अनेक दशकांपासून फर्टिलिटी आणि गर्भधारणेबाबत काही समज-गैरसमज प्रचलित आहेत.पुर्वीपासून चालत आलेल्या या समजांमुळे आजही अनेक जोडपी फर्टिलिटीबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे टाळतात.
दिल्लीतील मदर लॅप आयव्हीएफ सेंटरच्या मेडीकल डायरेक्टर व आयव्हीएफ स्पेशलिस्ट डॉ.शोभा गुप्ता यांच्या कडून जाणून घेऊयात फर्टिलिटी आणि गर्भधारणेबाबत असलेल्या अशाच काही प्रचलित समज-गैरसमजांबाबत
समज १-महीलांप्रमाणे पुरुषांमध्ये फर्टिलिटीबाबत कोणतीही मर्यादा नसते.पुरुषांमध्ये त्यांच्या वयाच्या ८० वर्षांनंतरही शुक्राणूंची निर्मिती होत असते.त्यामुळे फर्टिलिटी उपचारांची गरज पुरुषांना नसून फक्त महीलांना आहे-
पुरुषांमध्ये त्यांच्या वयाच्या ऐंशीवर्षांनंतरही शूक्राणू निर्माण होतात हे जरी खरे असले तरी याचा अर्थ प्रत्येक पुरुषामधील स्पर्म गर्भधारणेसाठी योग्य असतात असा होत नाही.पुरुषांचे वय,त्यांची जीवनशैली आणि त्यांना असणा-या सिगरेट,दारु सारख्या वाईट व्यसनांच्या सवयींचा त्यांच्या फर्टिलिटीवर प्रभाव पडतो.असे ब-याचदा आढळले आहे की दुस-या अथवा तिस-्या अपत्यासाठी प्रयत्न करणा-या पुरुषांमध्ये याबाबत समस्या निर्माण झाल्या आहेत.अशा पुरुषांमध्ये स्पर्मची संख्या कमी असणे(Oligospermia) किंवा स्पर्मची गुणवत्ता कमी असणे(Azoospermia)या समस्या आढळतात.वाय-फाय व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा अती वापर,त्याचप्रमाणे सतत जंकफू़ड खाण्याची सवय असणा-या पुरुषांना इनफर्टिलिटीच्या समस्येचा सामना करावा लागतो.
समज २-जर स्त्रीयांची मासिक पाळी नियमित असेल तर जरी त्यांचे वय अधिक असले तरी त्या आई होऊ शकतात-
जोपर्यंत महिलांची मासिक पाळी सुरु असते तोपर्यंत त्या आई होऊ शकतात हे जरी खरे असले तरी मासिक पाळी सुरु असण्याचा व स्रीबीजाच्या आरोग्य व गुणवत्तेचा काहीही संबध नसतो.वयाच्या २५ वर्षांनंतर स्त्रीबीजाची गुणवत्ता कमी होऊ लागते.त्यामुळे वयाच्या तीस वर्षांनंतर आई होणा-या मातेच्या बाळामध्ये जनूकीय विकृती येण्याचा धोका निर्माण होतो.यासाठीच त्याआधी तुम्ही बाळासाठी प्रयत्न करणे नेहमीच योग्य असते.चाळीस वर्षांपर्यंत जरी तुमची मासिक पाळी सुरु असली तरी त्यावयात तुमचे स्त्रीबीज गर्भधारणेसाठी योग्य असेलच असे नाही. जाणून घ्या आई होण्याचा निर्णय वयाच्या कोणत्या टप्प्यावर घेणं अधिक योग्य आहे ?
समज ३-गर्भधारणे पुर्वी धुम्रपान करणे ठीक आहे मात्र गर्भधारणा झाल्यावर लगेच धुम्रपान सोडणे गरजेचे असते-
बाळाच्या जन्मासाठी तुमचे गर्भाशय पुरक व पोषक असणे गरजेचे असते.यासाठी गर्भधारणेपुर्वीच कमीतकमी सहा महिने आधी तुम्ही स्मोकींगची सवय सोडणे गरजेचे आहे.गर्भधारणे पुर्वी महीलांप्रमाणेच पुरुषांनी देखील धुम्रपान करणे टाळावे कारण धुम्रपानाचा तुमच्या स्पर्मच्या संख्या व गुणवत्तेवर विपरित परिणाम होतो.
समज ४- ओव्हूलेशनच्या २४ तासांच्या आत सेक्स संबध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते-
सर्वात महत्वाची बाब म्हणजे ओव्हूलेशन पिरिएड समजणे खुप कठीण असते.कारण तुमच्या मासिक पाळीच्या ७ ते १० दिवसांमध्ये कधीही ओव्हूलेशन होण्याची शक्यता असते.पण जर तुम्हाला चांगला परिणाम हवा असेल तर यासाठी २४ तास वाट बघत बसू नका.लक्षात ठेवा गर्भाशयात स्रीबीज २४ तास तर शुक्राणू ७२ तास जीवंत राहू शकतात.गर्भधारणेसाठी तुम्ही ओव्हूलेशन झाल्यावर लवकरात लवकर सेक्स करणे गरजेचे असते.तज्ञ नेहमी गर्भधारणेसाठी ओव्हूलेशनच्या आधी एक दिवस किंवा ओव्हूलेशनच्या दिवशीच सेक्ससंबध ठेवण्याचा सल्ला देण्यात.कारण शूक्राणूंचे स्त्रीबीजासोबत होणारे मिलन हे स्त्रीबीज अंडाशयातून बाहेर पडून फेलोपियन ट्यूबमध्ये शिरण्यापुर्वी होणे आवश्यक असते.
