चेह-यावर पिंपल येत असेल व काही केल्या जात नसेल तर ही तुमच्यासाठी एक चिंतेची बाब असू शकते.या पिंपलच्या माध्यमातून तुमचे शरीर तुमच्या आरोग्यसमस्या बद्दल संकेत देत असते.यासाठी तुमच्या चेह-यावरील पिंपल येण्याच्या जागेवरुन तुमच्या आरोग्याची स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा.
आयुर्वेद आणि पारंपारीक चायनिज औषध तज्ञांचा फेस मॅपींग वर विश्वास असतो.त्यांच्या मतानूसार तुमच्या चेह-याच्या ज्या भागावर पिंपल येतं त्या भागाचा संंबंध तुमच्या शरीरातील निरनिराळ्या अवयवांसोबत येत असतो.चेहरा अथवा जबडयावरचे पिंपल्स शरीरातील अवयवांमधील विकार अथवा बिघाडाचे प्रतिनिधीत्व करीत असतात.
जाणून घेऊयात चेह-यावरील या भागांवरील पिंपल्स शरीरातील कोणत्या अवयवांचे प्रतिनिधीत्व करते-
१.कपाळ-
आपले संपूर्ण कपाळ शरीरातील मोठे आतडे,छोटे आतडे,यकृत,पित्त मुत्राशय या अवयवांशी संबधीत असते. लहान मुलांच्या चेह-यावरील पुरळाचे कारण त्यांच्या केसांमधील तेलकट त्वचा देखील असू शकते.
काय उपाय कराल-
जर तुम्हाला कपाळावर पिम्पल्स येत आहेत असे निदर्शनास आले तर लगेच जंकफूड खाणे थांबवा व चांगले हेल्दी पदार्थ खाण्यास सुरुवात करा.त्याचप्रमाणे आतड्याच्या अंतर्गत शुद्धीचा देखील तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
२.भुवयांमधील भाग-
भुवयांमधील भागात पुरळ येत असेल तर त्याचा संबध तुमच्या यकृताशी अाहे.
काय उपाय कराल-
जर तुम्ही मद्यपान करीत असाल तर आता तुम्हाला ते त्वरीत थांबवणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे तुमच्या आहारातून ग्रीसी फूड कमी करा.नियमित व्यायाम करणे सुरु करा व मुबलक प्रमाणात पाणी प्या.त्यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होईल.
३.नाक-
तुमच्या नाकाचा सबंध तुमच्या ह्रदय आणि पोटासोबत येतो.त्याचप्रमाणे कधीकधी काही सौदर्यप्रसाधने,आयब्रो थ्रेड्रींग अथवा प्लकींग केल्यामुळे किंवा टिकलीच्या गमाची अॅलर्जी झाल्यानेदेखील तुम्हाला या भागात पुरळ येऊ शकते.
काय उपाय कराल-
यावर उत्तम उपाय म्हणजे त्वरीत तुमचे ब्लड प्रेशर तपासा.आणि विटामीन बी १२ चे प्रमाण वाढवा कारण यामुळे तुमच्या ह्रदयाचे कार्य सुधारेल.याच प्रमाणे ओमेगा ३ फॅटी अॅसिडसह योग्य आहार घेण्यास सुरुवात करा.नियमित व्यायामाचा तुम्हाला अधिक चांगला फायदा होऊ शकतो.प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे सोडून द्या.जर तुम्ही लठ्ठ असाल तर या नाकावर पुरळ येणे सुरु झाल्यास तुमचे वजन कमी करण्याची गरज आहे हे ओळखा.तसेच सौदर्यप्रसाधने व इतर ब्युटी ट्रिटमेंटमधले इनफेक्शन टाळण्यासाठी वॅक्सिंग व थ्रेडींग नंतर तुमच्या त्वचेला योग्य असे टोनर वापरण्यास सुरुवात करा.
४.डोळ्यांचा आजूबाजूचा भाग-
डोळ्यांचा आजूबाजूचा भाग तुमच्या किडनीचे प्रतिनिधीत्व करीत असतो.जर तुम्हाला या भागात पिंपल अथवा डार्क सर्कल्स असतील तुर तुम्हाला भरपूर पाणी पिण्याची व किडनीची विशेष काळजी घेण्याची आवश्यक्ता आहे.
काय उपाय कराल-
दिवसभर मुबलक पाणी प्या.अधिक चांगल्या परिणामांसाठी पाण्यासोबत लिंबू आणि मध घ्या.किडनीचे कार्य चांगल्या रितीने होण्यासाठी या मिश्रणाचा तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो.त्याचप्रमाणे मद्यपान व धुम्रपान करणे टाळा कारण याचा तुमच्या किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
५.गाल-
खराब मेकअप ब्रश व मळलेले सेलफोन्स यामुळे देखील तुमच्या गालावर पिंपल येते.त्याचप्रमाणे गालावर पिंपल येण्याचा अर्थ तुमच्या फुफ्फुसांमध्ये बिघाड झालेला आहे.यासाठी दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा.
काय उपाय कराल-
जर तुम्ही धुम्रपान करत असाल, तुम्हाला सायनुसायटीस,सतत अॅलर्जी किंवा श्वसनाच्या समस्या होत असतील तर तुमच्या गालावर पिंपल येण्याची दाट शक्यता असते.या समस्येला मुळापासून हटवण्यासाठी धुम्रपान करणे बंद करा व दीर्घ श्वास घेण्याचा सराव सुरु करा.
६.हनुवटी किंवा जबडा-
हनुवटी किंवा जबडयावरील पिंपल हे हॉर्मोन्स व पचनशक्तीमधील असंतुलनाचे लक्षण आहे.
काय उपाय कराल-
कमी फॅट्स असलेले व हेल्दी पदार्थ खाणे हा यावर रामबाण उपाय आहे.त्यासोबत जर तुम्हाला हॉर्मोन्सच्या असतुंलनामुळे अनियमित मासिकपाळी,वजन लवकर वाढणे,थकवा येणे व अस्वस्थ वाटणे अशा समस्या होत असतील तर त्वरीत याबाबत तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या.
७.कान-
कान तुमच्या किडनीचे प्रतिनिधीत्व करीत असतात.त्यामुळे डिहायड्रेशनमुळे तुमच्या कानावर पिंपल येऊ शकते.
काय उपाय कराल-
वर सांगितल्याप्रमाणे भरपूर पाणी पिणे व शरीराला हायड्रेटेड ठेवणे याला प्रथम प्राधान्य द्या.यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होईल व तुमची त्वचा अधिक स्वच्छ व तजेलदार दिसेल.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock