास किंवा इतर केमिकल्सचा वापर करत असल्यास हातात ग्लोव्ह्ज अवश्य घाला.
- व्हिटॅमिन ई युक्त पदार्थांचा, फॅटी अॅसिड्सचा आहारात समावेश करा. संतुलित आणि पोषक आहारांनी नखांचे आरोग्य सांभाळणे शक्य असते.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock