Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मसाला चहा अथवा ग्रीन टी या पैकी कोणता पर्याय निवडाल?

$
0
0

जगभरात चहा हे पेय अगदी आवडीने घेतले जाते.चहा दिवसभरात कधीही घेता येत असला तरी सर्वसाधारणपणे अनेक लोक दिवसाची सुरुवात फ्रेश करण्यासाठी सकाळी चहा घेतात.थंडीच्या दिवसात कडक,वाफाळता चहा घेतला जातो तर उन्हाळ्यामध्ये थंडगार आईस-टी घेणे अनेकांना आवडते.चहामध्ये सुगंध आणि चवीसोबत फ्लेवोनॉईड हे औषधी घटक सुद्धा  असतात.फ्लेवोनॉईडमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.चहा हे पेय तयार करणे अगदी सोपे व सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असते.

जाणून घेऊयात भारतातील प्रत्येक घरात केल्या जाणा-या मसाला चहा आणि जगभरात हेल्थ ड्रिंक म्हणून प्रसिद्ध असलेल्या ग्रीन टी मधील काही औषधी गुणधर्म

मसाला चहा-

भारतातील प्रत्येक घरात दररोज मसाला चहा केला जातो.या चहा मध्ये दूध,साखर आणि चहाचा मसाला वापरण्यात येतो.मसाला चहा मध्ये वापरण्यात आलेल्या मसाल्यांमुळे या चहाला कडक सुगंध व चव येते.मसाला चहा मध्ये वेलची,लवंग,दालचिनी,सुंठ,मिरपूड आणि तुळसीची पाने या मसाल्यांचा वापर करण्यात येतो.या विविध मसाल्यांच्या मिश्रणामुळे आरोग्यासाठी हितकारक आणि उत्तम अॅन्टीऑक्सिडंट असलेले मसाला चहा हे पेय तयार होते. जाणून घ्या आश्चर्यकारक- चहा पिणे आरोग्याला हितदायी !

मसाला चहामध्ये वापरण्यात येणा-या प्रत्येक मसाल्याच्या पदार्थांमध्ये विशिष्ठ औषधी गुणधर्म असतात.

वेलची-

वेलचीच्या सेवनामुळे पचनशक्ती सुधारते व अॅसिडीटी कमी होते.जर तुम्हाला या पचनाबाबत एखादी समस्या असेल तर घरच्या घरी एक वेलचीयुक्त चहा घेणे तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल.

लवंग-

लवंग हे एक प्रभावी अॅन्टीऑक्सिडंट आहे.यामुळे श्वसनमार्गातील इनफेक्शन कमी होते.शरीरातील दाह कमी होतो व पचनक्रिया देखील सुधारते.

दालचिनी-

दालचिनीमुळे फॅट्स कमी होतात व शरीर निरोगी,सुदृढ राहते.दररोज एक दालचिनी स्टीक तुमच्या चहाच्या कपात ढवळून तुम्ही तुमचा दिवस अधिक फ्रेश करु शकता.

आले-

डोकेदुखी,खोकला,सर्दी व तापामध्ये आले घेतल्यास आराम मिळतो.आल्यामुळे शरीरातील दाह कमी होतो.रुमाटर अर्थ्रायटीस सारख्या विकारातील रुग्णांना सांधेदुखीवर चहातून आले घेतल्याने फायदा मिळतो. जाणून घ्या गवती चहा दूर करेल हे ’6′ आजार !

काळीमिरी-

काळीमिरी देखील एक उत्तम अॅन्टीऑक्सिडंट असल्याने सर्दी-खोकला व श्वसनाच्या  समस्येमध्ये ती गुणकारी ठरते.काळीमिरी मुळे आतड्याच्या समस्या व जंतूसंसर्ग कमी होतो.

तुळसीची पाने-

तुळसीच्या पानांमुळे चहाला सुंदर सुगंध येतो.चहात तुळशीची पाने टाकल्याने शरीरावरचा व मनातला ताण कमी होतो.त्याचप्रमाणे शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते.

मसाले चहामध्ये वापरण्यात आलेल्या मसाल्यांमुळे आरोग्यावर चांगले परिणाम होतात.मात्र यासाठी मसालाचहा योग्य पदद्धतीने तयार करणे गरजेचे आहे.चहा मध्ये म्हशीचे अथवा डबलफॅट मिल्क वापरल्याने तुमच्या शरीरात फॅट्स वाढण्याची शक्यता असते.त्याचप्रमाणे चहात साखर वापरल्यामुळे कॅलरीज देखील वाढतात .

ग्रीन टी-

ग्रीन टी ही मुळचे चायना मधील पेय आहे.ग्रीन टी मध्ये फ्लेवोनॉईड्स व अॅन्टीऑक्सिडंट असतात.ग्रीन टी घेणे आरोग्यासाठी उत्तम असते कारण या चहामध्ये इतर चहा प्रमाणे फरमेंटेशन साठी कोणतीही प्रक्रिया केली जात नाही.त्यामुळे  ग्रीन टी मध्ये योग्य प्रमाणात फायटोकेमिकल व अॅन्टीॉक्सिडंट राखले जातात.

ग्रीन टी मधील अॅन्टीॉक्सिडंट घटकांमुळे हे पेय आरोग्यासाठी उत्तम ठरते.त्याचप्रमाणे ग्रीन टी मध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असल्याने वजन कमी करण्यासाठी देखील ते फायद्याचे ठरते.ग्रीन टी घेतल्यामुळे मेटाबॉलिजम सुधारते व फॅट्स कमी होतात.त्याचप्रमाणे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मधूमेहींनी ग्रीन टी घेणे फायद्याचे ठरते. वजन घटवण्यासाठी किती आणि कसा प्याल ‘ग्रीन टी’ हे देखील अवश्य जाणून घ्या.

मसाला चहा व ग्रीन टी पैकी नेमका कोणता चहा घेणे आरोग्यासाठी योग्य ठरेल.

मसालाचहा व ग्रीन टी ही दोन्ही पेये घेणे आरोग्यासाठी हितकारक आहे.मात्र मसाला चहा मधील दूध आणि साखरेच्या वापरामुळे रक्तातील साखर व फॅट्स वाढण्याचा धोका असू शकतो.ग्रीन टी मध्ये यामधील कोणतेही घटक वापरण्यात न आल्यामुळे वजन कमी करण्यासाठी व रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे सोपे होते.

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी व निरोगी आयुष्यासाठी दिवसभरात फक्त एक ते दोन वेळाच मसाला चहा व दिवसभरात कधीही ग्रीन-टी तुम्ही घेऊ शकता.मसाला चहामध्ये फक्त स्किम्ड दूधाचा वापर करा ज्यामुळे तुमच्या कॅलरीज वाढणार नाहीत.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles