2016 हे वर्ष संपायला अगदीच काही दिवस बाकी आहेत. या वर्षात चॉकलेट बॉय, रोमॅन्टिक हिरो अशा भूमिकांसाठी चटकन येणारे एक नाव म्हणजे उमेश कामत. पण 2016 मध्ये उमेशने या सगळ्या चौकटी मोडत त्याचा सिक्स अॅब्स लूक आपल्यापुढे मांडला. पण ही एखाद्या भूमिकेची गरज म्हणून नव्हे तर स्वतःचा फीटनेस, आरोग्याबाबत थोडं कटाक्षाने लक्ष देत उमेशने स्वतःमध्ये अनेक बदल केलेले दिसून आले आहे. नक्की वाचा : 2016 मध्ये या ’5′ मराठी सेलिब्रिटीजनी केले हेल्दी बॉडी ट्रान्सफरमेशन !
उमेश सोबतच त्याची पत्नी प्रिया बापट हीनेदेखील ‘वजनदार’ मधील भूमिकेसाठी तब्बल 16 किलो वजन वाढवून ते पुन्हा घटवले. या प्रक्रियेदरम्यान प्रिया देखील स्वतःच्या शरीराकडे जाडं/ बारीक यापलिकडे जाऊन पहायला लागली असे सांगते. म्हणूनच या वर्षभराची त्यांची ही मेहनत आणि उत्साह पुढील काळासाठीही टिकून रहावा यासाठी प्रिया- उमेश दोघंही प्रयत्नशीर राहणार आहेत. नक्की पहा ‘वजनदार’ साठी सई ताम्हणकर आणि प्रिया बापटने कशी घेतली मेहनत
- प्रियाने काय दिलं उमेशला बर्थ डे गिफ्ट ?
नुकताच 12 डिसेंबरला उमेशने 38 वा वाढदिवस साजरा केला. या दिवशी प्रिया- उमेशने त्यांच्या रसिकांसाठी खास आणि पहिलावहिला फेसबुक लाईव्हदेखील केला. कांदिवली येथील शैलेश परुळेकरांच्या जीममध्ये अनेक मराठी स्टार्स घाम गाळतात. प्रिया आणि उमेशदेखील येथेच मेहनत घेतात. परुळेकर सरांच्या सल्ल्यानुसारच प्रियाने उमेशला एका सायकल बर्थडे गिफ्ट दिल्याचे सांगते. उमेशही सायकलिंगला एक फीटनेस फंडा म्हणून पाहतो. सायकलिंगसाठी कठीण मानला जाणारा खंडाळा घाट काही दिवसांपूर्वी उमेशने सायकलिंग करत गाठला होता.
- काय आहे प्रिया- उमेशचं ‘ न्यु इअर (2017) रेझ्युलेशन ?
प्रिया आणि उमेशच्या आयुष्यात फीटनेस हा आता एक अविभाज्य घटक झाला आहे. त्यानुसार उमेश कामत येत्या वर्षी शक्य तितक्या जवळच्या स्थळी कार ऐवजी सायकलवरूनच प्रवास करण्याला प्राधान्य देणार आहे. तर प्रिया बापट दिवसभरातील किमान 45 मिनिटं स्वतःच्या आरोग्यासाठी नियमित ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.
छायाचित्र सौजन्य – Instagram, Facebook