समज ५-जर दररोज सेक्ससंबध ठेवले तर आयव्हीएफ उपचार न करताही गर्भधारणा होऊ शकते-
असे असते तर आतापर्यंत नि:संतान जोडप्यांना डझनभर मुले झाली असती.गर्भधारणा न राहण्याची प्रत्येक पुरुष व स्त्रीयांमध्ये विविध कारणे असू शकतात.महीलांमध्ये याचे कारण पीसीओडी,लठ्ठपणा किंवा फेलोपियन ट्यूब ब्लॉक असणे ही असू शकतात तर पुरुषांमध्ये यांचे कारण स्पर्मची संख्या व गुणवत्ता कमी असणे हे असू शकते.जर अनेक वर्षांपासून प्रयत्न करुनही तुम्हाला यश मिळत नसेल यासाठी दोघांच्या सहमतीने चांगल्या फर्टिलिटी एस्पर्टचा सल्ला घेण गरजेचे आहे. नक्की वाचा यशस्वी गर्भधारणेसाठी ’8′ हॉट सेक्स पोजिशन्स !!
समज ६-लठ्ठपणा अथवा वजन अधिक असेल तरी स्त्रीमध्ये गर्भधारणा होणे शक्य असते-
फक्त लठ्ठपणामुळेचे फर्टिलिटी मध्ये समस्या होतात असे नाही.तुमच्या जोडीदाराची फर्टिलिटी,तुमचे ओव्हूलेशन,स्त्रीबीजाची गुणवत्ता या सर्व गोष्टींचा स्त्रीच्या गर्भधारणेवर परिणाम होत असतो.लठ्ठपणामुळे तुमच्या शरीरात पीसीओडी,अनओव्हूलेशन,ह़ॉर्मोनल असंतुलन अशा समस्या निर्माण होतात ज्यामुळे गर्भधारणा होणे कठीण होते. ( नक्की वाचा : करियर आणि आरोग्य सांभाळू शकता मग ‘आई’ होण्याचा निर्णय 30शीच्या पार कशाला ?)
समज ७- सेक्शुअली ट्रांसमिटेड डिजीज(STDs) चा तुमच्या गर्भधारणेवर कोणतीही परिणाम होत नाही-
जर तुम्हाला कोणाताही सेक्स विकार असेल तर कृपया तुमच्या बाळाच्या आगमनाची तयारी थोडी पुढे ठकला.तुमच्या आजारावर योग्य उपचार केल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्या व त्यानंतरच गर्भधारणेसाठी प्रयत्न करा.एसटीडी विकारांमुळे महिला अथवा पुरुष दोघांच्यांही जननेद्रियांमध्ये जखम अथवा अडथळा निर्माण होऊ शकतो ज्यामुळे कायम वंधत्व येण्याचा धोका असतो.यासाठी नेहमी सुरक्षित सेक्स करा.
समज ८-तुमच्या आहाराचा तुमच्या प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही-
काही पदार्थ व औषधी वनस्पतींच्या सेवनाने प्रजननक्षमता वाढते तर काही पदार्थाच्या सेवनाचा यावर विपरित परिणाम होतो.विशेषत:कोक आणि कॅफेन सारख्या पदार्थांच्या सेवनाने फर्टिलिटीवर वाईट परिणाम होतो.यासाठी जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल तर तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या.
समज ९-जर अती ताणतणावाचा तुमच्या फर्टिलिटी वर परिणाम होत असेल तर फर्टिलिटी उपचारांपेक्षा फक्त योगासने किंवा व्यायाम करुन तुम्हाला गर्भधारणा करणे सोपे होते.
निरोगी शरीर व मानसिक स्वास्थाचा गर्भधारणेवर चांगला परिणाम होतो हे जरी खरे असले तरी जर तुम्ही अती ताणतणावात्मक जीवनशैली जगत असाल आणि यात तुमचे वय देखील अधिक असेल तर फक्त योगा व व्यायाम यांचा तुम्हाला फायदा होईलच असे नाही.यासाठी प्रथम तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन तुमच्या फर्टिलिटीचीचे स्टेटस तपासून बघा व त्यांच्या सल्लानूसार जीवनशैलीमध्ये योग्य बदल करा. जाणून घ्या Hypothyroidism चा त्रास फर्टिलिटीवर कशाप्रकारे परिणाम करतो ?
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock