गरोदरपणात हळूहळू वजन वाढणे ही एक स्वाभाविक गोष्ट आहे.त्याचप्रमाणे पहिल्या तिमाही मध्ये वजन कमी होणे हे देखील गरोदरपणातील एक सामान्य लक्षण आहे.मात्र या काळीत अचानक खुप वजन कमी होणे अथवा खुप वजन वाढणे या दोन्ही गोष्टी गंभीर असू शकतात.गरोदरपणात या दोन्ही लक्षणांमुळे काही दुष्परिणाम व चांगले परिणामही आढळून येतात.
मुंबईतील क्लाऊडलाईन हॉस्पिटलच्या स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ(Consultant Gynaecologist and Obstetrician) डॉ.मेघना सरवैया यांच्या मते अनेक गरोदर महीलांचे पहिल्या तिमाही मध्ये वजन कमी होते.अशावेळी पहिल्या तीन महीन्यांमध्ये सरासरी एक ते दोन किलो वजन कमी होण्याची शक्यता असते.शरीरात या दरम्यान होण्या-या अनेक हॉर्मोनल बदलांमुळे तिचे वजन कमी होत असते.त्याचप्रमाणे मॉर्निंग सीकनेस,मळमळ व उलटीमुळे देखील पोटात कमी अन्न गेल्यामुळे या काळात वजन कमी होऊ शकते.
मात्र पहिल्या तिमाहीनंतर वजन कमी होणे थांबते अथवा कमी होते.त्यानंतर दुस-या व तिस-या तिमाहीमध्ये बाळाची वाढ व विकास वेगाने होत असल्यामुळे वजन हळूहळू वाढू लागते.़़डॉ.सरवैया यांच्या मते दुस-या व तिस-या तिमाहीत वजन वाढत असल्यामुळे गरोदर महीलांचे प्रत्येक तिमाहीमध्ये सरासरी चार ते पाच किलो वजन वाढू शकते.गरोदर स्त्रीचे वजन किती वाढू शकते हे ती घेत असलेल्या कॅलरीज,तिच्या शरीरातील मेटाबॉलिजम, तिच्या खाण्याच्या सवयी यावर अवलंबून असते. हे नक्की वाचा Morning Sickness तुमच्या बाळासाठी धोकादायक ठरु शकते का ?
दुस-या अथवा तिस-या तिमाहीमध्ये वजन कमी झाल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतात?
डॉ.सरवैया यांच्या मते काही वेळा या काळात गरोदर स्त्रीयांचे वजन एक ते दोन किलोने कमी होते.असे वजन कमी झाले तरी ते का कमी झाले आहे हे समजणे खुप आवश्यक आहे.कधीकधी या काळात गरोदर स्त्रीला डायरिया झाल्यामुळे किंवा भूक कमी झाल्यामुळे वजन कमी होऊ शकते.मात्र पुढेही सतत तिचे वजन कमी होत असेल तर मात्र तिने याबाबत सावध होणे गरजेचे आहे.जर वजन कमी झालेली गरोदर स्त्री अन्न कमी खात असेल तर तिच्या घरातील मंडळींनी तीला जबरदस्ती अन्न खाण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे.अशा स्त्रीयांच्या आहारात योग्य प्रमाणात प्रोटीन असणे आवश्यक आहे त्यामुळे तिचे वजन वाढण्यास मदत होईल.यासाठी गरोदर स्त्रीच्या कुटूंबातील लोकांनी आई व बाळ दोघांचेही योग्य पोषण होत आहे का याची दक्षता घ्या. जाणून घ्या गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?
गरोदर पणात वजन कमी होत असल्यास याबाबत काळजी करणे कधी गरजेची आहे?
डॉ.सरवैया यांच्या मते गरोदरपणात सरासरी दहा किलो वजन वाढणे हे गरोदर स्त्री व तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी हितकारक असते.त्यामुळे जर तुमचे नियमित वजन असेल मात्र कधीतरी एक ते दोन किलो वजन कमी झाले तर त्यात काळजी करण्याचे काहीच कारण नाही.पण जर दर महीन्याला तुमचे एक किलो वजन कमी होत असेल तर मात्र तुम्ही त्वरीत तुमच्या डॉक्टरकडे जाऊन यावर उपचार करणे आवश्यक आहे.कारण असे होणे तुमच्या बाळाच्या हिताचे नाही.गरोदरपणात खुप वजन कमी झाल्यामुळे गर्भाची पुर्ण वाढ व विकास न झाल्यामुळे वजन कमी असलेले बाळ जन्माला येऊ शकते.त्यामुळे खुप वजन कमी होत आहे असे आढल्यास योग्य ती काळजी घ्या.लक्षात ठेवा गरोदरपण ही तुमचे वजन कमी अथवा जास्त झाल्यामुळे काळजी करण्याची स्थिती नसून निरोगी व स्वस्थ बाळ जन्माला येण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याची स्थिती आहे. नक्की वाचा चटकदार डोहाळ्यांवर मात करा या ’10′ हेल्दी पदार्थांनी !
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock