Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ३ फायद्यांसाठी प्रत्येक महिलेने गरोदरपणानंतर करावा किगल व्यायाम

$
0
0

गर्भारपणात किगल व्यायाम केल्याने चांगला फायदा होतो.या व्यायामामुळे तुमच्या पेल्विक भागातील स्नायू मजबूत होतात.ज्यामुळे प्रसुती कळा सहन करणे सोपे होते. किगल हा एक सोपा व्यायाम प्रकार असल्याने गरोदरपणात प्रशिक्षकाविनाही तो तुम्ही करु शकता.

त्याचप्रमाणे प्रसुतीनंतरही महिलांनी हा व्यायाम केल्यास त्यांना याचा चांगला फायदा होतो.प्रसुती दरम्यान योनीमार्गातील स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणामुळे योनीमार्ग शिथील होण्याची शक्यता असते.ज्यामुळे पुढे महीलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.मात्र नियमित  किगल व्यायाम केल्यास या समस्या तर दूर होतातच शिवाय त्यांना पुर्वीप्रमाणे सेक्स लाईफचा आनंद घेण्यास याची मदत होते.यासाठी प्रसुतीनंतरही महीलांनी  किगल एक्सरसाईज चा सराव जरुर करावा.

मुंबईतील सुप्रजा फाऊंडेशन व अश्विनी आयव्हीएफ सेंटरच्या Pediatrician व गर्भसंस्कार लेखिका डॉ.गीतांजली शाह यांच्या मते जाणून घेवूयात प्रसुतीनंतर  किगल एक्सरसाईज करण्याचे फायदे.

१. युरीनरी असंयम रोखता येतो-

नैसर्गिक प्रसुती झाल्यानंतर ब-याच महिलांना त्यांचा योनीमार्ग शिथील झाल्याचा अनुभव येतो.प्रसुती दरम्यान गर्भाशयातून बाळ बाहेर येण्याच्या प्रक्रियेमध्ये योनीमार्गातील स्नायूंवर ताण येतो.ज्यामुळे योनीमार्ग शिशील होण्याची शक्यता असते.याच कारणामुळे काही महीलांना वारंवार युरीन बाहेर पडण्याची समस्या निर्माण होते.हसताना किंवा खोकताना या स्नायूंवर दाब पडल्यास युरीन बाहेर पडते.केगल व्यायामामुळे हे स्नायू पुर्ववत होतात  त्यामुळे ही समस्या देखील कमी होते. जाणून घ्या मूत्रपरिक्षणावरून ओळखा कसे आहे तुमचे आरोग्य !

२. सेक्सुअल इंटरकोर्स करणे सोपे जाते-

काही जोडप्यांना बाळाच्या जन्मानंतरही इंटरकोर्स करताना वेदना होतात.याचे कारण एपिसियोटॉमी,सेंसेटिव्ह वजायना,लुब्रिकेशन कमी असणे असू शकते. किगल व्यायाम प्रकारामुळे योनीमार्गातील स्नायू अधिक मजबूत झाल्याने या समस्येला तोंड देणे सुलभ होते.यासाठी प्रसुतीनंतरही  किगल एक्सरसाईज करण्याचा सराव करा व सेक्सचा आनंद घ्या.

३. प्रसुतीनंतर बाहेर आलेले पोट कमी होते-

प्रसुतीनंतर पोट मोठे दिसण्याची समस्या अनेक जणींना सतावते.जास्त मुले असणा-या स्त्रीयांचे पोट मोठे असण्याची शक्यता अधिक असते.नियमित किगल एक्सरसाईज केल्याने गर्भाशयाच्या खालील भागीतील स्नायू मजबूत होतात त्यामुळे पुन्हा तुमचे पोट पुर्वीप्रमाणे दिसण्यास मदत होते. हे नक्की वाचा

केगल एक्सरसाईज कसा कराल-

आरामदायक मुद्रेमध्ये बसा.तुमचे केगल स्नायू युरीन थांबवण्यासाठी जितके आवश्यक आहेत तितके ताणा.त्यानंतर पुन्हा शिथील सोडा.असे १० ते १५ वेळा करा.तुम्ही  किगल व्यायाम दिवसभरात अथवा रात्री कधीही करु शकता.शक्य असल्यास प्रत्येक वेळी स्तनपानानंतर हा व्यायाम करा.ज्यामुळे दिवसभरात तुम्ही तो २० ते २५ वेळा करु शकता. हे नक्की वाचा नैसर्गिक प्रसुतीनंतर योनीमार्ग शिथील होतो का?

Read this in English Translated By – Trupti Paradkar छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>