अॅन्जीओप्लास्टी झाल्यावर तुम्हाला दोन ते तीन आठवडे कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम व फिजीओ थेरपी न करण्याचा सल्ला दिला जातो.तर हार्ट सर्जरी किंवा बायपास झाल्यावर कमीतकमी एक महीना तुम्हाला व्यायाम न करण्यास सांगितले जाते.शस्त्रक्रियेनंतर परत नेहमी प्रमाणे व्यायाम सुरु करण्याआधी काही आठवडे फक्त ब्रीस्क वॉक करण्याचा सल्ला दिला जातो.
एशियन हार्ट इन्स्टिट्युट च्या Head of Department of Preventive Cardiology and Rehabilitation आणि Senior Interventional Cardiologist डॉ निलेश गौतम यांच्या सल्ल्यानूसार जाणून घेऊयात अॅन्जिओप्लास्टी व बायपास झाल्यानंतर कोणत्या प्रकारचे व्यायाम करणे सुरक्षित आहे.
१. बायपास झाल्यावर चार आठवड्यानंतर व अॅन्जिओप्लास्टी झाल्यावर तीन आठवड्यानंतर रुग्णाला हॉस्पिटल मधून घरी जाण्याची परवानगी मिळते.पण त्यापुर्वी डॉक्टर त्याची एक वॉक टेस्ट घेतात.ऑपरेशन नंतर रिहॅबिलेशन करण्यासाठी तुमचे फिजिओ थेरेपिस्ट देखील हिच टेस्ट तुम्हाला प्रथम करण्याचा सल्ला देतात.ही एक सहा मिनीटांची वॉक टेस्ट असते.जर तुम्हाला त्या टेस्ट दरम्यान श्वास घेताना कोणताही त्रास झाला नाही व छातीत दुखण्याची समस्या जाणवली नाही तरच त्यानंतर तुम्हाला ट्रेड मील वर वर्कआऊट करण्याचा सल्ला देण्यात येतो. जाणून घ्या
Heart attack चा धोका वेळीच ओळखण्याचे ’5′ संकेत !
२. पहिल्यांदा तुम्हाला ट्रेडमील वर एका तासात दोन किलोमीटर धावण्यास सांगण्यात येते त्यानंतर दोन ते तीन आठवडयांनी तुम्ही एका तासात सहा किलोमीटर धावू शकता.यासाठी तुमची व्यायाम करण्याची क्षमता तुमच्या छातीला जोडलेल्या उपकरणांच्या सहाय्याने तुमच्या हुदयाच्या ठोक्यांनूसार मॉनिटर करण्यात येते.यामुळे तुम्हाला तीन आठवड्यांमध्ये सहा किलोमीटर पर्यंत तुमचा धावण्याचा वेग वाढवण्यास मदत होते.
३. जर तुम्हाला जीममध्ये जाऊन
वर्कआऊट करण्यात अजिबात रस नसेल तर तुम्ही स्विमींग,
सायकलींग,रोईंग या सारख्या आऊडोअर एक्टिव्हीटीज करु शकता.ज्यामुळे तुमच्या ह्रदयाचे कार्य सुधारते.फक्त तुम्ही या एक्टिव्हीटीज हळू वारपणे व तज्ञांच्या देखरेखीखाली करणे गरजेचे असते.
४. ब्रीस्क वॉकप्रमाणे तुम्ही जीना चढणे व उतरण्याचा व्यायाम देखील करु शकता.यासाठी तुम्ही लिफ्टपेक्षा जीन्याचा वापर करा.या व्यायामामुळे शरीरावर अधिक ताण न घेताही तुमच्या शरीरातील कॅलरीज कमी होतील आणि ह्रदय व स्नायूंचे कार्य सुधारेल. जाणून घ्या हृद्यरोगींनी हार्ट अटॅकनंतर योगा करणे सुरक्षित आहे का ?
५. यासोबत तुम्ही चार ते पाच पाऊंडच्या डंबेल्स किंवा एक लीटर पाण्याच्या बाटलीच्या सहाय्याने हलके वजन उचलण्याचा व्यायाम करु शकता.फक्त ह्रदयावर ताण येऊ नये यासाठी तुम्ही जास्त वजन उचलत नाही आहात याची दक्षता घ्या.त्याचप्रमाणे तुमच्या फिटनेस रुटीन मध्ये कोणताही बदल करताना तुमच्या फिजिओथेरेपिस्टचा सल्ला जरूर घ्या.
६. जर तुम्हाला योगासने करणे आवडत असेल तर यासाठी सोप्या योगासनांचा सराव करा.वृक्षासन,ताडासन,वीरभद्रासन,त्रिकोणासन आणि पश्चिमोत्तासन ही आसने तुम्ही सुरुवातीला करु शकता.काही कार्डिएक रिहॅब सेंटर्सच्या योगा सेशनमध्ये मध्ये सुर्यनमस्कार व प्राणायाम यांचा देखील समावेश असतो.मात्र सर्जरीनंतर कमीतकमी २ ते ३ महीने कपालभाती हा प्राणायाम करु नका.योगासने करताना जर तुम्हाला कोणाताही श्वसनाचा त्रास किंवा इतर कोणाताही त्रास जाणवल्यास तुमच्या फिजिओथेरपिस्टला याची कल्पना द्या.
Read this in
English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock